शनिवारी रात्री झोपताना तळपायाला लावा ही १ वस्तू साडेसाती बाधा अशांती गरिबी निघून जाईल..

नमस्कार मंडळी,

कोणत्याही शनिवार रात्री झोपताना तुमच्या तळपायांना हि एक वस्तू नक्की लावा.याने ३ प्रकारचे लाभ होतात. पहिली गोष्ट म्हणजे घरात अशांती आहे, सतत भांडणे होतात.लोक एकमेकांशी शत्रुत्व भावाने वागतात.तर हि घरातली अशांती , क्लेश , कलह , भांडणे , वाद विवाद यांनी दूर होतात. घरात सुख शांती नंदू लागते.

दुसरी गोष्ट तुमच्या कुंडलीमध्ये जर शनी दोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल , शनीची अंतर दशा किंवा महा दशा चालू असेल. तर हे तमाम प्रकारचे शनी दोष सुद्धा या उपायाने दूर होतात.तुम्ही हा उपाय ३ शनिवार सलग करायचा आहे . ३ पेक्षा जास्त सुद्धा करू शकतात.तुम्हाला त्याने लाभच प्राप्त होईल.

ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारचे त्रास होतात त्या सर्व व्यक्ती रात्री झोपताना हे उपाय करू शकतात. तिसरा लाभ म्हणजे तुमच्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल म्हणजे जर पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल , आजारपणात सुद्धा पैसा निघून जातो किंवा नको त्या वायफळ गोष्टींवर पैसा खर्च होतो.

पैशाची जशी आवक असायला हवी, ज्याप्रकारे पैसा यायला हवा , तो जर जसा तुमच्या उद्योग , धंद्यातून , नोकरीतून किंवा कामातून येत नसेल तर त्या साठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. मात्र शनी दोषामुळे पैशांची आवक थांबलेली आहे किंवा त्याच साठी याचा फायदा होतो. कधी कधी शनी इतर ग्रहांशी दुष्ट युती निर्माण करतो.

जसे कि राहू असेल किंवा केतू असेल किंवा काही शुभ ग्रहांची अशी अशुभ युती तयार होते कि त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये असे काही योग्य निर्माण होतात कि धन प्राप्तीचे योग्य नष्ट होतात. पैसा येता येता थांबतो , पैसा येणार असतो मात्र तो येता येता जर थांबत असेल तर त्यासाठी हा उपाय आहे. या उपायासाठी तुम्हाला जी गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे मोहरीचे तेल.

मोहरीच्या तेलाला हिंदी मध्ये सरसो का तेल असे हि म्हणतात. तर थोडेसे तुम्हाला मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. हे काळे तीळ तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात मिळतील. हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्यानंतर थोडेसे गरम करायचा आहे. जेणेकरुन दोन्ही पदार्थांचा अर्क एकत्र होईल आणि त्यानंतर रात्री झोपताना या तळपायांना व्यवस्तिथ लावायचे आहे.

थोडेसे तेल हे तुमच्या भुवया असतात त्यांना लावायचे आहे. दोन्ही तळपाय आणि दोन्ही भुवयांना हे तेल लावायचे आहे आणि शांत झोपायचे आहे.ह्या बाधा ,हि जी संकटे आहेत , दोष आहेत तत्काळ नष्ट झालेले तुम्हाला दिसून येईल. हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या कुलदैवताचे स्मरण करायला विसरू नका..

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *