नमस्कार मंडळी,
संध्याकाळची वेळ म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ खूपच महत्वाची असते कारण ह्या वेळी माता लक्ष्मीचे आगमन होत असते. म्हणूनच आपण सर्व संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतो , घरात असणाऱ्या देवांची पूजा करतो. खूप महत्वाची मानली जाते हि वेळ, खूप असे नियम सुद्धा आहेत जे आपल्याला पाळावे लागतात. हे सर्व नीट व्यवस्थित केले तर मातालक्ष्मी नक्की प्रसन्न होऊन घराकडे आकर्षित होऊन सदैव घरामध्ये सुख व समृद्धी राहील.
संध्याकाळच्या वेळी तुम्ही देवाजवळ दिवा लावता, धूप अगरबत्ती लावता सोबत आरती सुद्धा होते. हे सर्व करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून मतलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होऊन तसेच माता लक्ष्मीचा स्थिर आणि स्थायी प्रवास घरामध्ये व्हावा यासाठी नियमित पाने दिवा लावताना हा मंत्र म्हणायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळी घरामध्ये अंधार नसावा. ह्या वेळी खाऊ नये कि पियू पण नये.
ह्या वेळी घरामध्ये झोपायचे सुद्धा नाही, भांडणे वाद विवाद टाळावे. घरामध्ये स्वच्छता ठेवून प्रसन्न वातावरण केले तरच मातालक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये येईल. ह्या काही गोष्टींची विशेष काळजी नाही घेतली तर घरामध्ये आजारपण येते, सतत पैसा खर्च होऊ लागतो, आर्थिक समस्या निर्माण होतात. जेव्हा संध्याकाळी दिवा , धूप लावल्यानंतर ह्या मंत्राचा ३ वेळा पाठ करायचा आहे. मंत्र नीट आणि व्यवस्थित जाणून घ्या –
ॐ चन्दनस्य महत्पुण्यं, पवित्रं पापनाशनम्।
आपदां हरते नित्यम्, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥
या मंत्राचा ३ वेळा उच्चारण करायचे आहे. ह्या मंत्रामुळे तुम्ही माता लक्ष्मी ला घरामध्ये स्थायी होण्याची प्रार्थना करत आहात. हा मंत्र अगदी मनोभावे, कोणताही स्वार्थ न ठेवता , कोणताही नकारात्मक विचार न करता ३ वेळा बोलायचा आहे. संध्याकाळी दिवा , धूप लावून झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल तर अशावेळी फक्त तेलाचा किंवा तुपाचा दिवा न लावता त्या दिव्यामध्ये एखादी काळीमिरी किंवा एखादी लवंग अवश्य टाका.
असे केल्याने तुमच्यावर जे कर्ज आहे ते लवकर निघून जाईल. कितीही मोठे कर्ज असेल ते जाऊन अनेक मार्गानी घरामध्ये पैसा येऊ लागेल. अशाच आर्थिक समस्या असतील , पैसा राहत नसेल तर हा उपाय नक्की करा अगदी मनोभावे करा, माता लक्ष्मी नक्की येईल घरात आणि आपली कृपा सदैव तुमच्या सोबत असेल.