कावळा, कुत्रा,गाय यांना पोळी घाऊ घातल्याने काय घडते.

श्री स्वामी समर्थ

आपल्या हिंदू धर्मामध्ये मुक्या प्राण्यांवर दया करणे हे खूप भाग्य मानले जातो. त्यांना भोजन द्यावे अशी शिकवण दिली जाते. आपण झाडांची वनस्पतीचे पूजन करत असतो त्याच प्रमाणे नागपंचमी ला नागाची पुजा करतात .बैल पोळ्याला बैलांच श्राद्धाच्या वेळी कावळ्याचे या सर्वांचे पूजन करून त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण कासवाला ही देव मानतो गाईला तर आपण माता मानतो‌

म्हणजे आपला धर्म आपल्याला प्राण्यांविषयी प्रेम आणि आपुलकी शिकवतो. आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी असा शोध लावला होता की प्रत्येक प्राण्याचे आचरण त्याचा स्वभाव त्याचा काहीना काही प्रभाव नक्की असतो. गायीचे महत्त्व तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आज आपण गाय कावळा कुत्रा व मुंग्यांना भोजन दिल्याने काय होते. हे आपणं जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी आपण गाय विषयी जाणून घेऊया गाई आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पूजनीय मानले जाते. गायीमध्ये ३३ कोटी देव देवतांचा वास असल्याने असं आपणं मानलं जातं चौर्‍यांशी लक्ष योनी मुक्त जन्म घेऊन आत्म गाईच्या रूपांत शेवटचा जन्म घेतो. म्हणजेच काय लाखो युनिका पैकी असा एक भाग आहे. जेथे आत्मा स्थिर होतो. व पुढील योनी साठी सज्ज होतो.

आपल्याला ज्या ठिकाणी घर बांधण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी पंधरा दिवस गाय-वासरू बांधून ठेवल्यास ती जागा पवित्र होते. त्यातून सर्व प्रकारच्या असुरी शक्तींचा नाश होतो. गाई मध्ये सकारात्मक उर्जा भरलेली असते. आपण एखाद्या शुभ कामासाठी जात असताना त्या ठिकाणी गाय आणि वासरू एकत्र दिसले तर ते काम झाले असं समजा गाय ने आपल्या शेपटी मारली तर ती शुभ गोष्ट असते.

हिंदू धर्मात कुत्र्याला यामाचा दूत मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्याने भैरवनाथ प्रसन्न होतात. आणि आकस्मित येणाऱ्या संकटांपासून ते आपले रक्षण करतात. अशी मान्यता आहे की जर आपण कुत्र्याला खुश ठेवलं तर ते आपल्या आसपास यम देवांना येऊन देत नाही. कुत्र्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत आधीच मिळत असतात. कुत्र्याला रोज भोजन दिल्याने आपल्याला शत्रूचे भय राहत नाही.

कुत्रा पाळण्याणे घरामध्ये लक्ष्मी येते असंही म्हटलं जातं. घरात कुणी आजारी असेल तर त्यांचा आजार कुत्रा हा नेहमी स्वतःवर घेतो असंही म्हटलं जातं. कुत्रा असल्याने केतु ग्रहाचा प्रभाव नष्ट होतो. पितृपक्षामध्ये कुत्र्याला गूळपोळी खायला देणे शुभ असते. पुरातन आलेल्या कथेमध्ये कावळ्याने अमृताची चव चाखली होती. म्हणून असं मान्यता आहे की कावळ्याचा मृत्यू हा कधीही नैसर्गिक होत नाही.

आजारपण वृद्धापकाळी यामुळे कवळयाचा मृत्यू होत नाही. कावळ्यांचा मृत्यू हा आकस्मित होतो. कावळ्याला ही भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळत असतात. पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन देणे म्हणजे आपले पितृऋण भोजन देणे असे मानले जाते. कावळ्याला भोजन दिल्याने किती तरी प्रकारचे फायदा आपल्याला होतात.

कावळ्याला भोजन दिल्याने सर्व पितृदोष व कालसर्प दोष निघून जातात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कावळ्याला भोजन द्यावे. कारण कावळा हा शनी देवाचे वाहन आहे. घरात कावळा ओरडलास घरी पाहुणे नक्की येतात. घराच्या उत्तर दिशेला जर कावळा काव काव करत असेल तर घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होणे हे निश्चित आहे पूर्व दिशेला कावळा काव काव करत असेल तर शुभवार्ता कानावर पडतील.

पश्चिम दिशेला जर कावळा ओरडत असेल तर वाईट बातमी कानावर पडते. कावळ्याला भोजन दिल्यास शत्रूचा नाश होतो. आपण मुंग्यांना एक छोटासा जीव मानतो आपण त्यांना जास्त महत्त्व देत नाही आसपास किती तरी मुंग्या असतात.पंरतु आपणं त्यांच्या कडे दुर्लक्ष करत असतो. जर नीट लक्ष दिले तर त्या मेहनती व एक जीव आहे . मुंग्यांनाच्या अनेक जीती पाहीला मिळतातं.

आपण शक्यतो लाल व काळ्या मुंग्यांना ओळखतो. मुंग्यां स्वतःच्या वजनाच्या शंभर पट वाजन उचलता. इतकी क्षमता त्यांच्या मध्ये असते लाल मुंग्या ना अशुभ तर काळ्या मुंग्यांना शुभ मानलं जातं . परंतु ह्या दोन्ही मुंग्यांना भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालतं आली आहे. मुंग्यांना पीठात साखर घालून भोजन म्हणून दिल्यास सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो.

हजार मुंग्यांना साखर भोजन म्हणून दिल्याने आपल्याला शास्त्र भजनच पुण्य लागतं. तसेच त्या हजारो मुंग्या आपल्या प्रती कृतज्ञ होतात. आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि त्यांच्या शेवगा प्रिय परिणाम म्हणून आपल्या पूर्ण संकट ते त्यांच्यावर ते ओढून घेतात. ज्यांच्या तोंडात आणली आहे अशा लाल मुंग्यांची राग बघणे खूपच शुभ मानलं जातं.

चिमण्यांना दाणे टाकतो मुंग्यांना पिठीसाखर खायला देतात त्यांना धनाची प्राप्ती होते. मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपली कर्जापासून मुक्ती होते म्हणून दररोज अंघोळ झाल्यानंतर चहा पिणे पूर्वी दररोज मुंग्यांना साखर टाकावी नंतर आता पण चहा घ्यावा.हा रोज चार नियम करून ठेवा गाईला हिरवा चारा खाऊ घाला. गाईला खायला दिल्यास घरामधील सर्व प्रकारची पीडा बाधा निघून जातात.

गाईला गरम पोळीवर थोडसं साजुक तूप चने व थोडासा गूळ ठेवून खायला दिल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. गायला भोजन दिल्याने सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. एकादशीला गाईला हिरवा चारा खायला दिलास जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होते. कुत्र्याला भोजन दिला शत्रुपीडा निघून जाते. कावळ्याला भोजन दिल्यास आपले पित्र आपल्यावर खुश राहतात.

पक्ष्यांना दाणे टाकल्यास नोकरी-व्यवसायात फायदा होतो. मुंग्यांना साखर दिल्यास कर्जमुक्ती होते. तर माशांना पिठाची गोळी खायला दिल्यास आपल्या सुख-समृद्धी मध्ये वाढ होते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *