Marathi Manus

Stay Up to Date With Us

२३ नोव्हेंबर अंगारखी संकष्टी चतुर्थी गणेशाला वाहा हे १ फुल , इच्छा ताबडतोब पूर्ण होईल..

नमस्कार मंडळी,

२३ नोव्हेंबर मंगळवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारखी चतुर्थी असे म्हणतात. हे व्रत गणपती बाप्पाशी संबंधित आहे जी व्यक्ती ह्या अंगारखी संकष्टी चतुर्थी चर व्रत करते त्यांच्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होतात. ज्या लोकांची लग्न जमत नाहीये त्यांची लग्न सुद्धा जमतात , संतान प्राप्ती होते. कुटुंबातील व्यक्ती सुखी आणि संपन्न राहतात. कुटुंबातील वाद विवाद मिटतात , परीक्षेमध्ये , करिअर मध्ये यश मिळते.

पराक्रम घडतो , कीर्ती प्राप्त होते.मंगल ग्रहाची उग्रता कमी होते.२१ संकष्टी चतुर्थीच्या एव्हढे फळ हे एका अंगारखी मध्ये मिळते. यामध्ये तुम्ही दिवसभर उपवास करावा आणि रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा हा उपवास सोडावा. ह्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना काही विशिष्ट वस्तू अर्पण करू शकता कि ज्यामुळे श्री गणेश प्रसन्न होतात , हे सर्व केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील . चला तर जाणून घेऊयात हे छोटे छोटे उपाय कोणते आहेत ते-

ज्या लोकांना विवाहसंबधी बाधा आहेत म्हणजे योग्य असे स्थळ मिळत नसेल किंवा जुळून येत नसेल तर अशा लोकांनी गणपती बाप्पाची पूजा झाल्यांनतर ॐ वक्रतुंडाय हुं ह्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा.जर तुमच्या घरात पोवळ्याची माळा असेल तर या माळेवर मंत्राचा जाप करा.विवाह कार्यातील बाधा लवकरच दूर होतात. जर तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेलेली असेल किंवा पत्नीला वश करण्यासाठी लाल हकिक च्या माळेवर तुम्ही ॐ वक्रतुंडाय हुं या मंत्राचा जप केल्यास स्त्री वश होते.

विनंती आहे कि ह्याचा गैरसमझ करून घेऊ नका..ज्या लोकांच्या आयुष्यात खरंच समस्या आहेत कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज असते.हि शक्ती प्राप्त करण्यासाठी शक्ती युक्त गणपती बाप्पाची विधिवत पूजा करा , कुंभाराच्या चाकाची जी माती असते त्या मातीपासून एक गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात आणि त्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन केल्यानंतर १०१ माळा ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं ह्या मंत्राचा जाप करावा किंवा ज्या लोकांना शक्य नाहीये त्यांनी ११ माळा केला तरी चालेल.

असे केल्याने सर्व गोष्टींची प्राप्ती होते .कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळते. त्यांनतर जर तुमच्या जीवनात खूप मोठया प्रमाणात शत्रू वाढलेले असतील , कोणतीही व्यक्ती घरातील असो किंवा बाहेरील, ती जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर अशा वेळी कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन करावे. यामुळे शत्रू शांत होतात आणि शत्रूंचे वशीकरण होते. अनेक जण शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी या अंगारखी संकष्टी चतुर्थी ला हरिद्रा पिष्टी नामक गणपती चे पूजन करतात.

हरिद्रा पिष्टी म्हणजे पश्चिम बंगाल मध्ये जे बगलामुखी गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाचे पूजन केल्यास शत्रूंवर सहजासहजी विजय प्राप्त करता येतो. कडुलिंबाच्या मुळांमध्ये कधी कधी गणपती बाप्पाची मूर्ती तयार होते. या मूर्तीची पूजा करून तिच्या समोर जर हस्ति पिशाचि लिखे स्वाहा ह्या मंत्राचा जाप केला आणि ह्या मूर्ती ला जर लाल चंदन किंवा लाल रंगाची फुले जर चढवली तर शत्रू शांत होतात आणि वाईट शक्ती सुद्धा जवळपास येत नाही.

जर घरामध्ये काही बाधा असेल किंवा कोणी काही केलेलं असेल तर कडुलिंबाच्या मुळांमध्ये निर्मित गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हस्ति पिशाचि लिखे स्वाहा ह्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जाप करा. रुईचे झाड म्हणेज मदार असे म्हणतात , या रुईच्या झाडापासून जी प्रतिमा बनते तिला अर्क काष्ठ प्रतिमा असे म्हणतात. या प्रतिमेचे पूजन केल्यास ऐश्वर्याची प्राप्ती होते. पैसा येतो , धन येते. आर्थिक प्राप्तीचे मार्ग खुले होतात. जीवनात जर मोठ्या प्रमाणात बाधा असतील तर ह्या श्वेतार्क गणपती चे पुजन करावे.

श्वेतार्क म्हणजे पांढऱ्या रुईच्या झाडापासून जी गणपतीची मूर्ती तयार होते. ह्या मूर्तीसमोर २१ वेळा ॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा ह्या मंत्राचा जाप करा. सर्व बाधा नष्ट होऊन प्रत्येक कामात यश मिळू लागते. एक अत्यंत साधा उपाय म्हणजे हे पार्थिव गणेश आहेत पार्थिव गणपती म्हणजे कोणत्या पवित्र स्थानावरून माती गोळा करून त्यापासून मूर्ती तयार करावी.हि माती गोळा करत असताना ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा सातत्याने जप करा. आणि ह्या मूर्तीचे पूजा ह्या दिवशी करा.

हा उपाय केल्याने गणेश प्रसन्न होतात आणि सर्व सिद्धीची प्राप्ती होते. ह्या दिवशी गणपती बाप्पाना उकडीचे मोदक नक्की अर्पण करा आणि सोबतच त्यांची अतिशय प्रिय वस्तू म्हणजे दुर्वा , या २१ दुर्वा मनोभावे अर्पण करा. त्यासोबतच जास्वदीं चे फुल , झेंडू चे फुल अर्पण करण्यास विसरू नका.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.