रक्षाबंधन भावाला राखी बांधायची योग्य वेळ कोणती

नमस्कार मंडळी ,

श्रावण महिन्याच्या पोर्णिमा तिथीला रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमेचा उचव साजरा केला जातो बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वाचन देतो भावा बहिणीचा हा अतूट उचाह या वर्षी २२ऑगस्ट ला रविवारी साजरा केला जाणार आहे

रक्षाबंधनाचा हा उचव फार पूर्वी पासन चालत आलेला आहे रक्षाबंधनाचा उचव सगळ्यात अगोदर राजा बळीने देवी लक्ष्मीला आपली बहीण मानून देवीकधन रक्षा सूत्र बांधून घेतले होते त्यावेळी देव आणि दानवा मध्ये युद्ध झाले त्यावेळीही इंद्रदेवाने त्याच्या बहिनुकडून हातांत रक्षा सूत्र बांधून घेतले होते

तसेच एकदा श्री कृष्णच्या बोटाला जखम झाली त्यावेळी ते सुभद्र कडे आले तर ती इकडे तिकडे कापड शोधू लागली लगेच भगवंत द्रौपतिकडे गेले आणि द्रौपदीने आपल्या भरजरीच्या साडीचा पदर फाडून श्री कृष्ण भगवंतांच्या हातावर पट्टी बांधली हीच सर्वात पहिली राखी मानली जाते

भावला राखी बांधताना मुहूर्त अवश्य बघावा यावर्षी रविवारी २२ऑगस्ट ला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ९ वाजेपासून १२ वाजेपरेत आणि दुपारी १ वाजून ३० मिनीटा पासून ते दुपारी ३ वाजे परेत आणि संध्याकाळी ६ वाजेपासून १० वाजेपरेत चा असेन बहीण भावना राखी बांधताना भावाला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणूं भगवंतांकडे पार्थना करते

यावर्षी राखी बाधण्यासाठी भरपूर वेळ म्हणजे शुभ मुहूर्त असणार आहे या वर्षी योगही जुळून येत आहे यादिवशी रक्षाबंधन असल्याने हा खुप शुभ संयोग जुळून येत आहे पोर्णिमा तिथीची सुरवात शनिवारी २१ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजेपासून सुरू होणार असून पोर्णिमा तिथीची संपत्ती रविवारी २२ ऑगस्ट ला संध्याकाळी ५ वाजून ३१ होणार आहे

२१ ऑगस्टला शनिवारी संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांन पासून भद्रा सुरू होणार असून २२ ऑगस्ट ला रविवारी सकाळी ५ वाजवून ३७ मिनिटांनी भद्रा संपणार आहे भद्रा मुहर्तात रक्षाबांधन साजरा करू नये म्हणून २२ ऑगस्टला ला सकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनतरच राखी पौर्णिमेचा उचाह साजरा करावा

तसेच २२ ऑगस्ट पासूनच पुडील पाच दिवस पंचकही असणार आहे २२ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ३२ मिनिटांपासून पंचक लागणार आहे ते म्हणजे पुढील ५ दिवस म्हणजे २६ ऑगस्ट परेत असणार आहे परंतु पंचक काळात राखी बधण्याला कोणत्याही प्रकारची मनाई नाही म्ह्णून आपण निश्चिंत मनाने आपल्या भावाला राखी बांधू शकता

या दिवशी काही बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रतही करतात आता आपण जाणून घेऊया राखी बांधण्याची पद्धत कोणती आणि शुभ विधी कसा आहे ते यासाठी बहीण भावाने सकाळी लवकर उठून अगोळ करून नवीन वस्त्र धारण करावी हा सण भावा बहिणीला समर्पित केले असल्याने या दिवशी छान रंगीबेरंगी वस्त्र परिधान करावे

व प्रसन्न तसेच आनंदी राहावे घराची स्वच्छता करावी त्यानंतर मातीच्या घड्याची स्थापना करावी त्यानंतर राखीचे ताट काढावे त्यामध्ये तांदूळ कुंकू एक तांब्या पाणी राखी दिवा आणि एक नाणे आणि आपल्या भावाला आवडती मिठाई ठेव्हावी त्यानंतर एक पाट मांडावा त्यावर आपल्या भावाला बसवावे भावाला पाटावर बसविणे म्हणजे जमिनीपासन तो उंचीवर असेल याचा अर्थ असा की आपल्या भावची प्रगती वरच्या दिशेने व्हावी

पाट मांडताना आशा प्रकारे मांडावा की आपल्या भावाचे तोड पूर्व दिशेला असेल त्यानंतर कुंकुवामध्ये थोडेसे पाणी टाकून त्या ओल्या कुंकवाचा भावाच्या कपाळावर टिळा लावावा त्यावर थोड्या अक्षदा लावून भावाच्या डोक्यावरही अक्षदा टाकाव्यात व नेहमी याचे कल्याण व्हावे याची पार्थना करावी

त्यानंतर भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी व दिवा ओवाळावा म्हणजेच औक्षण करावे औक्षण केल्याने भावाला दिर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्यानंतर एक रुपयांचे नाणे किंवा सोन्याची अंगठी घेऊन भावाच्या कपाळाला लावून त्यावरून उतरवावी यामुळे भावावर वाईट नजर असेल तर ती निघून जाते नंतर भावाला आपल्या हाताने मिठाई खाऊ घालावी

भावणेही आपल्या बहिणीला मिठाई भरवावी बहिणीला नमस्कार करावा आणि तिचा आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या बहिणीला इच्छा प्रमाणे आणि शक्ती प्रमाणे एखादी भेट वस्तू द्यावी राखीचे ताट तसेच सुने ठेऊ नये जास्त काही शक्य नसेल तर निधान ११ रुपये तरी जरूर टाकावे आशा प्रकारे आनंदात रक्षाबंधनाचा सण साजरा करावा

याच दिवशी पूर्वी ब्राह्मणांकडून यजमानांना राखी बांधत असे व ब्राह्मणांना भेट वस्तू म्हणून अन्न धान्याचे दान करत असे रक्षाबंधनचा सण उचहात साजरा करणारे भावा बहिणीच प्रेम जास्त होते व त्याच्या जीवनात यश व किर्तीची प्राप्ती होते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *