नमस्कार मंडळी,
गुरुवारचा अत्यंत प्रभावी असा उपाय, जी व्यक्ती गुरुवारच्या दिवशी हा उपाय करते त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असणाऱ्या गुरु ग्रह जबरदस्त मजबूत करते.याचबरोबर ज्या व्यक्तींचा मूल्यांक हा ३ आहे म्हणजेच ज्यांची जन्म तारीख हि ३ , १२ , २१, किंवा ३० आहे. त्यांच्या साठी तर हा रामबाण उपाय आहे.
आजचा उपाय हा अत्यंत साधारण आणि सोपा , लवकर होणारा उपाय आहे.कारण अनेक जणांना व्यापार नोकरी धंद्यामुळे किंवा काही इतर अडचणींमुळे जे उपाय खूप मोठे असतात , ज्यांच्या साठी जास्त वेळ लागतो.असे उपाय करणे जमत नाही. तर असे लोक सुद्धा कमीत कमी वेळात होणारा हा उपाय नक्की करू शकतात.
हा उपाय तुम्हाला करायचा आहे गुरुवारी सूर्यास्ताच्या नंतर , हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक त्रिकोण बनवायचा आहे.या त्रिकोणामध्ये प्रचंड शक्ती असते.ज्या घराचे छत त्रिकोणी असते , त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती एकत्र येतात. तुम्ही पहिले असेल श्री यंत्र हे सुद्धा त्रिकोणी आकाराचे आहे.तसाच वस्तू दोष निवारण करण्यासाठी जे पिरॅमिड वापरले जातात.
ते सुद्धा त्रिकोणी आकाराचे असतात.तर या त्रिकोण आकारामध्ये शक्ती हि सामावलेली असते.असाच त्रिकोण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सूर्यास्त नंतर तुमच्या घरच्या ईशान्य कोपऱ्यात बनवायचा आहे.पूर्व आणि उत्तर या दोन दिशांच्या मधला जो कोपरा आहे तो ईशान्य कोपरा. या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा त्रिकोण बनवायचा आहे.
हा त्रिकोण नक्की कसा बनवायचा ? यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे.कारण गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी हळद आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू या अति उत्तम ठरतात.तर अशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे गायीचे तूप मिक्स करायचे आहे.त्या नंतर ईशान्य कोपऱ्यामध्ये एखादा छोटासा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि या चौरंगावरती तांब्याच्या धातूचे ताम्हण ठेवायचे आहे.
त्या ताम्हनामध्ये हळद आणि तुपाच्या साहाय्याने तुम्हाला एक त्रिकोण बनवायचा आहे. या त्रिकोण बनवल्यांनतर त्रिकोणाच्या खालच्या बाजूला ओम ब्रूहं बृहस्पतेय नमः हा मंत्र लिहायचा आहे.माचीस ची काडी किंवा दुसरी एखादी छोटी काडी घ्यायची आहे.आणि त्याच्या साहाय्याने हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे.
त्रिकोणाचे हे ३ कोण आहेत त्याच्या आतल्या बाजूने तीनही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ओम लिहायचा आहे आणि त्रिकोणाच्या मधोमध जी मोकळी जागा आहे तिथे एक छोटेसे वर्तुळ बनवायचे आहे. अगदी छोटासा ठिपका दिला तरी चालेल. गायीच्या तुपाचा एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे.दिवा लावल्यानंतर जिथे त्रिकोण लावला आहे तिथेच आसन टाकून मांडी घालून बसायचे आहे
आणि त्या त्रिकोणाकडे बघत २१ वेळा तुम्हाला ओम ब्रूहं बृहस्पतेय नमः हा मंत्र बोलायचं आहे.एकगोष्ट लक्षात ठेवा कि मंत्र जाप करताना तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये बघत राहायचे आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे , जी काही मनोकामना आहे ती १००% पूर्ण होणार आहे.असा दृढ विश्वास तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे.
या उपायामुळे तुमच्या कुंडलीमध्ये असणारा गुरु ग्रह अधिक मजबूत होतो, हा उपाय नक्की करून पहा.तुम्हाला याचा परिणाम १००% जाणवेल. हा उपाय करत असताना मनामध्ये पूर्ण विश्वास पाहिजे. तुम्ही मनोकामना तुमच्या इच्छा पूर्ण होणार हे ठाम करून हा उपाय करायचा आहे.