कुंभ राशीत मार्गक्रमण होणार शनिदेव या दोन राशींना सुरू होणार अडीचकी, जाणून घ्या उपाय

नमस्कार मंडळी

वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, २७ नक्षत्र आणि १२ राशींचे वर्णन केले आहे . या नऊ ग्रहांमध्ये शनिचे विशेष स्थान असते . या ग्रहाला न्यायाधीशाचा दर्जा असून . शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो . तसेच जेव्हा जेव्हा शनिदेव एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतात तेव्हा काही लोकांवर शनिदेवाच्या अडीचकीचा प्रभाव सुरू होत असतो ,

तर काही राशींवरील प्रभाव दूर होतो. न्यायदेवता शनिदेव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार असून . शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच शनीच्या अडीचकीचा प्रभाव दोन राशींवर पडेल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या दोन राशी…

पंचांगानुसार, सध्या शनि स्वतःच्या मकर राशीत भ्रमण करत असल्याने . या दरम्यान मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर अडीचकीचा प्रभाव असतो. २९ एप्रिलपासून शनि कुंभ राशीत गोचर करणार असून . या राशीत शनिचे भ्रमण सुरू होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना अडीचकीपासून मुक्ती मिळणार आहे .

दुसरीकडे, कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनिच्या प्रभावाखाली येणार आहे . शनि अडीचकीचा कालावधी अडीच वर्षांचा असतो. या काळात शनि व्यक्तीला कर्मानुसार फळ देत असतात . जर कुंडलीत शनि सकारात्मक किंवा उच्च स्थानावर बसला असेल तर शनिच्या नकारात्मक परिणामांमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकतो

शनिदेवांच्या मूर्तीसमोर दिवा लावा: शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास दिवस मानला जात असून . या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून मोहरीचे तेल अर्पण करावे. तसेच त्यांना काळे वस्त्र अर्पण करावे. यानंतर शनि चालिसाचे पठण करावे.

७ मुखी रुद्राक्ष धारण करावे : शनिवारी गंगाजलमध्ये सातमुखी रुद्राक्ष धुवून धारण करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. शनिवारी ‘ओम प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:’ आणि ‘ओम शनैश्चराय नमः’या दोन मंत्रांचा जप करावा . तसेच या दिवशी गरजूंना काहीतरी वस्तू दान करा

शनिवारी उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान केल्याने शनिदेवाची कृपा आपल्यावर राहते बजरंगबलीची पूजा: शनिवारी शनिदेवासह बजरंगबलीचीही पूजा केली जाते. हनुमानजींच्या भक्तांवर शनिदेव नेहमी कृपा करत असतात .

शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करायला हवं . हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केल्याने शनिचे सर्व दोष दूर होतील आणि जीवनातील अडथळे दूर होतील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *