Marathi Manus

Stay Up to Date With Us

मंगळवारी करा फक्त हा एक उपाय, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मंडळी,

मंगळवार हा हनुमान चा वार मानला जातो. मंगळवारी हनुमान यांना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सुध्दा केले जातात.मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्या असू द्या. घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल. आपल्या घरात कोणतीही बाधा असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, आपली आर्थिक परिस्थिती डगमगली असेल पैसे टिकत नसतील, किंवा तुमचा कोणताही संकटे असतील.

घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील. भयंकर गरीबी असेल. घरांमध्ये अशांती असेल कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी तर ह्या सर्वावर एकाच उपाय आहे. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारच्या रात्री आपण हा एक छोटासा उपाय करू शकता. आपल्याला चार वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.

हा उपाय आपल्याला प्रेत्येक मंगळवारी करायचा आहे. आपल्याला ह्या उपायांमध्ये एक दिवा लावायचा आहे आणि तो हि ४ वाती असलेला दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावल्यानंतर लावायचा आहे. सूर्य मावळल्यानंतर रात्रभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता.

मंगळवार हा श्री हनुमानाचा वार मानला जातो. आणि ह्या दिवशी हा उपाय हनुमानाच्या मंदिरात जाऊन केला तर अति उत्तम. तुम्हला ह्या उपायाचे फळ अतिशय लवकर शीघ्र गतीने प्राप्त होत. आपल्या समस्या खूप लवकर सुटतात.तुमच्या जवळ आस पास जर मारुतीचे मंदिर नसेल तर तुम्ही घरी एखादी प्रतिमा आणून त्यासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता.

ह्याची पूर्ण विधी काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत

हा उपाय करण्यापूर्वी त्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचा मांसाहार करू नये. हा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ स्थान करावे.ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहेत त्या दिवशी तुम्ही रात्री दिवा लावायच्या आधी आपण स्नान करून घ्यावे. हनुमानांना लाल रंग आवडता आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचा दिवा तसेच लाल रंगाच्या वाती घेतल्या

तर अति उत्तम तसेच आपण लाल रंगाचे कपडे जरी परिधान केले तरी शुभ आहे.त्याचे अतिउत्तम परिणाम प्राप्त होतात.यासाठी आपल्या लागणार सामग्री लाल रंगाचा दिवा लाल रंगाच्या वती. लाल वाती बनवायच्या कश्या तर खूप सोपं आहे आपण जो कापूस घेतो त्याला आपण कुंकू आणि पाणी लावून मिश्रण करून त्या मिश्रणामध्ये ह्या वाती बनवायच्या आहेत.

दिवा लावताना आपण मोहरीचे तेल वापरायचे आहे. हे तेल वापरल्याने आपल्याला खूप फायद्याचे असते आपला उपायाची लवकर फळ प्राप्ती होते. आणखी एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे एक साबुत लवंग. तर हि अशी सामग्री आपल्याला घ्याची आहे. एक दिवा, ४ लाल रंगाच्या वाती, मोहरीचे तेल आणि एक साबुत लवंग.

हनुमाच्या मंदिरात जाताना आपण फुटण्याचा व गुळाचा प्रसाद घेऊन जायचे आहे. ते हनुमानाला प्रिय आहे. फुटाणे नसतील तर घरामध्ये असणाऱ्या हरभरे हरभरे स्वच्छ धुऊन त्यांना भाजा आणि ते घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर किंवा घरात आपण ज्या ठिकाणी हा उपाय करत आहे

त्या ठिकाणी सर्वात आधी मंदिरात गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. चार वाती चार हा दिवा असणारं आहे. चारीही वाती लावायची आहेत. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण हनुमान पुढे बसायचं आहे.त्यानंतर आपण लवंग जी घेतली आहे ती लवंग आपल्या उजव्या हातात घट्ट पकडून हनुमानासमोर आपल्या मनात जे काही आहे

आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपण सांगायच्या आहेत.आपल्या कोणती बाधा झाली असेल. आर्थिक परिस्थिती बिकट असेल उद्योगधंद्यामध्ये वाढ नसेल.पैसा नसेल अनेक प्रकारच्या समस्या असून त्यापैकी कोणतीही एक समस्या ज्याची निवारण तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहे.

आपण याठिकाणी बोलून दाखवायचे आहे आणि यातून मुक्त करण्यासाठी हनुमान जी यांना प्रार्थना करायची आहे. याआधी आपण जे काही चणे-फुटाणे आणले आहे. ते नैवेद्य म्हणून हनुमान जी यांना दाखवून मग हा उपाय करण्यास सुरुवात करावी. आणि ह्या मंत्राचे उच्चारण आपल्याला ११,५१, किंवा १०८ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे

“ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा” तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची एक अनामिक भीती बसली असेल.हा उपाय केल्याने यांना मध्ये असणारी अनामिक भिती सुद्धा निघून जाते.हे करून झाल्यानंतर ती हातातील लवंग शेवटी दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि मग आपण हनुमान चालीसा चा पाठ करायचा आहे.

मंत्राचा जप तर केलाच त्यानंतर हनुमान चालीसा चा पाठ करायचा आहे.केवळ एकदा पाठ करा.हा उपाय इतका प्रभावी आहे की लवकरच तुम्हाला यांचे फळ मिळेल. जितक्या जास्त वेळा तुम्ही हा पाठ करा तुम्हाला फळ मिळते. उपाय आपल्याला अश्याच पद्धीतीने करायचा आहे. सगळं झाल्यावर तुम्ही “जय श्री राम” “जय श्री राम” असे आठ वेळा बोलायचं आहे.

आणि प्रभु श्रीराम यांनी वंदन करायचं आहे.जीवनांमध्ये कोणतेही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील. आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. पण आणखी एक गोष्ट आपण हा उपाय करत असताना ह्या उपाय आपण करत आहोत ह्याबद्दल आपण कोणाला सांगायचे नाही.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.