Marathi Manus

Stay Up to Date With Us

अतिशय आनंदी असा हा आठवडा, खूप मोठी संधी अचानक मिळण्याची शक्यता

नमस्कार मंडळी

आज दिनांक २४ एप्रिल २०२२ वार रविवार. चैत्र कृष्ण नवमी. या सप्ताहात घडणाऱ्या ग्रहांच्या गोचर अनुसार पाहूया साप्ताहिक राशिफल. दिनांक २४ ते १ मे ह्या काळात अतिशय महत्वाचे ग्रह रशिपालट होणार आहे. दिनांक २४ रोजी उत्तररात्री बुध मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे .

सूर्य राहू मेष राशीत भ्रमण करतील. ग्रहण योग निर्माण होणार आहे . दिनांक २७ एप्रिल रोजी शुक्र मीन या स्वराशित प्रवेश करेल .तिथे ती गुरू सोबत शुभ योग निर्माण करेल दिनांक २९ रोजी अमावस्या रात्रौ प्रारंभ होणार आहे . आणि या वर्षातील सर्वात महत्वाचा ग्रह बदल म्हणजे शनीचा कुंभ राशीत प्रवेश होईल.

साधारण ३ वर्षानंतर होणारा हा बदल अतिशय महत्व पूर्ण होणार असून अनेक बदल घडून येणार . याविषयी संपूर्ण माहिती विशेष लेखातून दिली जाईल. चंद्र सुरवातीला कुंभ राशीतून भ्रमण करणार . पाहूया साप्ताहिक राशिभविष्य

मेष राशी – राशीस्वामी मंगळ हा कुंभेत असून शुक्र व बुध देखील तिथेच आहेत.लाभ स्थान बलवान असून अनेक नव्या कल्पना प्रत्यक्षात येणार आहे . व्यय गुरू धार्मिक आस्था बलवान करेल.परदेश संबंधी शुभ समाचार मिळणार आहे .दिनांक २४ नंतर वाणी ,आणि व्यक्तिमत्व तेजस्वी होईल . तुमच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवणार आहे . शनि महाराज पुढे जाण्याच्या तयारीत आहेत. राशीतील राहू अहंकार आणि मानसिक ताण निर्माण करणार आहे . दान आणि महामृत्युंजय जप करावा. सप्ताह शुभ आहे.

वृषभ राशी – २४ एप्रिल नंतर राशीत येणारा बुध वाक चातुर्य, बुद्धी वादी विचार देईल. व्यवसाय वृद्धी करेल. लाभ स्थानात येणारा शुक्र सर्व तऱ्हेने शुभ लाभ देणार आहे . आर्थिक प्राप्ती होणार आहे शनीचे गोचर कार्यक्षेत्रात विशेष घटना घडून आंतील . गुरू संतती आणि संपत्ती दोन्ही मध्ये वाढ करणार आहे . उच्च शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी होणार आहे . व्यय राहू प्रकृती जपा असे संकेत देत आहे. सप्ताह शुभ फळ देणार .

मिथुन राशी – अतिशय आनंदी असा हा आठवडा असणार आहे . परदेश संबंधी शुभ वार्ता, संधी मिळणार आहे . रखडलेली काम मार्गी लागतील दशम स्थानातील शुक्र बुध खूप मोठी संधी अचानक मिळवून देणार आहे . अनेक वर्ष सहन करीत असलेला अष्टम शनीचा त्रास आता संपणार असून आयुष्यात नव्या जोमाने वर येणार आहे . प्रकृती उत्तम सुधारेल. एकूण सप्ताह आनंदी आनंद असणार आहे .

कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तींना संमिश्र असा हा आठवडा राहणार आहे . भाग्यातील गुरू शुक्र अत्यंत शुभ फळ देणार . शेवटी कुंभ राशीत प्रवेश करणार शनि मात्र इथून पुढे अडीच वर्ष सावध आणि सतर्क राहण्याचा संकेत देणार आहे . प्रकृती, कायदा ,आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध जपावे. कुठेही हलगर्जीपणा अंगलट येऊ शकतो. स्थानबदल होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यम.

सिंह राशी – राशी स्वामी रवि भाग्य स्थानात राहू सोबत असून धार्मिक निष्ठा वाढणार आहे वाड वडीलांकडून लाभ होणार आहे . नवीन सहकारी भेटतील. सप्तम मंगळ जोडीदार दूर जाण्याचे संकेत देत आहे. गैरसमज टाळा. अष्टम गुरू आर्थिक भरभराट, लॉटरी पासून लाभ दर्शवतो. पोटाचे विकार असतील तर काळजी घ्यावी लागणार आहे . कुंभेत येणारा शनि फारसा अनुकूल नाही. सप्ताह चांगला जाईल.

कन्या राशी – गुरू आणि शुक्र शुभ स्थानात असून काही नवीन व्यक्तींची ओळख होणार आहे . विवाहाचे प्रस्ताव येतील. अतिशय शुभ असा हा काळ असणार आहे . मात्र अष्टम राहू सूर्य आहे, काळजी घ्या. कमरेखालील विकार होतील. डोळ्यांचे त्रास संभवतात. कुंभेत येणारा शनि शत्रू पिडा दूर करेल. विजयी व्हाल. मातृ पक्षाला त्रास संभवतो.सप्ताह एकूण मिश्र फळ देईल .

तुला राशी – राशी स्वामी शुक्र षष्ठ स्थानात प्रवेश करीत आहे. मधुमेही व्यक्ती सावध राहणार आहे . गुरू शुक्र योग नोकरीत उत्तम संधी मिळवून देणार आहे .पंचमात येणारा शनि संतती संबंधी शुभ वार्ता देईल.मंगळ शुक्र स्त्री कडून लाभ दर्शवत आहे .सप्तम रवि जोडीदार आग्रही भूमिका घेईल.गैरसमज टाळावे . बुध जपून व्यवहार करा असे सुचवीत आहे .सप्ताह आनंदात जाईल.

वृश्चिक राशी – राशी स्वामी मंगळ शुक्र ग्रहासोबत चतुर्थ स्थानात असून घर आणि वाहन याविषयी शुभ फळ देणार . नवीन वाहन खरेदी करण्याचे योग असणार आहे . पंचम गुरू शुक्र संतती संबंधी आनंदवार्ता देतील. शैक्षणिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे . सूर्य राहू शत्रू वर विजय मिळवुन देणार आहे . सप्तमात येणारा बुध व्यवसाय वृद्धी करेल. सप्ताह आनंदात जाईल.

धनु राशी – गुरू शुक्र चतुर्थ स्थानात वास्तू होण्याचे संकेत देत असून . तसेच गृह सौख्य, वाहन सौख्य यात वाढ करेल. तृतीय शनि सर्व परी शुभ असून साडे साती पडून मुक्तता देईल. मोठे लाभ देऊन शनि महाराज पुढील राशीत जणार आहे . शैक्षणिक यश मिळेल. भावंडांशी जरा जपून रहा. वाद टाळा. सप्ताह अनुकूल आहे

मकर राशी – राशीतून पुढे जाणारे शनि महाराज पुढील काही वर्ष आर्थिक बाजु जपा असे सांगत आहेत. मात्र साडेसातीचा त्रास कमी होईल.मन आशावादी होईल.देश विदेश प्रवास घडतील .धार्मिक स्थळांना भेट द्याल.चतुर्थ राहू घर बदलण्याचे संकेत देत आहेत .बुध संतती व शिक्षण यासाठी उत्तम असून प्रतिष्ठा देईल सप्ताह शुभ असणार आहे .

कुंभ राशी – राशीतील मंगळ शुक्र आता दूर होणार असून शनि महाराजांचा प्रवेश ही एक मोठी घटना घडेल .कुंभ व्यक्ती ह्या साडेसातीच्या मधल्या टप्प्यात येणार आहे . द्वितीय गुरू आर्थिक कौटुंबिक लाभ देईल .शुक्र उंची वस्तू खरेदी करील.तृतीय स्थानात ग्रहण योग भावंडांशी जरा जपून राहण्याचे संकेत देत आहे.प्रवासात सांभाळून रहा. सप्ताह मध्यम

मीन राशी – गुरू शुक्र शुभ योगातून भाग्य चमकणार असून . राशीच्या व्यय स्थानात येणारे शनि देव जपून राहण्याचे संकेत देत आहेत. आर्थिक बाबी,कायदा,प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेसंबंध जपा. गुरुमनाराज साथ देतील. पण सावध राहवे लागणार आहे . द्वितीय रवि राहू कुटुंबात काही घटना घडतील. डोळ्यांचे विकार होण्याचे संकेत आहे . प्रवास योग आहेत .सप्ताह मिश्र फळ देईल

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.