नमस्कार मंडळी
ओम नमः शिवाय ३१ जानेवारी सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे. वर्षा २०२२ मध्ये एकूण १३ अमावस्या आहेत. ज्यामध्ये दोनच सोमवती अमावस्या आहे. वर्षातील पहिली सोमवती अमावस्या ही ३१ जानेवारीला व दुसरी सोमवती अमावस्या ही ३० मे रोजी वैशाख महिना मध्ये आहे.
हिंदू पंचांगानुसार चतुर्दशी ही ३१ जानेवारीला दुपारी ०२ वाजून १९ मिनिटांनी पर्यंत तर आहे.आणि त्यांनतर अमावस्या तिथी सुरू होईल. शास्त्रात असे सांगितले आहे की सोमवारी आलेली आम्ही असेही सोमवती अमावस्या मानले जाते. हिंदू धर्मामध्ये अमावस्येची तिथीच फार महत्त्व आहे.
आणि जेव्हा ही अमावस्या सोमवारच्या दिवशी येते. तेव्हा तिचे महत्त्व अधिकच वाढतं. या दिवशी केलेले स्नान धान तंत्र मंत्र साधन याचा अनंत पटीने फळ आपल्याला मिळतात. यादिवशी आपल्या जीवनातील सगळं दुःख व समस्यांचा नाश करण्यासाठी तसेच आपल्या मनात जर काही इच्छा असेल.
ती पूर्ण होण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर ते शीघ्र फलदायी ठरतात. सोमवती अमावस्याला केले जाणारे काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. जसं की आपल्याला माहिती असेल सोमवती अमावस्याला स्नान चे फार महत्त्व आहे. आणि जर ही मोनी अमावस्या असल्याने आपण आंघोळ करताना. मौन राहिलं मौन राहून स्नान केलं. हजारो गाईंना दान केल्याचे पुन्हा आपल्याला मिळतात.
त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये जर काही ग्रह दोष असेल. किंवा धन संबंधित काही समस्या असतील. तर या दिवशी आंघोळ करताना दोन ते तीन बेलाचे पान आपल्या स्वतःच्या डोक्यावर ठेवायची आहेत. आणि ही पानं डोक्यावर ठेवून भगवान शंकरांचे नामस्मरण करत आपल्याला स्नान करायचे आहे. आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ व स्वस्त परिधान करायचे आहेत.
तुमच्या आसपास जवळ कुठे शिवालय शंकराच मंदिर असेल. तिथे जाऊन कच्च्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक करा. अभिषेक करताना निरांतर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच भगवान भोलेनाथ यांना प्रिय असणारे पांढ-या रंगाची फुलं धोतराचा फुलं बेलपत्र अर्पण काढायचे आहे. यावेळी गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे.
जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल. तर तुम्ही घरामध्ये शिवलिंगाला अभिषेक करू शकता. जर घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही या दिवशी मातीचे एखादा शिवलिंग बनवून त्याला अभिषेक करू शकतात. अभिषेक झाल्यानंतर धूप-दीप दाखवल्यानंतर भगवान भोलेनाथ समोर हात जोडून आपल्याला बसायचं आहे आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा त्यांना बोलून दाखवायचे आहे.
याचबरोबर जर आपल्या जीवनामध्ये काही संकट आले असतील दुःख असेल तर त्यांचे निवारण करण्यासाठी भोलेनाथना मनोभावे प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय केला. तर भगवान भोलेनाथ तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. या सोमवती अमावस्याला तुम्ही यथाशक्ती तांदूळ डाळ मीठ किंवा तेल दान करू शकता अमावस्या तिथी ही पितरांची तिथी सुद्धा मानली जाते.
त्यामुळे या दिवशी आपण पितरांचे ध्यान करत. या दिवशी आपण दक्षिणेला तोंड करुन तीळ मिश्रत जल पितरांच्या नावाने अर्पण केलं. तर यामुळे पितृदोष सुद्धा नाहीसा होतो. आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात. आणि त्यांच्या कृपेने आपल्याला प्रत्येक कार्यांमध्ये यश मिळेल.