नमस्कार मंडळी,
श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला खूप मानले जाते. ती नेहमी घराच्या अंगणामध्ये असते जेणेकरून घरामध्ये येणारे संकटे स्वतः वर घेऊन ती घराचे, घरातील प्रत्येक सदस्याचे रक्षण करत असते.एक देवी समान तिची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे वृंदावन असतेच, काही लोक तुळशीला बालकनी मध्ये ठेवतात तर काहींची घराच्या बाहेर असते.
ज्या तुळशी घराच्या बाहेर आहे त्या तुळशीला एक वस्तू बांधायची आहे. याने घरावर येणारी संकटे त्या वस्तूमुळे आणि तुळशीमुळे घरावर येणार नाही. तुळशी वृंदावन किंवा छोटे रोपटे हे दोन कामे करत असतात एक तर घराचे सौभाग्य , समृद्धी दाखवत असतात. ज्या घराच्या बाहेर तुळशी एकदम बहरलेली असते त्या घरामध्ये समाधान व समृद्धी असते.
तसेच ज्या घराच्या बाहेर तुळशी सुकलेली असते , तिची पाने गळून गेलेली असते तिथे सुख ,समृद्धी नसते. घरामध्ये शांतता नसते, लक्ष्मीचा वास नसतो. घराबाहेर तुळशी नेहमी बहरलेली असावी, टवटवीत असावी. म्हणजेच घरामध्ये कलह नसावेत. वाद विवाद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
देवाची पूजा सतत सकारात्मक गोष्टींनी घर हे भरलेले असले पाहिजे. चला तर जाणून घेऊ कोणती आहे ती वस्तू जी तुळशीला बांधायची आहे. पूजेसाठी जो आपण लाल धागा वापरतो तो घ्यायचा आहे.लाल नसेल तर जो पूजेमध्ये हाताला बांधतो तो असला तरी चालतो. पूजा भांडार मध्ये अगदी सहज उपलब्ध आहे.
तो लाल धागा तुळशीला बांधायचा आहे आता तो लाल धागा कुठे बांधायचा ? तुळशी आपण कुंडीमध्ये किंवा छोटेसे रोपटे असते किंवा तुळशीचे वृंदावन पण असते. जर तुमच्या कडे तुळशीचे वृंदावन असेल तर हा धागा वृन्दावनालाच बांधायचा आहे. किंवा वृंदावन खूप मोठे असेल तर तुळशीच्या रोपाला खालच्या बाजूने हा धागा बांधायचा आहे.
मातीमधून जिथे तुळशी आलेली आहे तिथेच हा धागा बांधायचा आहे.धाग्याचा एकदाच बांधायचा आहे म्हणजे त्याचा कोणताही वेढा तुळशीच्या भोवती नसावा. हा उपाय केल्याने कधीच वाईट शक्ती , वाईट ऊर्जा किंवा नकारात्मक गोष्टी घरामध्ये येणार नाही. कोणाची वाईट नजर घराला लागणार नाही.
कोणी केलेली करणी बाधा ज्याने त्रास होईल , ज्याने अडी अडचणी निर्माण होतील अशी संकटे कधीच घरात येणार नाही. हा उपाय नक्की करून पहा.