०६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी – संपूर्ण राशींचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या असा असेल पुढचा अठवडा

नमस्कार मंडळी,

चला तर जाणून घेऊयात ०६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी साप्ताहिक राशिभविष्य कसे असणार आहे या १२ राशींसाठी. काही गोष्टींमध्ये खूप चांगले तर काही गोष्टींमध्ये खूप खराब असा हा आठवडा असेल . काही राशींना भाग्य साथ देणार असून काही राशींना समस्यांना सामोरे जावे लागेल.

मेष – मेष राशीच्या लोकांना हा आठवडा काही गोष्टींमध्ये त्रासदायक तर काही गोष्टींमध्ये उत्तम असणार आहे.ह्या आठवड्याचा शेवटी तुम्हाला उत्तम धन लाभ किंवा आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. आठवड्याच्या मध्ये तुम्हाला करिअर विषयी थोडा त्रास जाणवू शकतो , करिअर मध्ये थोड्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मानसिक ताण तणाव किंवा अस्थिरता तुम्हाला जाणवू शकते. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे जरुरी आहे.

वृषभ- या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला थोड्या आरोग्याच्या तक्रारी घेऊन येतील.त्यामुळे खाण्यावरती थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ज्या गोष्टींपासून त्रास होतो त्या न खाल्लेल्या बऱ्या आहेत. ज्या गोष्टी साध्य होणार नाही किंवा तुम्हाला माहित आहे कि होणार नाहीये अशा गोष्टीमागे पडू नका , ती पूर्ण नाही झाली तर तुम्हाला मानसिक त्रास होईल.सुरुवातीला वाद विवाद होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे पण आठवड्याच्या शेवटी करिअर मध्ये आणि घरामध्ये सुद्धा सर्व चांगले होईल.

मिथुन – या राशीच्या लोकांच्या विवाहाची बोलणी वैगरे काही करायची असतील तर ती या आठवड्यामध्ये करू नका. मनाप्रमाणे गोष्टी होणार नाही आणि त्यामुळे मानसिक अस्थिरता जाणवेल आणि निर्णय सुद्धा चुकू शकतात. पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडा आराम आणि शांती मिळेल. प्रॉपर्टी संबंधित काही समस्या असतील तर या आठवड्यामध्ये त्या समाप्त होतील.आई च्या आरोग्याची काळजी तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये घ्यायची आहे.

कर्क – कर्क राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. ज्या लोकांना व्यवसाय आहे त्यांना अति उत्तम लाभ दिसून येत आहे. आलेल्या संधीचा कसा तुम्हाला फायदा करता येईल आणि कशी आर्थिक आवक वाढवता येईल याचा प्रयन्त करा. विवाह जुळवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे . प्रवास सुद्धा तुमचा घडू शकतो. आरोग्य उत्तम राहील , मनाची स्तिथी सुद्धा उत्तम राहील , तुम्हाला उत्साहित आणि प्रसन्न वाटेल.वाहन चालवताना थोडी काळजी घेणे जरुरी आहे.

सिंह – या राशीच्या लोकांना हा आठवडा आरोग्याच्या तक्रारी घेऊन आलेला आहे. चंद्र हा सिंह राशीच्या लोकांच्या सहाव्या घरातून परिवर्तन करणार आहे , मकर राशीमधून जाणार आहे त्यामुळे घरात दवाखाण्याचा खर्च वाढेल, घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. तुम्हाला सुद्धा कफ किंवा पोटाचा त्रास होण्याचे योग आहेत. आठवड्याच्या मध्ये आरोग्य सुधारेल.व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होण्याचे संकेत आहेत. ज्यांना परदेशी जायचे आहे त्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम साथ देणार आहे.

कन्या – या राशीच्या लोकांना हा आठ्वस एकदम चांगला आहे. नवीन संधी तुमच्या कडे चालून येतील.नोकरी मिळण्याचे योग आहेत, धनलाभ सुद्धा होऊ शकतो. पैशांची बचत होईल, आर्थिक स्तिथी सुद्धा सुधारतेय असे जाणवेल. मुलांबाबतच्या समस्या दूर होतील, फक्त तुम्हाला अति विचार करायचा नाहीये. काही समस्या असतील तर त्या गोष्टींना तिथेच सोडून पुढे जाण्याचा प्रयन्त करा. हा आठवडा तुम्हाला साधारण राहील.

तूळ – या राशीच्या लोकांना हा आठवडा अतिशय उत्तम आहे . करिअर बाबत काही निर्णय घायचे असतील तर उत्तम आहेत. नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला मिळतील.या राशीच्या लोकांनी अति काळजी आणि अति विचार या पासून दूर राहणे गरजेचे आहे. तूळ राशीच्या लोकांना जीवनात शनीची साडेसाती चालू आहे त्यामुळे गोष्टी खूप हळू हळू पूर्ण होत आहे पण होत आहेत हे स्वीकारून पुढे जा. ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्या लोकांना उत्तम धन लाभ होऊ शकतो. संतती बाबत काही अडचणी असतील तर दूर होऊ शकतात.

वृश्चिक – या राशीच्या लोकांना ह्या आठवड्यामध्ये छोटे मोठे प्रवास घडू शकतात. ज्या लोकांचे काम मार्केटिंग चे आहे त्यांना चांगला लाभ होणार आहे. भाग्याची साथ या आठवड्यामध्ये मिळेल. या राशीच्या लोकांना सुद्धा प्रथम स्थानामध्ये केतू आहे जो बऱ्याच अडचणी देत आहे पण शनीची साडेसाती संपली आहे त्यामुळे गोष्टी हळू हळू मार्गी लागतील.या आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांना उत्तम आहे लहान भावंडांशी छोटे मोठे वाद होतील.

धनु – या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला थोडे कुटुंबीय वादाला सामोरे जावे लागेल.कुटुंबामध्ये छोटे मोठे वाद विवाद होत राहतील.आर्थिक चणचण तुम्हाला भासेल. तुम्हाला कोणी समझून घेत नाहीये किंवा तुमचे कोणी ऐकत नाहीये असे तुम्हाला जाणवेल. तुमच्या बोलणयाने वाद विवाद होणार नाही किंवा कोणाचा गैर समज होणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे. अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी खूप जास्त प्रयन्त करू नका ती अजून अडकू शकतात त्यामुळे नवीन समस्या निर्माण होतील. नवीन कामाची सुरुवात ह्या आठवड्यामध्ये करू नका, सोबत तुम्हाला आरोग्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे.

मकर- या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला थोडा मानसिक तणाव जाणवेल.यामध्ये अनावश्यक दगदग होईल.कामे विलंब होत जातील आणि ह्या सर्व गोष्टींमुळे मानसिक ताण तणाव जास्त राहील.जास्त पैसे खर्च होत राहतील. पैशाची बचत कशी होईल याचा विचार तुम्ही कराल. करिअर मध्ये दिवस चांगले आहेत तरी तुम्हाला काळजी वाटेल.मानसिक आरोग्य किंवा मनाची स्तिथी या आठवड्याच्या सुरुवातीला खूप चांगली नाहीये. शेवटचे काही दिवस चांगले असणार आहे, अडलेली कामे पूर्ण होतील. मन आनंदी आणि उत्साही असेल.

कुंभ – या राशीच्या लोकांना आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यात येऊ शकतात. आरोग्याबाबत दुलर्क्ष करणे चुकीचे असणार आहे , त्याची नीट काळजी घेऊन उपचार करणे जरुरीचे आहे. कामाचा खूप ताण असेल , विनाकारण गोष्टींचे टेन्शन तुम्हाला जाणवेल.

मीन – या राशीच्या लोकांना सुरुवातीचा जो काळ आहे आर्थिक दृष्टीने चांगला आहे सुरुवातीच्या ३ ते ४ दिवसामध्ये धन लाभाचे योग आहेत.खूप मेहनत करावी लागेल. तुमचे अडकून राहिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. शेवट थोडासा खर्चिक असणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरामध्ये कोणाचेही छोटे मोठे आरोग्य खराब होऊ शकते त्याची चिंता होऊ शकते. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *