नमस्कार मंडळी,
तुमच्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. तुमची तुमच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना घरात केलेली असेल किंवा नसेल तरी सुद्धा बुधवार च्या दिवशी दिवसभरात कधीही किंवा रात्रीही तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा.
हा उपाय केल्याने कर्जातून मुक्ती मिळते.अगदी डोक्यावर कितीही कर्ज असुद्या कर्ज फेडले जाते लक्ष्मी चे म्हणजे धन वैभव संपत्तीचे तुमच्या घरात आगमन होते. जर मनामध्ये काही मनोकामना असतील किंवा इच्छा असतील कि ज्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहेत तर त्या इच्छांची सुद्धा नक्की पूर्तता होते.सर्व इच्छा पूर्ण होतात.
ज्या घरात मुले अभ्यास करत नाही किंवा अभ्यासात मन लागत नाही.करिअर मध्ये यश येत नाही असे मुले मुली किंवा विद्यार्थी वर्ग सुद्धा बुद्धी तेज होण्यासाठी हा एक छोटासा उपाय बुधवार च्या दिवशी किंवा बुधवार च्या रात्री करू शकता.हिंदू धर्म शास्त्रात ५ देवता प्रमुख मानण्यात आले आहेत. ते म्हणजे सूर्य , विष्णू , शिव , शक्ती आणि गणपती .
गणपती हे प्रथम पूज्य देवता आहेत कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणपतीची पूजा केली जाते. भौतिक आणि अध्यात्मिक इच्छांची सिद्धी प्राप्त करण्यासाठी अनेक लोक गणपती बाप्पाची पूजा करतात.म्हणूनच श्री गणेशाना गणाध्यक्ष आणि मंगलमूर्ती या नावाने सुद्धा ओळखले जाते. गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी ने दाता आहेत. आजचा हा उपाय केल्यानंतर घरातून संकटे दारिद्र्य , रोग असेल किंवा घरात कोणती नकारात्मक शक्ती असेल अशा अनेक वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळते.
चला तर जाणून घेऊयात कोणता आहे तो उपाय आणि त्याची विधी कशी आहे-
तुम्ही जर गणपती बाप्पाची स्थापना तुमच्या घरात केलेली असेल तर तुम्ही आज बुधवार च्या दिवशी गणपती बाप्पाना नैवेद्य म्हणून सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आरतीमध्ये तुम्ही गायीचे शुद्ध तूप आणि शुद्ध गूळ दाखवायचा आहे म्हणजेच त्यांच्या समोर ठेवायचा आहे.पंचामृतातील महत्वाचा भाग म्हणजे तूप , तुपाला रोगनाशक म्हंटले जाते आणि गणपती बाप्पाला तूप अत्यंत प्रिय आहे.
तूप आणि गुळाचा नैवेद्य जी व्यक्ती मनोभावे भगवान श्री गणेशाना अर्पण करते , त्या व्यक्तीच्या जीवनातून कर्जमुक्ती साध्य होते.घरात सुख समृद्धी नांदू लागते.घरातील मुलांना विदया प्राप्त करण्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. हा नैवेद्य तर असावा पण त्या सोबत २१ दुर्वांची जुडी गणपती बाप्पाना नक्की अर्पण करा. तुमच्या मनातील कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा एक छोटासा उपाय करू शकता. आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप अवश्य करा.
गणपती बाप्पाला विघ्णहर्ता असेही म्हंटले जाते , मनोभावे हा उपाय करा तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील.