Marathi Manus

Stay Up to Date With Us

स्वामींच्या पुण्यतिथीला या दोन वस्तू घरी आणा स्वामी प्रसन्न होतील .

नमस्कार मंडळी

आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस महत्त्वाचा दिवस त्यादिवशी केंद्रामध्ये मठामध्ये विशेष सेवा केली जाते. विशेष पाठ केले जातात.आणि याच बरोबर आपल्याला या दिवशी केंद्र किंवा स्वामी मठात जाणे शक्य नसेल तर आपल्या सगळ्यांनी स्वामी भक्तांनी घरीच स्वामींची सेवा करावी.

या दिवशी स्वामींची सेवा केल्याने विशेष लाभ मिळतो. स्वामी प्रसन्न होतात व आपल्यावर स्वामी महाराजांची कृपा होते. त्याचबरोबर स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी तर त्याचा लवकर परिणाम तुम्हाला दिसून येईल. आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील.

म्हणूनच स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला अनेक लोक स्वामींचे विविध उपाय त्यांची सेवा आपल्या घरामध्ये करतं असतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये स्वामी यांच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन करून त्या समोर बसून स्वामींचा तारक मंत्र सुद्धा म्हणावा.तसेच स्वामी चरित्राचे अध्यायच वाचन सुध्दा करावे.

अगदी मनापासून आणि श्रद्धेने. अशाच पद्धतीचा अजून एक छोटासा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

हा उपाय जर स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी व किंवा त्या आधी दोन तीन दिवस केला तर स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतात.आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्यावर आलेले संकटत स्वामी आपले रक्षण करतात व आपले पाठीशी नेहमीच सदैव उभी राहतात.

स्वामींचे आवडत्या दोन वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहे. या दोन वस्तू जर आपण आपल्या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी घरामध्ये आणल्या तर त्यामुळे स्वामींचे आपल्यावर कृपा होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर सर्वांना माहिती आहे की स्वामी समर्थांची भक्ती केल्यास आपलं मन नेहमी प्रसन्न राहते.

स्वामी महाराजांचा जप करून आपल्या सर्व समस्या सुटतात. करण स्वामीच वाक्य आहे. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा उपाय तुमची इच्छा पूर्ण करेल तुमच्या मना मध्ये असलेली भीतीसुद्धा दुर करेल. स्वामींची सेवा करताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कपाट मनामध्ये ठेवू नये. निस्वार्थ भावनेने केलेली पूजा ही दसपट फळं देते.

पूर्णा भक्तिभावाने श्रद्धेने केलेली स्वामींची सेवा ही स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळवून देते. स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची सेवा पूजा अभिषेक तर करायचा आहे. त्याचबरोबर हा एक उपाय सुद्धा करायचा आहे. दोन वस्तूंच्या स्वामीच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहेत.

यामध्ये सगळ्यात पहिली वस्तूची स्वामींचे पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे अत्तर. स्वामींचे पुण्यतिथीच्या दिवशी आपण घरामध्ये आत्तर घेऊन यायचा आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ज्या वेळी आपण स्वामी समर्थांची पूजा अर्चा करत असतो सेवा करत असतो.

त्यावेळी आपल्याला त्या सेवेमध्ये पूजामध्ये आपल्या त्या अत्तराचा वापर करायचा आहे. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे जपमाळा आपल्या सर्वांना माहिती आहे कि स्वामींच्या कुठच्याही सेवेमध्ये स्वामींची सेवा करताना जपमाळ ही किती महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला स्वामी समर्थांचे पुण्यतिथीच्या दिवशी रुद्राक्षांची एक जपमाळ घरात आणायची आहे.

त्याचबरोबर त्या दिवसापासून किंवा गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही तर माळेवर जप सुद्धा सुरू करू शकता. रुद्राक्षाची माळ तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये मिळेल. तुमच्या घरा जवळ असणाऱ्या पूजा साहित्य च्या दुकानांमधून तुम्ही ही माळ विकत घेऊ शकता. रुद्राक्षांची हि माळ १०८ मण्यांची असायला हवी.

अशा प्रकारे स्वामींचे या दोन वस्तू तुम्ही स्वामींचा पुण्यतिथी या दिवशी नक्की खरेदी करा व घरामध्ये घेऊन या. श्री स्वामी समर्थांची भरपूर सेवा करा श्रद्धा आणि भक्ती भावाने निस्वार्थी केलेली सेवा नक्की स्वामी पर्यंत पोहचते. आणि यांचे फळ स्वामी नक्कीच आपल्याला देतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.