Marathi Manus

Stay Up to Date With Us

आज मंगळवार घराच्या छतावर फेका फक्त ही १ वस्तू पुढच्या २४ तासात चमत्कार दिसेल…

नमस्कार मित्रांनो,

मंगळवारी रात्री हा एक छोटासा टोटका तुम्ही अवश्य करा. मंगळवारचा दिवस हा तांत्रिक उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जात असतो . मित्रांनो तुमच्या जीवनात खूप गरिबी असेल, दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो टिकत नसेल, घरी वारंवार आजारपण येत असेल,

वैद्यकीय मदत घेऊन सुद्धा आजारपण हटत नसेल तर आपल्या जीवनात सुख, समृद्धी परत आणण्यासाठी आपण मंगळवारच्या रात्री, अगदी कोणत्याही मंगळवारच्या रात्री आजचा हा छोटासा उपाय अवश्य करायला हवा .आजचा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला फक्त एक लवंग लागणार आहे.

आपण जी लवंग घेणार आहोत ती पूर्ण असायला हवी , अखंड असावी, तुटलेली, फुटलेली नसावी. आणि या लवंगला फुल सुद्धा असलं हवं मित्रांनो तंत्र शास्त्रात लवंगचे खूप मोठे महत्वाचे मानले जाते . लवंग असेल किंवा विलायची असेल हे दोन्ही पदार्थ तंत्र शास्त्रात खूप मोठं महत्व असतात .

मंगळवारी रात्री म्हणजे सुर्यास्ता नंतर आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय आपल्या घरातच करणार आहोत. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असलात तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यास कोणती हरकत नाही मित्रांनो यासाठी तुम्ही एखाद्या पाटावर रामभक्त हनुमानाचा फोटो स्थापित करावा .

फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्ही एका पाटावर ठेवावी. फोटो स्थापित केल्यानंतर हनुमानांसमोर तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा . दिव्यातील तेल हे मोहरीचे असेल तर अतिउत्तम. पण जर मोहरीचे तेल नसेल तर काहीही हरकत नाही. पण तांत्रिक उपाय आहे त्यामुळे हा सल्ला असेल की तुम्ही मोहरीच्या तेलाचा उपयोग करायला हवा .

मारूतीरायांपुढे मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या या दिव्यात आपण जी वात वापरणार आहोत ती सफेद न घेता लाल रंगाची वात तुम्हाला घ्यायची आहे. मित्रांनो तांत्रिक प्रयोग करताना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे . अनेक जण उपाय करतात पण म्हणतात फायदा झाला नाही.

उपाय करताना झालेल्या छोट्या मोठ्या चूका सुद्धा तुम्हाला त्या उपायांचा फायदा होऊ देत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा जे नियम आहेत ते पाळा आणि जसा उपाय सांगितला आहे तसाच करा. आता हा लाल रंगाची वात आपल्याला बाजारात मिळेल , पण जर मिळाली नाही तर एखाद्या छोट्या वाटीत कुंकू आणि पाणी एकत्र करा.

आणि त्यात आपली पांढरी वात भिजत ठेवावी . थोड्या वेळाने सुकवुन तुम्ही लाल झालेली वात वापरू शकता. तर मित्रांनो लाल वात वापरून मोहरीच्या तेलाचा दिवा हनुमंता पुढे आपल्याला प्रज्वलित करायची आहे त्यानंतर आपण घेतलेली जी लवंग आहे ती आपल्याला हनुमानांसमोर, त्यांच्या चरणी ठेवायची आहे.

सोबत आपण हनुमानाच्या पूजेत गूळ, फुटाणे वापरू शकता. लाल रंगाची फुले हनुमंताला अतिशय प्रिय असतात. तुम्ही त्यांना लाल रंगाची फुले सुद्धा वाहू शकता. हनुमंताला जितकं प्रसन्न करता येईल तितकं प्रसन्न करण्याचा प्रयत्न तुम्ही करा . पूजे नंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे.

ती म्हणजे मंत्राचा जप. मारुतीरायांच्या चरणी ठेवलेल्या लवंग ला स्पर्श न करता आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो हनुमतेय भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट स्वाहा मित्रांनो मंत्राचा उच्चार स्पष्ट करा. या मंत्राचा जप आपल्याला १०८ वेळा करायचा आहे.

मित्रांनो असं म्हटलं जातं की हनुमान हे अमर आहेत, आणि आजही त्यांचं या पृथ्वी तलावर अस्तित्व आहे. अगदी कमी प्रयत्नात प्रसन्न होणारी देवता म्हणजे हनुमान आहे . त्यामुळे आपल्याला या मंत्राचा जप हा १०८ वेळा करायचा आहे. मित्रांनो हनुमानाच्या समोर ठेवलेल्या, त्यांच्या चरणी ठेवलेल्या लवंग मध्ये आपण केलेल्या मंत्राच्या जप मुळे अतोनात ताकत निर्माण होत असते .

विलक्षण अशा प्रकारची शक्ती लवंग मध्ये उत्पन्न होते. एक प्रकारची दैवी शक्ती लवंग मध्ये अवतरते. वर दिलेल्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा चा जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा पाठ करायचा आहे. तुम्ही ११ वेळा पाठ करावा. पण जर शक्य नसेल तर फक्त एक वेळा केलात तरी काही हरकत नाही.

हनुमान चालीसाचा पाठ करून झाल्यानंतर जय श्री राम नामाचा जप करावा. जय श्री राम या नामाचा जप आपण ११ वेळा, २१ वेळा, ५१ वेळा, १०८ वेळा करू शकता. जितक्या वेळा तुम्हाला जप करणं शक्य होईल तितक्या वेळा जप करावा . त्यानंतर ही लवंग तुम्ही हातात घ्यायची आहे. आणि तुमच्या जीवनात असलेल्या समस्या मारुती रायासमोर बोलून दाखवायच्या आहेत.

ही गोष्ट लक्षपूर्वक वाचा. तुम्हाला आपल्या समस्या बोलायच्या आहेत. काहीजण पूर्ण न वाचता आपल्या इच्छा बोलून दाखवतात. तुम्ही बोललेल्या समस्या या लवंगे बरोबर बाहेर जाणार आहेत. तुमच्या जीवनातून दूर जाणार आहेत. उदाहरणार्थ माझ्या जीवनात पैशाची तंगी आहे, माझ्या जीवनात आजारपण आहे. त्या समस्या दूर होऊदेत. अशा समस्या तुम्ही लवंगे पुढे आणि हनुमंता समोर बोलायच्या आहेत.

इच्छा व्यक्त करू नका. माझ्या जीवनात भरपूर पैसा येऊदे, मला चांगले आरोग्य लाभू दे अशा इच्छा व्यक्त करू नका. समस्या बोलून दाखवत असताना लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घट्ट पकडायची आहे. समस्या बोलून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर जा. छत नसेल तर समोर अंगणात जा.

आणि दक्षिण दिशेकडे तुम्हाला ही लवंग फेकून द्यायची आहे. जितक्या दूर फेकता येईल तितक्या दूर फेकून द्या. फेकल्यानंतर खाली पडलेल्या लवंग कडे न पाहता तुम्ही सरळ तुमच्या घरी या. आणि हात पाय धुवून घ्या. उपाय करताना सुद्धा तुम्ही स्नान करून उपायाला सुरुवात केली तर मन प्रसन्न राहतं.

लवंग टाकून परत आल्यानंतर हात पाय धुवून या. पुन्हा एकदा मारुती राया समोर नतमस्तक व्हा. तुमच्या जीवनात असलेल्या समस्या, अडचणी दूर कराव्यात अशी प्रार्थना करावी. जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी रात्री तुम्ही हा उपाय करायचा आहे. मारूतीराया तुमच्या सगळ्या अडचणी नक्की दूर करतील.

पण प्रत्येक मंगळवारी करणं शक्य नसेल तर हनुमाना समोर एक मोहरीचा दिवा प्रज्वलित करत चला. ज्यांना शक्य असेल त्यांनी वर सांगितलेले मंत्राचा जप करावा. मित्रांनो उपाय सोपे आहेत एकदा करून पहा, तुम्हाला खात्री पटली तरच पुन्हा करा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.