नमस्कार मंडळी,
ज्या घरामध्ये असतात या ३ वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीच सोडत नाही. माता लक्ष्मीच्या आवडत्या अशा ३ वस्तू आहेत आणि याच वस्तूंमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या घरावर होत असते.
माता लक्ष्मीच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही मग ते काही असो, धान्य असो किंवा पैसा सर्व काही मिळते. यश कीर्ती मान सन्मान सर्वच मिळते. म्हणून या ३ वस्तू तुम्ही तुमच्या घरात अवश्य ठेवाव्यात त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
शांती समाधान येते आणि घर आनंद आणि सुख समृद्धीने भरून जाते.नकारात्मक गोष्टी म्हणजे दुःख दरिद्री , वाईट नजर , वाईट शक्ती कायमच्या दूर होतात. चला तर जाणून घेऊयात या ३ वस्तू कोणत्या आहेत – यामध्ये सर्वात पहिली वस्तू हि आहे
कि पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा पंचमुखी हनुमानाचा फोटो. असे भरपूर लोक आहेत ज्यांच्या घराच्या बाहेर , मुख्य दरवाजाच्या वर पंचमुखी हनुमानाचा फोटो कि मूर्ती लावलेली असते.
हा पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूस लावला तर त्याने घराचे रक्षण होते, घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. दुःख अडचणी किंवा कोणी केलेली करणी बाधा घरात प्रवेश करत नाही.
दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शंख , श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आवडती वस्तू म्हणजे शंख , तो नेहमी तुमच्या देवघरामध्ये असला पाहिजीए. शंख हा सहज उपलब्ध होतो पूजा सामग्री च्या दुकानांमध्ये किंवा स्वामी केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहे,
नवीन शंख आल्यांनतर दूध आणि पाण्याने अभिषेक करून हळद कुंकू अक्षदा टाकून त्याची पूजा करून अगरबत्ती धूप दिवा लावून देवघरामध्ये स्थापन करावे.
जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळी पूजा करता तेव्हा त्या शंखाची सुद्धा पूजा करावी, त्याने घरामध्ये सुख शांती लाभते , सकारात्मकता घरात येते. शंख हा शांतीचा प्रतीक म्हणून सुद्धा ओळखला जातो.
शंख तुम्हाला वाजवता येत असेल तर रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर शंख घरात नक्की वाजवावा, ह्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती चे वातावरण निर्माण होईल.
तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याने भरलेला माठ, पूर्वी सगळ्या घरांमध्ये माठ असायचे पण आता फ्रिज आल्यामुळे भरपूर लोक माठ ठेवत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा मातीचा माठ ठेवला पाहिजे खारकरून किचन मध्ये तो माठ ठेवायला पाहिजे.
पाण्याचा माठ हा माता लक्ष्मीचा आवडते प्रतीक सुद्धा मानले जातात.अशा प्रकारे शंख , पाण्यासाठी वापर होणार मातीचा माठ आणि पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो अवश्य तुमच्या घरामध्ये असुद्या , याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सदैव तुमच्यावर कृपा करेल.