नमस्कार मंडळी
यंदा रविवारी ६ मार्च २०२२ रोजी विनायक चतुर्थी आहे विनायक चतुर्थी च्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्याची मनातील इच्छा पूर्ण होतात अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे चतुर्थी ची सुरुवात ५ मार्चला शनिवारी ८ वाजून ३५ मिनिटांनी होईल चतुर्थी तिथीची समाप्ती ही ६ मार्च २०२२ रविवारी रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी होईल
विनाकय चतुर्थी चा शुभ मुहूर्त ६ मार्च ला ११ वाजून २२ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३९ मिनीटापरेतचा आहे मंडळी चला आता पाहूया विनायक चतुर्थीला काय कराव काय करून नये किंवा पूजा कशी केली जावी ६ मार्चला पंचांगानुसार रवी योग पाणी सर्वार्थ सिद्धी योग आहे या योगात केलेलं कार्य फलदायी असतं
विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा दुपारी करतात गणपतीची मनोभावे पूजा केली तर तुमची इच्छा पूर्ण होतात त्यामुळे व्यापारीवर्ग गणपतीच्या पूजेला विशेष महत्व देतो विनायक चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे पूजा करन जास्त लाभदायी ठरतो गडातील देवतांची तसेच गणपतीची मनापासून पूजा करा
पूजा करताना गणपतीचे स्तोत्र अथर्वशीर्ष नक्की म्हणा गणेशाला दुर्वा आणि जास्वंदाच फुल अवश्य वहा दिवसभर उपवास करा दूध फळ आहार असा हलका आहार घ्या राग लोभ या दुर्गुणांचा त्याग करा तो त्याग करण्याचा संकल्प तरी करा आणि त्या वरती अंमल करण्याचा प्रयत्न करा विनायक चतुर्थीला काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे
कोणत्या ते पाहूयात या दिवशी मांसाहार टाळावा दारू धूम्रपाना अशा शरीराला घातक असणारी पदार्थ टाळावे कोणाशी वाद घालू नये मारामारी करू नये कुणाशी भांडण करू नये अपशब्दांचा वापर टाळावा कुणालाही दुखवू नका अगदी प्राण्यांना सुद्धा विनायक चतुर्थीच्या दिवशी मनोभावे गणेशाचे पूजन करावे
त्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते जीवनातील अडचणी दूर होतात विनायक चतुर्थी निमित्त गरिबांना धान्य कपडे पैसे अशा स्वरूपात दान करावे गरिबांना जेवण सुद्धा तुम्ही देऊ शकता विनायक चतुर्थीला लवकर उठून स्नान करून लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावे या दिवशी पुजा स्थळ स्वच्छ करून गंगाजल शीपडा
आपण मंदिरात पुजा देखील करू शकता घरी पूजा करत असाल तर घरी गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्याच्यासमोर दिवा प्रज्वलित करा त्यानंतर गणपतीला कुंकू अक्षता फुलं इत्यादी अर्पण करा गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा त्यानंतर गणेश स्तोत्रांचे पठण करा आणि आरती करा
भगवान गणेशाला शक्ती सामर्थ्य बुद्धी आणि भरभराटीची देवता म्हणून ओळखलं जातं विधिवत गणरायाची पूजा करेल तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते तुम्हालाही गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल
तुम्हीसुद्धा विनायकी चतुर्थीला असे व्रत करत असाल तर गणेशाच्या आशीर्वादाने ही तुमच्या आयुष्यात यशप्राप्ती होईल