गणपती बाप्पाच्या मूर्ती सोबत ही चूक करू नका घरात गरिबी येईल

नमस्कार मंडळी,

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक लोक घरात गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि एक दिवसाने , ५ दिवसांनी किंवा १० दिवसांनी गपणती बापाचें विसर्जन केले जाते.अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा आपला निरोप घेतात. पण असे बरेच लोक आहेत जे संपूर्ण वर्ष गणपती बाप्पाला आपल्या घरातच ठेवतात.

हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे सांगितले आहे कि संपूर्ण वर्ष गणपती बाप्पाना तुमच्या घरात स्थापित करू शकता.मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि गणपती बाप्पाची पाठ आपल्याला दिसू नये म्हणजे तुमच्या दृष्टीस गणेशाची पाठ दिसणार नाही याची काळजी पुरेपूर घेतली पाहिजे.कारण गपणती बाप्पाच्या पाठीमध्ये दारिद्र्यात देवी वास करते .

दारिद्र्यता म्हणजेच गरिबी , पैशांची सतत चणचण भासणे. ज्या घरात नेहमी सतत गणपती बाप्पाच्या पाठीचे दर्शन होते त्या घरत लक्ष्मी कधीच राहत नाही, दारिद्र्यता येते , गरिबी येते. अलक्ष्मीचा वास त्या घरात निर्माण होऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक घरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे गणपती बाप्पाचे फोटो लावत असतात किंवा मूर्ती ठेवत असतात.

पण हे फोटो किंवा मूर्ती लावताना त्याची योग्य अशी काळजी घेणे आणि पावित्र राखणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अनेक घरांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीवर , फोटोवर धूळ पडलेली असते , कधी ते स्वच्छ केले जात नाही. असे केल्याने रिद्धी सिद्धी तुमच्या पासून दुरावल्या जातात . घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याला काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागते.

म्हणून गणेशाची मूर्ती किंवा फोटो अशा ठिकाणी लावाव्या कि जिथे सतत आपल्या तोंडून गणपती बाप्पाचे स्मरण होईल , मुलांच्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता , जिथे तिची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. तसेच हिंदू धर्म शास्त्रानुसार तुमच्या घरात गणेश मूर्ती कोणत्याही स्थितीमध्ये कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नका .

जर तुम्ही आपल्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती दुसऱ्याला भेटवस्तू म्हणून दिली तर तुमच्या घरातील सुख समृद्धी समोरच्या व्यक्तीला दिल्या समान आहे . म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती कोणाला दान म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून देऊ नये. याने घरामध्ये येणारा पैसा खुप कमी होत जातो आणि घरात दरिद्री येते.

गणेश मूर्ती सोबतच आवळ्याचे झाड कोणालाही दान करू नका. या आवळ्याच्या वृक्षामध्ये अनेक  देवी देवता वास करतात. सोबत कुबेराची मूर्ती सुद्धा कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नका किंवा दान करू नका. या काही नियमांचे पालन केले तर तुमच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *