आयुष्यात खुपदा वाईट वेळ येते, अपेक्षाभंग होतो, दुःख विश्वास घात अशा वेळी फक्त एक काम करा.

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला हसत-खेळत आनंदात ठेवू देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आयुष्यात कधी तरी खूप वाईट वेळ येते. अशावेळी खूप चिडचिड रड रड त्रास होतो. अपेक्षाभंग दुःख विरह दुःख अशा अनेक मानसिक त्रासामुळे माणूस खचून जातो.

एकटा पडतो सगळीकडे तसेच नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो. चुकीचे निर्णय घेतो आणि तोंडावर पडतो काहीजण आयुष्य संपवून टाकतात. आणि काही जण जिवंतपणीच मरून जातात खरत ही वेळ असते उठायची आणि आयुष्य सोबत संघर्ष करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची कष्ट करायची हव्या असलेल्या एका गोष्टीसाठी कितीतरी गोष्टींचा त्याग करायची.

ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होत आला आहे किंवा होतोय. तर त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीही त्यांच्या सारखे वागू नका त्यांच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एक योग्य निर्णय घ्यावा. एकच वाट धरावी किंवा एकच ध्येय धरावे. आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं. नवीन माणसांना भेटत राहावे त्यांच्याकडून जे चांगले आहे ते घेत राहावे.

भावनांमध्ये न अडकता पुढे जात हवा. आपली कदर कोणाला आहे आणि कोणाला नाही हे दाखवण्यापेक्षा स्वतःची सिद्धता स्वतःला दाखवून द्यावी. ज्यांना तुमचं रडणे ऐकू गेलं नाही त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील किंवा तुमच्या वेदना ज्यांना दिसले नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. तुमच्या आयुष्यात वाईट वेळ चालू आहे तुमची हीच चिडचिड होते.

अपेक्षाभंग दुःख आहे तर तुम्ही शांत बसा. डोळे बंद करा विचार करा काय झाले आयुष्यात सगळं संपलय आयुष्य संपले. फक्त काही समस्या तर आहे. तर त्या कोण सोडणार कोणी दुसरा येऊन सोडणार नाही त्या समस्या तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत म्हणून रडत बसू नका चिडचिड करू नका सुख आहे म्हणून घरात बसू नका. दुसऱ्यांना दोष देऊ नका. उठा आणि कामाला लागा ज्या समस्या आहे

त्यांना दूर करा फक्त चालत राहा दुसर्यांना सांगू नका. दुसऱ्यांचा विचार करू नका. दुसरे काय बोलतात त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. स्वतः निर्णय घ्या आणि त्या निर्णयावर ठाम राहा आणि बघा विजय तुमचाच होईल. श्री स्वामी समर्थ

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *