नमस्कार मंडळी,
आज काळ खूप लोकांना असे जाणवले असेल कि पैसा खूप येतो आणि येता येताच थांबतो , परत खूप महिने पैसा येताच नाही.याचा अर्थ असा आहे कि लक्ष्मीची कृपा तर होतेच , लक्ष्मी येते पण तुमच्या हातून अशा काही गोष्टी घडतात चुका घडतात कि लक्ष्मी अप्रसन्न होते आणि मग पैशाचा ओघ थांबतो.नेमके काय चुकीचे घडत आहे हे समझत नाही.
सतत पैसा यावा असे सगळ्यांना वाटते पण लक्ष्मी प्राप्तीचे काही नियम पाळले जात नाहीत.जर तुम्हाला सुद्धा असे काही जाणवत असेल कि पैशाचा ओघ कमी झालेला आहे किंवा पैसा थांबत नाही. अशा वेळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ या वर्षी तुम्ही ५०० , २०० , २००० किंवा कोणत्याही नोटमध्ये हि एक वस्तू नक्की गुंडाळा , हा तर एक तोटका आहे जो दोन देवतांना प्रसन्न बनवतो.
पहिले देवता धनाची अधिपती म्हणजे माता लक्ष्मी जिच्या कृपेशिवाय पैसा कधीच येत नाही आणि दुसरी देवता म्हणजे प्रत्यक्ष या जगाचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू . जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा घरात धनाचा निरंतर प्रवाह सुरु होऊ लागतो. असे तोटके करत असताना कोणाला सांगू नका.
हा उपाय १ जानेवारी च्या दिवशी संपूर्ण दिवसभरात कधीही करू शकता मात्र जी सर्वोत्तम वेळ आहे ती आहे सकाळची या दिवशी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर जरूर उठा , नित्य कर्म आटपून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालून तुम्ही तुमच्या देव घरामध्ये सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे.आणि हि पूजा संपन्न झाल्या बरोबर कोणतीही एक नोट घ्यायची आहे
मग तो १००, २०० कोणतीही असो, जमले तर २००० किंवा ५०० ची घेतली तर अति उत्तम आहे, हि नोट फाटलेली नसेल याची काळजी घ्या , कोरी नोट अतिशय उत्तम असेल. देवघरात बसून समोर पाट ठेवा किंवा एखादे स्वच्छ असा कापड टाकायचा आहे , त्यावर हि नोट ठेवायची आहे , यासाठी तुम्हाला एक हळकुंड लागणार आहे,खराब झालेले हळकुंड नसावे , असे ३ तुम्हाला घ्यायचे असेल.
हि ३ हळकुंड तुम्हाला नोटेवर ठेवायचे आहे, हळकुंड छोटी असतील तर चांगले , ती नोटमध्ये गुंडाळता आली पाहिजे,हे हळकुंड ठेवल्यांनंतर तुम्हाला ओम श्रीम श्रीये नमः हा मंत्र १०८ वेळा जपायचा आहे. एक काळजी घ्या कि या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळा वापरली जात नाही. यासाठी स्फटिकाची माळ किंवा कमळगट्ट्याची माळ अतिशय उत्तम आहे.
ह्या एका मंत्राचा जाप करून झाल्यानंतर दुसरा मंत्र जो आहे तो श्री हरी विष्णूंचा मंत्र ओम नमो भागवतेय वासुदेवाय . या मंत्राचा जप शक्यतो तुळशीच्या माळेवर करावा, या दोन्ही मंत्राचा जप करून झाल्यानांवर मनोभावे हाथ जोडून तुम्ही तुमच्या कुलदैवताला प्रार्थना करायची आहे
कि हे संपूर्ण वर्ष आमच्या जीवनात धन वैभव ऐश्वर्य या सर्वांची परिपूर्ण होउदे,पैशाची कमतरता कधीच भासू देऊ नकोस, त्यांनतर हि हळकुंड नोटमध्ये गुंडाळून त्यावर लाल पिवळा रंगाचा धागा बांधायचा आहे. ३ गाठी मारायच्या आहेत, हळकुंड त्यातून पडणार नाही याची काळजी घेणे जरुरी आहे. हे सर्व झाल्यानंतर हि सर्व सामग्री तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता , जर तुम्हाला फक्त पैसे आवश्यक असतील
तर हि च नोट तिजोरीमध्ये ठेवून द्या ,एक गोष्ट लक्षात ठेवा कि पुढच्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२३ या दिवशी हे हळकुंड आणि धागा तुम्हाला पाण्यात सोडायचा आहे आणि नोट तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हा उपाय नक्की करून पहा ,