वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती

नमस्कार मंडळी

एकादशीचे व्रत हे हिंदू शास्त्रानुसार सर्व उत्तम व्रतपैकी एक मानला जातो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. आणि या वर्षातील पहिले एकादशी १३ जानेवारी २०२२ रोजी येणार आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते. एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी कसे म्हणतात.

ज्यांना संतती हवी आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूपच फलदायी मानला जात. पौष पुत्रदा एकादशी १२ जानेवारीला दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल. आणि 13 जानेवारीला संध्याकाळी ०७:३२ मिनिटांनी संपेल. उदय तिथी नुसार हे १३ जानेवारीला करायचे आहे. जर तुम्ही हे परत करणार असाल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करा जेवणामध्ये कांदा आणि लसणाचे सेवन करु नका.

एकादशीच्या दिवशी स्थान करून उपवासाचे व्रत करा. ह्यावेळी देवाला धूप फुलं अक्षदा नेवैद्य अर्पण करा पुत्रदा एकादशीची कथा वाचा. यादिवशी अन्नदान केल्याने मोठा पुण्याचा लाभ होतो. असं सुद्धा म्हटलं जाता. ज्या दाम्पत्यांना संतती प्राप्ती चा त्रास होत असेल त्या दाम्पत्यांनी हे पुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे.

जे लोक हे व्रत आपल्या मुलांच्या कल्याणासाठी करतात त्यांच्या मुलांचं सुद्धा कल्याण होता. आणि मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी या तिथीला विष्णूची मनोभावे पूजा अर्चना केली जाते.

एकादशीच्या पूजेमध्ये स्वार्थ आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. प्रत्येक महिन्याचे दोन भागांमध्ये विभाजन केले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याप्रमाणे एकाच महिना मध्ये दोन वेळा एकादशी येते. आशा वर्षातून चोवीस एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव व याप्रमाणे असतात

कामदा, मोहिनी ,नीरजळा, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पशणशुका, प्रबोधिनी ,मोक्षदा, जया, पुत्राला, आमलकी, तर कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी यांची नावं वरुधिनी, योगिनी, आपरा, कामिका,अजा, इंदिरा रमा, उत्पत्ती, सफला, शक्तीला,विजया, पापमोचनी, तुम्ही पण एकादशी व्रत करत असाल तर बोला जय जय पांडुरंग हरी

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *