नमस्कार मंडळी,
सध्या पवित्र श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना 9 ऑगस्ट 6 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त हजारो किलोमीटरपर्यंत पायी चालत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेत आहे तर काही जण जवळच्या शिवालयांत जाऊन सकाळ-संध्याकाळ भोलेनाथाची पूजा आराधना करत आहे.
या महिन्यात महादेवाची भक्ती करून त्यांना शीघ्र प्रसन्न करून घेता येतं. कारण या महिन्यांमध्ये भगवान शंकर माता पार्वती सोबत पृथ्वीवरती भ्रमण करत असतात.श्रावण महिना हा पूजा आराधना धर्म-कर्म उपवास साधना करण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात भोलेनाथ त्यांना प्रसन्न करण्यासाठी अंतकरणात पासून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला
किंवा त्यांना मनोभावे एक तांब्या जल अर्पण केलं किंवा फक्त फुलं आणि बेलपत्र अर्पण करून देखिल भोलेनाथनां प्रसन्न करून घेता येतंधार्मिक मान्यते नुसार श्रावण महिना हा बारा महिन्यां पैकी शुभ महिना मानला जातो. पण काही उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता. श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल बघायला मिळतील. आजकाल प्रत्येक व्यक्तीला धनप्राप्तीचे जास्तीत जास्त इच्छा आहे. यासाठी प्रत्येक जण रात्रंदिवस मेहनत करत असतो. परंतु अनेक वेळा त्याचा हवं तसं फळं त्याला मिळत नाही.याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाग्य तुमचं भाग्य चांगला असेल तर थोडाफार महिन्यात सुद्धा तुम्ही मालामाल होऊ शकता.
परंतु भाग्य चांगलं नसेल तर मोठं मोठे करोडपती सुद्धा रोडपती बनायला वेळ लागत नाही. हिंदूंच्या मान्यतेनुसार ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो धनाची कधीही कमतरता भासत नाही त्या घरात धनाची आवक वाढत राहते. माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे मग माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय करावे यामुळे माता लक्ष्मीची सदैव तुमच्या घरात वास करेल.
तसं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय आहेत. जसं की घर स्वच्छ ठेवणे माता लक्ष्मीची आराधना करणे माता लक्ष्मी च्या मंत्राचा जप करणे आणि याच बरोबर आणखीन एक उपाय आहे जो तुम्ही श्रावण महिन्यात करून तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न होते. यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य द्वारावर एक वस्तू शिंपल्यांची आहे
त्या मुख्य द्वारातून आपण सतत ये-जा करत असतो. माता लक्ष्मी या प्रवेशद्वारातून तुमच्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे ही खूप महत्त्वाचा आहे तुमच्या घरातील हे मुख्य प्रवेशद्वार आहे ते जास्तीत जास्त स्वच्छ असावा त्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असावी.
जर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर माता लक्ष्मी ही तुमच्या येत नाही दरवाजातूनच परत जाते म्हणूनच घराच्या मुख्य दरवाजावर तीही वस्तू शिंपडल्याने दरवाजा वरील नकारात्मक ऊर्जेचा नास होतो. व जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुमच्या घरातही सकारात्मक उर्जेचा वास येऊ लागतो
सकारात्मक ऊर्जा घरात आली की माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. चला तर मग तुम्ही जाणून घेऊया की कोणता उपाय आपल्याला करायचा आहे जसं सांगितल्याप्रमाणे हा उपाय श्रावण संपायच्या आधी आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला हळदीच्या पाण्याने करायचा आहे. ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे
त्या दिवशी लवकर उठून स्नान करून देवघरात माता लक्ष्मीची विधींगत पूजा करायचे आहे. धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर हळदीचे पाणी बनवायचे आहे यासाठी एक वाटी घेऊन त्यामध्येच पाणी घेऊन थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे. हळदीचा पाणी तुम्हाला घरातील मुख्य द्वारावर शिंपडायचे आहे.
त्याच प्रमाणे घराच्या उंबऱ्या वरी हळदीच्या पाण्याने लेप लावायचा आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी हळदी उपयुक्त मानली जाते त्याचप्रमाणे घरातील नकारात्मक ऊर्जा दुरु करयासाठी हळदीचा वापर केला जातो. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सात्विक बनतात.
ज्या घरामध्ये आनंदी सात्विक वातावरण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी च नामस्मरण केलं जातं. त्या घरात माता लक्ष्मी आगमन करते. माता लक्ष्मीची कृपा झाल्यानंतर त्या घरात धनाची कमतरता अजिबात भासत नाही. या महिन्यात तिचे योग्य फळ तुम्हाला मिळतं. जे काम तुम्ही हाती घेता त्या कामात तुम्हाला यश मिळतं. काय करायला अगदी सोपा आहे
त्यामुळे श्रावण महिना संपण्याआधी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर आल्यानंतर तुमचं भाग्य बदलून जाईल .