Marathi Manus

Stay Up to Date With Us

उंबराला रोज नियमित पने पाणी घाला त्यामुळे जीवनातले आर्थिक प्रश्न दूर होतील वाचा आणखीही अनेक फायदे

नमस्कार मंडळी

सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी, वड, शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान दिले आहे . असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात. या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे आहे त्याला आपण औदुंबर असेही बोलतो .

विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला होता .त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केलेले .लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा त्रास थांबला

या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो . कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे

असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होत असतो . यासोबतच पैशांशी संबंधित समस्या दूर होत असतात . वास्तविक, शुक्र हा संपत्ती आणि ऐषोआरामाचा ग्रह मानला गेला आहे . असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो,

त्याला धन आणि ऐश्वर्य यांची कधीही कमतरता भासत नाही . पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो, तिथे दारिद्रय, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहत असते . चला तर मग आज जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय, जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर होतील

शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी: उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण केल्या जातात . ‘ओम शम शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास खूप मदत होत असते . दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा करायला हवी

समृद्धीसाठी करावयाचा उपाय : शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घाला. ११ प्रदक्षिणा घाला . या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप करा. घरात सुख शांती कायम राहील . ज्योतिष शास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन-संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल,

तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घालावे आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाकावी .

मानसिक स्वास्थ्यासाठी करा हे उपाय : रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन-नामःस्मरण करावे . महिनाभरात तुम्हाला मनःस्वास्थ्य सुधारत असल्याचे दिसून येईल . मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळत असतो . दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी आहे त्याचे सान्निध्य सर्वार्थाने चांगले असते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.