नमस्कार मंडळी
श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अशी वेळ येते असते. आपल्याला जगू वाटत नाही. आपल्याला एकटे वाटते काय करावे समजत नाही. तेव्हा मनात अनेक विचार येतात. मन विचलित होत असते. तुमच्या जीवनात सुद्धा अशी वेळ कधीतरी आलीच असेल. अशा वेळी फक्त एक काम करावे.
तुम्हाला या सगळ्यातून हे एक काम बाहेर काढू शकते. हा सगळा मनाचा खेळ असतो. जेव्हा मना मध्ये काहीतरी विचार टेंशन चिंता शिरते. तेव्हा आपल्या सोबत कसे होत असते मन विचलीत होते. आपल्या मनाला कंट्रोल करणे खूप महत्त्वाचे असते जसे जेव्हा कधी तुमच्या जीवनामध्ये अशी वेळ येईल तेव्हा तुम्ही सर्वप्रथम आपल्या मनाला शांत करा का तुम्हाला असं वाटते.
कोणतं टेन्शन आहे कोणती चिंता आहे. त्यांचा विचार करा. त्या समस्यांना डोळ्यासमोर आणा आणि पाच मिनिटांसाठी त्यातून मार्ग काढण्याचा विचार करा. कसा या समस्यांना दूर करू कसा मी यातून बाहेर येऊ याचा विचार करा. मार्ग मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला तर स्वामींना शरण जा तुम्ही प्रयत्न केला पण तुम्हाला मार्ग मिळाला नाही आता यासाठी एकच मार्ग आहे
तो म्हणजे स्वामी मार्ग स्वामींना तुमची चिंता टेंशन सर्व काही माहिती असते. त्यांना सांगा त्यांना प्रार्थना करा स्वामी तुम्हाला तर सगळं काही माहिती आहे. तुम्हीच काहीतरी मार्ग काढ आम्हाला या समस्येतून बाहेर काढा. बस एवढीच पार्थना स्वामीनां करा आणि बघा काही दिवसातच तुम्हाला मार्ग मिळेल तुम्ही समस्यांमधून बाहेर याल. स्वामी तुमची मदत करतील.
वेळा आणि दिवस स्वामी ठरवतात हा भरपूर लोकांचा अनुभव आहे. म्हणून एकच मार्ग स्वामींचा मार्ग या मार्गावर चला स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. जर तुम्ही प्रयत्न केलाच नाही तर स्वामी सुद्धा तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. म्हणून अधिक प्रयत्न करा प्रयत्नांनी मार्ग मिळत नसतील. तर स्वामी मार्ग व स्वामींच्या शरणात जा.
स्वामी तुम्हाला नक्की मदत करतील. श्री स्वामी समर्थ