Marathi Manus

Stay Up to Date With Us

शनिदेव होतील प्रसन्न हे उपाय केल्याने अडकलेली कामे लागतील मार्गी नक्की करून पहा

नमस्कार मंडळी

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल तर त्या व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागत असते . याउलट, जर शनि बलवान असतो तर माणसाचे चांगले दिवस सुरु होण्यास वेळ लागत नाही .

असं म्हटलं गेलंय की शनिवारी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात . तसेच, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे इतरही अनेक उपाय आहेच .

हे उपाय कोणते आहेत आणि त्यापासुन आपण काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया. शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागू नये यासाठी ज्योतिषशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. असं सांगण्यात आले आहे

की शनिवारी सूर्यास्तानंतर गायीला तेल लावलेली पोळी खाऊ घातल्यास कुंडलीतील शनिची स्थिती मजबूत बनते .

बरेच लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी उपवास सुद्धा करतात. तसेच, इतरही अनेक उपाय करतात. जेणेकरून शनीच्या साडेसातीपासून त्यांचा बचाव होईल. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होतात असे म्हणतात.

यासोबतच शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर शनिदेवाची पूजा नक्की करावी. हे जीवनातील दु:ख, कलह आणि अपयश दूर करत असते . ज्योतिष शास्त्रानुसार मोहरीच्या तेलात लोखंडाचा खिळा टाकून दान करावे .

तसेच ते पिंपळाच्या मुळामध्ये अर्पण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होत असतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी छाया दानाचेही विशेष महत्त्व आहे. पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात चेहरा पहा आणि नंतर ते शनि मंदिरात जाऊन ठेवावे .

तेलाचे पराठे बनवून त्यावर काही गोड पदार्थ ठेवून गायीच्या वासराला खायला दिल्यास तुम्हाला खूप फायदा होतो

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.