मोठा मंगळवार हनुमान मंदिरात जाऊन करा हा उपाय पैशाचा लागेल ढीग

नमस्कार मंडळी.

तुम्हाला सर्वाना एखादे महत्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवतोड मेहनत करता, खूप प्रयन्त करतो तरी सुद्धा त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळत नाही. त्यासाठी अनेक जण व्रत उपवास करतात . अनुष्ठान करतात परंतु तरी सुद्धा त्या कार्यात सफलता मिळत नाही. मात्र कधीकधी तेच काम अगदी साधा उपाय किंवा तोटका केल्याने शीघ्र पूर्ण होतात.

आजचा हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने केला तर तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता निश्चित मिळेल. या कलियुगामध्ये साक्षात सूक्ष्म रूपाने वास करणारे देवता म्हणेज श्री हनुमान , श्री रामांनी हनुमानांना अमरत्व प्रदान केले होते आणि प्रभू श्री राम यांनी सांगितले होते कि धरती वर अशी एक वेळ येईल कि या धरती वर पापी लोकांची संख्या जास्त असेल.

या वेळी कोणतीही देवी देवता इथे अवतार घेणार नाही. अशा वेळी हनुमानांना रामभक्तांची रक्षा करायची आहे. आणि त्या सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत जे सज्जन आहेत. जे माझा नावाचा जप करतात. श्री हनुमान हे श्री रामांचे परम भक्त आहेत त्यामुळे कलियुगात सर्वात जास्त फळ देणारे जे देवता आहेत तर ते आहे श्री हनुमान. जर कोर्ट कचेरी मध्ये तुमची एखादी केस चालू आहे ,

त्या केसचा निर्णय लागत नसेल किंवा तुमच्या घरावर , तुमच्या जमिनीवर एखाद्याने कब्जा केला असेल किंवा तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या आहेत , घरामध्ये गृह क्लेश आहे. जीवनात खूप समस्या असतात. या समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे.

हा उपाय करताना तुम्ही ज्या समस्यांसाठी हा उपाय करत आहात ती तुमच्या जीवनातून या उपायानंतर निश्चित दूर होईल. असा दृश्य विश्वास मनात ठेवायचा आहे श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.चला तर जाणून घेऊयात हा उपाय कोणता आहे.

हा उपाय करण्यासाठी मंगळवार चा दिवस निवडायचा आहे. कारण मंगळवार हा श्री हनुमानाचा दिवस आहे . तर या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे . नित्य दिनक्रम करायचा आहे, स्नान करून तुमच्या घराच्या जवळपास जिथे श्री हनुमानाचे मंदिर असेल तिथे मंदिरात जायचे आहे. मंदिरात जाताना तुम्हाला सोबत ९ लवंगा घ्यायच्या आहेत.

९ अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसतील.ज्यांना पुढे फुल असेल. आणि या ९ लवंगाची एक माल तयार करायची आहे.धाग्यामध्ये या ९ लवंगा बांधायच्या आहेत. जेणेकरून यांची माल हनुमानांना अर्पित करू शकू. त्याच बरोबर नैवेद्य साठी छोटासा गुळाचा खडा आणि थोडेसे गायीचे तूप सुद्धा घ्यायचे आहे.

आता हे सर्व घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे.शक्य असेल तर या वेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा.आता मंदिरात गेल्यांनतर थोडेसे तेल आणि शेंदूर हनुमानाच्या मूर्तीवर अर्पित करायचा आहे. मूर्तीवर हनुमानांच्या डोक्यावर अर्पित करायचे आहे. जेव्हा हे तेल त्यांच्या चरणाजवळ येईल, ओघळ येईल तेव्हा तिथले तेल आणि शेंदूर घेऊन तुमच्या मस्तकावर तिलक करायचा आहे.

हा उपाय करत असताना जय श्री राम या मंत्राचा सतत जाप करायचा आहे. आता गूळ आणि तुपाचा नैवेद्य श्री हनुमानांना अर्पित करायचा आहे. आणि तुम्ही जी ९ लवंगाची माल बनवलेली आहे ती माळ उजव्या हातामध्ये घ्यायची आहे.उजव्या हातामध्ये घेऊन संपूर्ण हनुमान चाळीसच्या पाठ तुम्हाला करायचा आहे.

आणि हे सर्व झाल्यांनतर हि माळ हनुमानांच्या मूर्तीला अर्पित करायची आहे आणि मनोभावे तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्यांचे निवारण व्हावे तुमच्या घरामध्ये सुख शांती, धन संपत्ती , वैभव यावे. तसेच तुमच्या जीवनाती तमाम समस्यांचा नाश होण्यासाठी श्री हनुमानांकडे प्रार्थना करायची आहे.

जेवढ्या श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हि प्रार्थना कराल , हा उपाय कराल तितकाच जास्तीत जास्त लाभ तुम्हाला होईल. आता हे सर्व झाल्यानंतर सरळ घरी निघून यायचे आहे.एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कि हा उपाय करताना कोणी तुम्हाला रोखणार नाही किंवा टोकणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे.

हा उपाय एक मंगळवार केला त्यातच तुम्हाला परिणाम दिसू लागेल.हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकता.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *