देवघरात ठेवा एक कलश, घरावर कधीच कोणाची वाईट नजर पडणार नाही.

नमस्कार मंडळी,

कलश किंवा घटची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो. घर वास्तुशांत असो, सत्यनारायणाची पूजा असो, लक्ष्मीपूजन असो, नवरात्र असो किंवा यज्ञ-विधी. सर्व मांगलिक आणि शुभ कार्यात कलश ठेवतात. आज आम्ही आपणास सांगणार आहोत घरात घट ठेवण्याचे ३ फायदे.

१ अमृताचा घट – हे मंगल घट समुद्र मंथनाचा प्रतीक देखील आहे. सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक असे हे कलश याला घट देखील म्हणतात. पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. म्हणून पूजा घरात हे ठेवतात. यामुळे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते. हे कलश किंवा घट त्याच प्रकारे बनलेले आहे ज्याप्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदरांचल डोंगराला घुसळून अमृत काढले होते.

असे केसाळ नारळ देखील मंदरांचल डोंगरा प्रमाणे आहेत. कलश हे विष्णू सारखे आहे आणि त्या मध्ये भरलेल्या पाणी हे सागरासारखे आहे वर बांधलेला दोर आहे वासुकी नागा सम आहे ज्याने मंथन केले गेले होते . एका तांब्याच्या किंवा काश्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पानं टाकून त्याचा तोंडावर नारळ ठेवतात.

घटावर कुंकवाने स्वस्तिक काढून आपल्या देव घरात पूर्व बाजूला ठेवून द्यावा. आपल्या हताच्या उजव्या बाजूला ठेवून द्यावा. अशा पदवी निकाळजे ची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करावी. तो नारळ बदलायचा नाही नारळ तोच ठेवायचा आहे. नारळाला एखाद्या तडा गेली किंवा खराब झाला आणि आपल्या निदर्शनास आले तर तो नारळ पाण्यामध्ये सोडून देऊन त्या जागी दुसरा नारळ घ्यावा.

कलशामध्ये लावलेली पाने ही दर मंगळवारी बदलावे. दर आठवड्याला नवीन पानें लावावे. घरात कुलस्वामी च्या नावाने एखादा कलश नक्की स्थापन करावा. या कलशा ला वरून कलश असे म्हणतात. यामुळे कुलस्वामिनी आपल्या घरावर आशीर्वाद असतो नेहमी. त्यांची कृपा आपल्यावरील असते. यामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट कुलस्वामिनी येऊ देत नाही.

वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते मंगल कलश घरात ठेवण्याचे फायदे  वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं – असं म्हणतात की मंगल कलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेल असतं, ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. नारळ देखील पाण्यानं भरलेलं असतं. दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जासारखे वातावरण तयार होते.

जे वातावरणाला दिव्य बनवतं. यामध्ये जे सूत बांधले जाते ते ऊर्जा बांधून ठेवते आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवतं. अश्या प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांतता पूर्ण ऊर्जा तयार करतं, जी हळू-हळू सर्व घरात पसरते. असा आपण एक पाण्याने भरलेला कलश आपल्या देवघरात नेहमी ठेवावा.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *