वर्ष २०२२ मध्ये दोन राशींचे लग्न झाले तर त्यांचे चांगले पटणार

नमस्कार मंडळी,

एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात जसे की त्याच आवडते भोजन आवडता रंग, गाणं आणि बरंच काही आणि आपल्या जोडीदाराची आवड निवड करणं हे तर फारच अवघड काम आहे पण ज्योतिष शास्त्रामध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आल्या आहेत ज्यांची लग्न झाली आणि इतर कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकतात किंवा ते एकमेकांचे उत्तम जीवन साथी होऊ शकतात.

अश्या जोड्यांमधली पहिली जोडी आहे तूळ आणि सिंह राशीची तूळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव बराच सारखा असतो हे दोघंही सामाजिक असतात आणि लोकांना भेटणं हसणं बोलणं या दोघांचाही छंद असतो त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडतं त्यामुळे ह्या राशीचे लग्न झाले तर असे लग्न दीर्घकाळ टिकू शकते दुसरी जोडी आहे.

मेष आणि कुंभ राशीची मंडळी या दोन्ही राशींचे लोक एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते उत्तम निर्णय घेऊ शकतात हे दोघेही प्रेम आणि सुखाने भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात तसंच ही दोघंही सृजनात्मक असतात स्वच्छंदता पसंत करतात आणि दोघेही आपल्या जोडीदाराला योग्य जागा देणं पसंत करतात . यानंतर योग्य जोडी असणार आहे मेष आणि कर्क राशीचे मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक ऊर्जावान असतात हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानले जाते.

यानंतरची जोडी आहे ती अशी आहे की राशीचक्रातील पहिली रास आणि राशीचक्रातील ही एक शेवटची रास अर्थातच मेष आणि मीन राशीची जोडी ,मेष आणि मीन राशीच्या लोकांचा देखील आपापसात प्रेमळ संबंध बनतात एकमेकांसोबत हे दोघेही कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात मेष रास अग्नितत्त्वाची रास असल्यामुळे अर्थातच स्वभावाने थोडी तापट असते परंतु त्याचलग्न जल तत्वाच्या मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकतो

आपल्याकडे म्हणतातच ना संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याला पाणी बनाव लागतं हाच प्रकार मेष आणि मीन यांच्यामध्ये आपोआप घडून येतो मंडळी यानंतरचे जोडी आहे वृषभ आणि कर्क हे दोघेही एकमेकांना समान आदर देतात एकमेकांची प्रशंसा देखील करतात वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो कर्क राशीचे लोक हे खऱ्या मनाचे असतात तर वृषभ राशीचे लोक हे दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात दोघही घर परिवाराचे महत्त्व जाणून असतात आणि मग उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवं असतं.

वृषभ राशीच आणखीन एका राशी सोबत चांगलं पटतं आणि ते म्हणजे मकर रास हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदार पणे वागतात वृषभ रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचे काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या उदारता आणि समजदारी ला पसंत करतात मंडळी त्यानंतर मेष आणि धनु ,धनु राशीचे लोक नेहमीच आपल्या मनाचच ऐकतात कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटक यापासून दूर राहतात हास्यविनोद करणे यांना पसंत असते.

तसेच मेष राशीचे लोक ही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांना जास्त आवडतं मंडळी यानंतर ची जोडी आहे दोन्ही ही जलतत्वाची राशीची कर्क आणि मीन या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत ते त्यांच्या आत्मिक आणि अध्यात्मिक संबंधांना दर्शवत दोन्ही राशीचे लोक फार भावुक असतात आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात. स्पष्ट बोलणारे सिंह राशीचे कुणाशी पटत तर धनु राशीच्या लोकांशी यांचा चांगलं पटते .

सिंह राशीचे लोक थोडे स्वभावाने जिद्दी असतात पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्‍वास आवडतो त्यामुळे हे दोघं प्रत्येक समस्येचे समाधान काढण्यात यशस्वी होतात यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशीची कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो पण कन्या राशीचे लोक जेव्हा बोलतात तेव्हा खूप मनमोकळी बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो.

यानंतर ची जोडी आहे सिंह आणि मिथुन राशीची सिंह राशीचे लोक मानसिकदृष्ट्या सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात तसेच मिथुन राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेमाची जाणीव करून देण्याला प्रार्थमिक देतात मंडळी कुंभ आणि मिथुन या राशीच्या जोडी. या दोन्ही वायू तत्व असणाऱ्या रास आहेत या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ-उतारात एकमेकांची साथ देतात मिथुन राशि वाले चांगल्या कल्पना यांची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे लोक कलात्मक असतात ही बाब दोघांमध्ये ताळमेळ घालण्यात मदत करते मंडळी मिथुन राशीच्या व्यक्तींच आणखीन एका राशी बरोबर पटतं आणि ती म्हणजे तुळ राशी.

या दोन्ही एकमेकांवर पूर्ण अधिकार दाखवणार्‍या असतात हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते या दोघांमधील नातं नेहमीच नवीन वाटतं दोघही प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात. यानंतर वृषभ आणि वृश्चिक, वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एक सारखे असतात दोघही उत्साही आणि आवेशपूर्ण असतात आपापसातील संबंधांमध्ये दोघेही समान व्यवहार करू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोक असतात. या नंतर ची शेवटची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क वृश्चिक आणि कर्क दोघे ही जलतत्वाची रास आहे म्हणून या दोन्ही राशीचे लोक एकमेकांना सहयोगात्मक पद्धतीने वागतात.

या दोन्ही राशींचे लोकं संवेदनशील असतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात मंडळी या होत्या ज्योतिष शास्त्रानुसार राशींच्या काही जोड्या यांची लग्न झाली तर दीर्घकाळ टिकू शकतात पण अर्थातच जसा सुरुवातीला म्हटलं तसं लग्न यशस्वी होण्यासाठी कुठली ही एक गोष्ट कारणीभूत असू शकत नाही तर त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य आपुलकी आणि प्रेम असणे देखील गरजेचे आहे त्याचबरोबर एकमेकांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल आदर असायला हवा आणि हे सगळं जुळून आलं तर मग अर्थातच सगळेच तुम्हाला म्हणतात तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *