हळदी कुंकू का करतात, कुंकू लावल्याने काय घडते

नमस्कार मंडळी

इंग्रजी वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सर्व स्त्रिया या सणाची वाट पाहत असतात. करणं मकर संक्रांत झाली की स्त्रीच्या हक्कांचा सण हळदी कुंकू समारंभ सुरू होतो. स्त्रीयां एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू देतात व घेतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाण दिले व घेतले जाते.वाण देणे म्हणजे एखाद्यी भेट वस्तू देणे.

वाण बाबतीत स्त्रीची चढा ओढ सुरू असते. इतरांच्या तुलनेत सर्वात उत्तम वाण देण्यासाठी चढाओढ इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. आणि त्यासाठी यांच्या अगदी रस्सीखेच चाललेली असते. हळदी कुंकाचा उत्सव मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालू असतो. स्त्रींया नटून थटून एकमेकींच्या घरी जातात.

आणि हळदी कुंकू लावून तिळगूळ देऊन एक तीळ चार लाडु देऊन वाण देतात. हळद कुंकू हे सौभाग्याचे लेण मांनल जात आणि एकमेकांना कुंकू लावल्याने आपल्या सौभाग्याची वृद्धी होते असे मानले जाते. कुंकू हे लाल रंगाचे असते अति प्राचीन संस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. कपाळावर कुंकू लावण्याचे प्रकार आणि इतर स्त्री कुठून चालून आलेली आहे.

आर्य तर समाज हा मातृप्रधान होता. आणि मातृप्रधान संस्कृती बहुतेक देवी देवता हे रक्तवर्ण म्हणजेच लाल रंगाची आहे. फार पूर्वीपासून कपाळावर कुंकू लावल जातं. प्रत्येक घरातील ग्रामदेवतेला कुंकवाचा टिळा हा अत्यंत प्रिय असतो. दुर्गा पूजा तेही कुंकवाचे अधिक महत्त्व असते. पूर्वीच्या काळी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावला जात असे.

स्त्रियांनाही देवीचे रूप मानले गेले आहे. एखाद्या स्त्रीला लग्न करून घरी आणले जाते त्यावेळी एखाद्या पशूंची शिकार करून त्याचा रक्ताचा टिळा तिचा नववधूचा कपाळी लावून मग नववधूचा ग्रहप्रवेश करायचा अशी प्रथा पूर्वीच्या काळी आर्यत्तर समाजाची होती. काही आदिवासी समाजामध्ये आजही ही प्रथा पाळली जाते.

तसेच नवीन लग्न झालेल्या नव्वदच्या हातून देवीच्या मंदिरामध्ये कुंकूंचा सडा घालण्याची पद्धत आजही काही ठिकाणी प्रचलित आहे. कुंकू अशाप्रकारे सौभाग्याचे प्रतीक असल्याने भारतीय संस्कृतीमध्ये कुंकवाचा वापर प्रत्येक शुभ कामांमध्ये आवर्जून केला जातो. स्त्रियांचे कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाऊ लागले. देवी-देवतांच्या पूजेमध्ये कुंकवाला मानाचे स्थान मिळाले.

लग्न पत्रिके मध्ये ही हळद-कुंकू लावूनच मग ती पत्रिका सर्वांना वाटण्यास सुरुवात करतात. हिंदू संस्कृतीमध्ये नवीन कपडे परिधान करताना त्यापूर्वी त्यांना हळद-कुंकू लावून मग ते परिधान केले जाते. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला हळद-कुंकू लावून हे सौभाग्याचे लक्षण मानलं जाऊ लागलं. विवाह प्रसंगी की समाजामध्ये नवरीच्या कपाळावरती कुंकवाचा मळवट भरला जातो.

एखादीचा वस्तूंसह घराबाहेर पडत असताना घरची स्त्री तिच्या कपाळी हळद कुंकू लावते. त्याचा अर्थ तुझं सौभाग्य अखंड राहो अशी उदात्त मंगलमय भावना त्यामागे असते. लग्न प्रसंगामध्ये वधू-वरांना हळद कुंकू लावण्याची प्रथा समाजामध्ये ही आहे. कोणत्याही मंगल प्रसंगी पुरुषांना कुंकवाचा टिळा लावला जातो.

आपल्या बुद्धीचे स्थान म्हणजे आपले कपाळ ‌ आणि कपाळावर कुंकू लावणे म्हणजे बुद्धीचे पूजन करणे होय. कपाळावर कुंकू लावण्याची पद्धत भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही चालू आहे. आता आधुनिक काळामध्ये कडे पाठ फिरवली आहे स्त्रिया आज कल टिकली लावली जाते. एखादा सण उत्सव असेल तर ती कितीही आधुनिक असली तरी कपाळावर कुंकू लावते.

हीच खरी आपली भारतीय संस्कृती. भारतीय स्त्रिया कितीही आधुनिक झाल्या तरी सण-उत्सव समारंभांमध्ये त्या मागे नाही. आणि त्यातल्या त्यात हळदीकुंकू समारंभ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय . कारण कोणताही असो भारतीय स्त्रिया हळदीकुंकू करतात. विश्लेषण पूजा या निमित्ताने स्त्रिया एकमेकींना आमंत्रित करून कपाळावर हळद कुंकू लावून हा उत्सव साजरा करतात.

एकमेकींना अत्तर लावतात गुलाब पाणी शिंपडतात‌ काही प्रसंग एकमेकींची ओटी भरली जाते. मकर संक्रांतीच्या वेळी स्त्रिया एकमेकींना वाण देतात वाण म्हणून एखादी भेटवस्तू दिली जाते. यावर्षी १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांति पासून ते रथसप्तमी म्हणजे 7 फेब्रुवारी पर्यंत हळदीकुंकू करता येणार आहे.

एकमेकींना हळदी कुंकू लावणे म्हणजे एखाद्या सवाशीन स्त्रीच्या आदिशक्ति रूपाला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय. वाहन म्हणून एखादी भेटवस्तू देऊन आनंद वाटला जातो. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये स्त्रियांना तेवढाच थोडासा दिलासा आणि विरंगुळा व मन मोकळे करण्याची हक्काचे ठिकाण नाहीतरी आजकाल कोणाला कुणाकडे जायला आणि चार शब्द बोलायलाही वेळ नाही.

त्यामुळे स्त्रियांचे एकत्र उठणं बसणं होतं बोलणं होतं. आणि यातून प्रेमही वाढीस लागते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *