नमस्कार मंडळी ,
हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी दोन व्यक्तीच्या कुंडली जोतिषानं दाखवल्या जाते. आणि गुण, राशी यांचा अभ्यास केला जातो.आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या दोन राशीनचं लग्न म्हणजे भांडणच. लग्न करण्यापूर्वी दोन व्यक्तींच्या कुंडलीत ज्योतिष्यांना दाखवले जातात जन्म कुंडली मध्ये ज्योतिषी ग्रह नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जळत असेल तर लग्न केले जाते
पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी वधू-वर यांच्या राशीनचे गुण कसे आहेत हे सुद्धा पाहिले पाहिजेत. पण ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास हि तुमच्या स्वभावातील गुणदोष दाखवत असते. अशावेळी दोन विरुद्ध स्वभाव असणारे राशीच्या व्यक्तींचे लग्न झालं तर काय होईल हेच आपण जाणून घेणार आहोत
तर मग जाणून घ्या त्या व्यक्ती अशा कोणत्या राशी आहेत की ज्यांची लग्न झाली तर त्यांच्यात वादविवाद होऊ शकतात यामध्ये सगळ्यात पाहीली जोडी आहे. कर्क आणि सिंह राशीची ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात
आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात तर सिंह राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचाराचा असतात त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर ते खरे उतरत नाहीत त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते
दुसरी जोडी आहे कुंभ आणि मकर रास कुंभ आणि मकर या दोघांनाही ना त्याबद्दल चांगली समज आहे परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांचे एकमेकांशी पटत नाही. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि कुंभ राशीचे लोक मात्र प्रत्येक निर्णय हे व्यावहारिक पणे घेतात हा फरक त्यांच्यामध्ये संघर्षाचे कारण बनु शकतो.
तिसरी जोडी आहे वृषभ आणि तुला रास या दोन्हींचे लोक अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ मनाचे असतात सुरवातीच्या काळात त्यांचं खूप चांगलं वाटतं दोघांचाही आग्रही स्वभाव त्यामुळे हळूहळू ते दोघे एकमेकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी अग्रह करू लागतात यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते . मग एकदाच नात्यांमध्ये अहंकार आला तर ते नात हळू हळू कमकुवत होऊ लागतं
पुढची जोडी आहे कर्क आणि धनु राशीची कर्क व धनु राशीचे व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही . धनु या राशीच्या व्यक्तींना वेळेनुसार व वेळेसोबत प्रगती करणं चांगल माहिती असतं कर्क राशीच्या व्यक्ती वर याचा कोणताही परिणाम होत नाही त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं त्यामुळे या जोडीच्या जीवनात अनेकदा भांडण व तणाव ची परिस्थिती निर्माण होते
या नंतर ची जोडी आहे मिथुन आणि कन्या मिथुन आणि कन्या या राशि ची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखे आहे कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यवहारिक असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्तीला भावनिक असतात त्यामुळे दोघांचीही माता एकमेकांशी जुळत नाही यांच्यात मतभेद उद्भवतात खूप त्रास झाल्यानंतर जर कधी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर कन्या रास सहाज पुढे जाते. तर मिथुन राशीच्या व्यक्तींना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते.
या होत्या त्या राशींच्या जोड्या ज्यांची लग्न झालंय तर घरात वाद होऊ शकतात त्यामुळे त्यांचे लग्न व्हायचे आहेत आणि त्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे ते लग्न करण्याआधी जोडीदाराच्या राशीचा विचार करू शकतात. पण आता ज्यांचं लग्न झाला आहे आणि आता लक्षात आलं आहे आपल्या राशींचे स्वभाव तर विरुद्ध आहेत.
मग काय करायचं बाकी काहीही असलं तरी नवरा-बायकोचं नातं टिकवण्यासाठी गरज असते ते एकमेकांचा विश्वास आणि प्रेमाची तुमच्या नात्यात जर प्रेम आणि विश्वास असेल. तर मग समंजस पणाने तुम्ही कुठल्याही गोष्टीवर तोडगा काढू शकता आणि तुमच्या नात्याची वीण घट्ट करू शकता