आयुष्यातील सर्व दुःख १००% कशी संपवायची..

नमस्कार मंडळी,

गौतम बुद्धांना एका व्यक्तीने विचारले माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आहे एवढा त्रास का आहे एवढ्या समस्या का आहे. तेव्हा महात्म बुद्ध म्हणाले सांग तुला काय दुःख आहे तर ती व्यक्ती म्हणते अशी किती दुःख मी तुम्हाला सांगू माझं पूर्ण आयुष्य दुःखांनी भरलेला आहे माझे नाते संबंध बिघडले आहे मी सतत आजारी पडत असतो सातत्याने एकामागून एक समस्या उद्भवते.

मी माझ्या कुटुंबीयांसोबत खुश नाही मी माझ्या नातेसंबंधांमध्ये खुश नाही माझे मन सतत चिंताग्रस्त असते टेन्शनमध्ये असते माझ्या आयुष्यात फक्त दुःख समस्या आहे. महात्मा बुद्ध त्या व्यक्तीला विचारतात तुझ्या दुःखाचे काय कारण असू शकते मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे तुम्ही सांगा माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आहे देवा गौतम बुद्ध त्यांना परत एकदा विचारतात

नीट बारकाईने विचार करून सांग तुझ्या दुःखाचे नक्की काय कारण आहे तेव्हा त्या व्यक्तीने खूप विचार केला पण त्याला काही कारण सापडेना तेव्हा महात्मा बुद्धांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. तुझ्या सगळ्या दुःखांचा कारण तु स्वत: आहे. तुझ्या मनातली आसक्ती आहे तुझ्या मनामध्ये असणारा मोह आहे ती व्यक्ती म्हणते मला नीट समजले नाही

माझ्या मनातला मोह सगळा दुःखाचे कारण कसं काय असू शकते तेव्हा महात्मा बुद्धांनी त्याला तीन छोट्या गोष्टी सांगितल्या . एक व्यक्ती एका झाडाला स्वत: चिटकून जोरजोरात ओरडत होता. मला वाचवा मला वाचवा मला या झाडापासून सोडवा मला या झाडाने पकडले आहेत तेव्हा त्या वेळी तिकडं एक गुरु आणि शिष्य चाललेले असतात.

तेव्हा शिष्य आपल्या गुरूला बोलतो महाराज आपल्याला या व्यक्तीची मदत करायला हवी तो झाडाला चिकटला आहे. त्याला सोडवायला हव तेव्हा ते गुरु आपल्या शिष्याला म्हणाले ह्या व्यक्तीची मदत कोणीही करू शकत नाही त्या शिष्याने आश्चर्यचकित होऊन विचारले. का कोणी त्याची मदत करू शकत नाही. तेव्हा गुरु म्हणाले या व्यक्तीने स्वतः त्या झाडाला पकडले आहे.

आणि जी व्यक्ती स्वतः कोणत्या गोष्टी ला पकडते तेव्हा तिला कोण सोडवणार कोण वाचवणार आता महात्मा बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले तू सुद्धा सर्व दुखाना स्वतः पकडले आहे हे माझे आहे हे गेले नाही पाहिजे हे माझ्याकडे असले पाहिजे हे मला मिळाले पाहिजे सर्व दुःखाचे कारण हे मी आणि त्याने घातलेली बंधने आहेत. नंतर बुद्धांनी त्याला दुसरी गोष्ट सांगितली जसा एक कोळी स्वतः स्वतःचे जाळे विणतो

आणि जाळी विणता विणता एक दिवस असा येतो तो कोळी आपल्या जाळ्यात अडकतो इच्छा असून सुद्धा तो त्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही अशाप्रकारे तोसुद्धा जीवनामध्ये अनेक नातेसंबंध निर्माण केले आहेत. किती जणांना देखाव्या करता आपलं मानलं आहे या नातेसंबंधांमध्ये मोह ठेवल्यामुळे आज ते तुला दुःख देत आहे. पूर्ण जगामध्ये काही घडले तेव्हा आपल्याला सुख दुःख होत नाही

आपल्याला सुख दुःख केव्हा होते जेव्हा आपल्या जवळच्या कोणाबरोबर काहीतरी घडते किंवा आपल्या जवळच्या आपल्या बरोबर चुकीचा लागतो. आता महात्मा बुद्धांनी त्याला तिसरी गोष्ट सांगितली एका मधाने भरलेल्या भांड्यामध्ये एक उडणारी माशी घूसते गोड मध खाऊन त्या माशीला खूप आनंद मिळतो ती जास्तीत जास्त मध खाऊन प्रसन्न होत असते थोडेसे मध खाऊन ती उडु शकली असती

पण ती त्या गोड रसामध्ये एवढी अडकून जाते की तिला तिथून उडू शी वाटत नाही. हे मध पिता पिता त्या माशीचे पंख त्या मधा मध्ये अडकून जातात. जेव्हा तिचे पोट भरते तोपर्यंत ती पूर्णपणे त्या मधा मध्ये अडकून गेलेली असते ती बाहेर पडायचा प्रयत्न करते पुढे जाते मागे येते पण तिला तिथून उडता येत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आरोग्याची शरीराची पर्वा न करता

स्वादिष्ट पदार्थांच्या आहारी जातो काहीही खायला सुरुवात करतो मग पुढे जाऊन त्याचे शरीर खराब व्हायला सुरुवात होते त्याला वेगवेगळे आजार होतात अशाच प्रकारे जेव्हा व्यक्ती विषयांमध्ये अडकते एक घर झाले ती दुसरे घर एक गाडी घेतली की दुसरी गाडी तेव्हा माणसांच्या मनात पैशाचा लोभ निर्माण होतो मग त्या व्यक्तीला कितीही पैसे मिळाले तरी तो मोहापायी समाधानी होत नाही

आणि मग अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण होते. आता त्या व्यक्तीला जाणीव झाली की महात्मा बुद्ध हे बरोबर सांगत आहे माझ्या जीवनातील सर्व दुःखांना मी जबाबदार आहे माझ्या मनातील मोह जबाबदार आहे. आता ती व्यक्ती बुद्धांना म्हणते तुम्ही मला माझ्या जीवनातील दुःखाचे कारण तर सांगितले आता मला त्याचा उपाय पण सांगून टाका

महात्मा बुद्ध म्हणाले तुला सर्व दुकान चे निवारण करायचे असेल तर आपल्या मनातील आसक्ती आणि मोह कमी करून त्याला प्रेम आणि समाधाने भर ज्याचा मनात ज्याच्या हृदयात प्रेम आणि समाधानाचा दिवा जळतो त्याचा आयुष्यातून मोह आणि आसक्ती अंधकार निघून जातो.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *