Marathi Manus

Stay Up to Date With Us

उद्या अक्षयतृतीया या दिवशी घरात करा हे साधे सोपे उपाय , घरात पैशाची कमी नाही पडणार कधीच..

नमस्कार मंडळी

अक्षयत्रितिया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी श्री हरी विष्णू व लक्ष्मी निमित्त केलेल्या उपायातून अक्षय फळ प्राप्त होते. या दिवशी श्री हरी विष्णू ला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

या पवित्र दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी गायीला हि एक वस्तू खाऊ घाला त्यामुळे माता लक्ष्मी खुश होऊन तुमची सर्व संकटे दूर होतील आणि मनातल्या इच्छा पूर्ण होतील.फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कि हा उपाय करताना मनोभावे आणि खऱ्या श्रद्धेने करायचा आहे.

३ मे अक्षयत्रितिया आलेली आहे. हा दिवस एव्हढा शुभ असतो कि ह्या दिवसामध्ये कधी हि मुहूर्त पहिला जात नाही. नवीन व शुभ कार्याची सुरुवात , लग्न समारंभ या दिवशी केले जातात.या दिवशी केलेले कोणते पण काम सफलच होते, त्यांचे शुभ फळ मिळते. नवीन कार्य हाती घेतलेले असल्यास त्यातून यश नक्कीच मिळते.

या दिवशी दान कर्माचे विशेष महत्व आहे. या दिवशी तुम्ही जलदान, वस्तुदन अथवा अन्नदान सुद्धा करू शकतात.हे दान करून जे पुण्य मिळते ते अक्षम्य असते.या अक्षयत्रितीयेच्या दिवशी माता स्वरूप तुळशी ची सुद्धा पूजा केली जाते. असे मानले जाते कि या दिवशी घरी तुळशीचे नवीन रोप घरी आणले तर साक्षात माता तुळशी घरी येते.

सूर्य व चंद्र उच्च राशीमध्ये असल्या कारणामुळे या दिवशी सूर्य देवाला सुद्धा जल अर्पण करावे.या दिवशी माता लक्ष्मी व श्री विष्णू कुबेर महाराज यांची विशेष पूजा करायची आहे. पितृनची सुद्धा पूजा करायची असते.पित्रुचें स्मरण करून या दिवशी दान कर्म करायचे आहे. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी भगवत गीतेचा १३ व अध्यायाचे वाचन करावे. असे केल्याने आपले पितृदोषातून मुक्ती होते.

अक्षयत्रितीयेच्या दिवशी श्री विष्णूचे मनोमन पूजन करावे , त्यांची पूजा केल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होऊन धन लाभ करवते आणि आर्थिक संकटे दूर होतात. धनाची किंवा घरात जे काही सोने असेल त्याची पूजा करावी किंवा काही नसेल तर एक सिक्का घेऊन त्याची पूजा करून माता लक्ष्मी समोर जरावेळ ठेवून तो लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.

या दिवशी असे बोलले जाते कि कणकेचे १६ दिवे श्री विष्णूंसमोर लावायचे आहे आणि तुपाचा दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे. ह्या दिवशी केलेले हे सर्व उपाय खूप लाभकारी मानले जातात. केलेल्या चांगल्या कामाचे पुण्य खूप पटींनी वाढते. हे सर्व पुण्यफल प्राप्त करायचे असतील तर या पवित्र दिवशी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत कधीही तुमच्या सोयीनुसार गायीचे पूजन नक्की करावे.

गो मातेला लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे. ह्या गो माते मध्ये सर्व देव देवतांचा वास असतो. रोज शक्य नसेल तर ह्या अक्षयत्रितयेच्या दिवशी गायीचे पूजन केले पाहिजे , त्यांना त्यांचा आवडता नैवेद्य दाखवावा .त्या दिवशी जर गायींना तुम्ही गुळपोळी खाऊ घातली किंवा नुसता गूळ खाऊ घातला तरी तुमचे सगळे कर्म फळाला येतील आणि पुण्य मिळेल.

हा उपाय जे लोक करतात त्यांच्या घरी दाही दिशांनी पैसा येतो , घरामध्ये सुख समृद्धी येते. जेव्हा हा नैवेद्य गायीला दाखवता तेव्हा हाथ जोडून तुमच्या सुखासाठी प्रार्थना करा , मनातल्या इच्छा गायीसमोर बोलून दाखवा. हा उपाय नक्की करून पहा , घरामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. घरामध्ये कौटुंबिक सुख प्राप्त होईल. कुटुंबावर येणारे संकटे दूर होतील.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.