नमस्कार मंडळी,
श्री गणेशाय नमः
उद्या ४ मे ला विनायक चतुर्थी येत आहे. गणपती बाप्पांचा दिवस. कोणतीही पूजा कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि असे केल्याने ते कार्य सफल होते , त्या कार्यामध्ये यश प्राप्त होते. गणपती बाप्पाची पूजा केल्याने , त्यांची आराधना केल्याने मनामध्ये चैतन्य , एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो.
घरामध्ये सुख आणि समाधानाचे वातावरण पसरते. विघ्नहर्ता, सुखकर्ता संबोधले जाणारे गणपती बाप्पा . ४ मे ला येणाऱ्या विनायक चतुर्थी ला बुधवार येत असून . या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून दर्शन घेतले जाते. असे बोलले जाते जर तुम्हाला जास्त धन प्राप्ती करायची असेल , आयुष्य सुखमय करायचे असेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास करावा.
या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यानंतर गणपतीची पूजा करून उपासना करावी. गणपतीला आवडणारे जास्वंदी चे फुल अर्पण करून दीप धूप लावून आरती करावी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने त्यापासून मिळणारे फळ , पुण्य हे खूप जास्त प्रमाणात मिळते. पूजा करून झाल्यानंतर त्यांचा आवडता नैवेद्य मोदक प्रसाद म्हणून दाखवावा.
चला तर जाणून घेऊयात आपला एक विशेष उपाय जो आपल्याला या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने गणपती बाप्पा ला प्रसन्न करू शकता आणि त्यामुळे घरामध्ये धन संबंधित कोणतीही समस्या राहणार नाही, घरामध्ये नेहमी आनंदी व प्रसन्न वातावरण राहील. आर्थिक अडचणी दूर होतील .
घरावर येणारे संकटे कमी होऊन सुख समाधान वाढेल. हाती घेतलेले कार्य काही अडथळे न येता पूर्ण होतील. गणपती ला तुळशी चे अर्पण कधीच करू नये तसेच शास्र नुसार गणपतीच्या पाठीचे दर्शन सुद्धा करू नये, असे केल्यास दरिद्री येते. या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण एक उपाय करणार आहोत अगदी सोपा असा हा उपाय आहे.
ज्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन , धन प्राप्ती होईल. यासाठी तुम्हाला एक विड्याचे पान लागणार आहे. ह्या विड्याच्या पानावर कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून गणपती बाप्पा ला अर्पण करायचे आहे. पान हा उपाय करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
विड्याचे पान हे कुठेही तुटलेलं नसावे , अखंड असावे आणि त्याचा देठ सुद्धा अखंड असावा. अखंड विड्याचे पान घेऊन त्यात कुंकवामध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट बनवायची आहे आणि त्या पेस्ट च्या साहाय्याने स्वस्तिक काढायचे आहे. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर अगदी नैवेद्य दाखवल्यानंतर हे पान अर्पण करायचे आहे
आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे कि तुमच्या काही पैशासंबंधी अडी अडचणी आहेत त्या दूर होऊन घरामध्ये सुख , शांती आणि समृद्धी असावी. हा उपाय तुम्ही मनापासून , अत्यंत श्रद्धेने , भक्तीने करायचा आहे . नक्कीच तुमच्या सर्व समस्या दूर होतील . हि पूजा केल्यानंतर हे पान दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे.
असे केल्याने घरातील दारिद्र्यता दूर होईल, भरपूर प्रमाणात पैसा येऊ लागेल. सर्व अडी अडचणी दूर होतील. पैशासंबंधी काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा.