नमस्कार मंडळी ,
साडेसात वर्षाच्या शनी साडेसातीचा अंत झालेली वृश्चिक राशी , अतिशय वाईट परिस्तिथीतून खंबीर उभी राहिलेली अशी हि वृश्चिक राशी , पण आता ह्या राशीच्या लोकांनी आपल्या अडचणींना राम राम बोलायचे आहे आणि प्रगती कडे धाव घ्यायची आहे.
वृश्चिक राशी , मुळातच मनात गोंधळ असणारी राशी , वृश्चिक राशीच्या जातकांसाठी २०२२ ची सुरुवात मध्यम फलदायी असेल, आपले काम पूर्ण करून घेण्यासाठी परिश्रम करावे लागतील तसेच अनेक बाबतीत सुद्धा सक्रिय योगदान करावे लागेल.
अशा वेळी सुद्धा योग्य धीर धरून आपले योग्य निर्णय घ्यावे लागतील.ह्या वर्षी वृश्चिक राशीच्या लोकांना खूप प्रवासाच्या संधी मिळतील , हे प्रवास दूरचे असतीलच असे नाही पण हे संख्यात्मक दृष्ट्या जास्त असतील ज्यायोगे आपणास एक नवीन उत्साह त्यातून जाणवेल.
आपल्या घरात असणाऱ्या वडीलधाऱ्या लोकांना ऋतुजन्य आजार होण्याची शक्यता आहे, त्यांची विशेष काळजी घेणे जरुरी आहे .एखाद्या खटल्यामध्ये अडकले असाल तर या वर्षी निकाल आपल्या बाजूने लागेल , आपल्या जोडीदाराची योग्य साथ मिळाल्याने आव्हानांना सामोरे जाऊ शकाल .आपल्या भावंडाना आपली गरज भासेल तिथे त्यांना सहकार्य करा.
वृश्चिक राशी चे लोक आपल्या रहस्यमय स्वभावामुळे ओळखले जातात, आता ह्याच स्वभावामुळे त्यांना फायदा हि होणार आहे, आपण आपल्या विरोधकांवर सुद्धा मात करू शकाल . आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी तुमची धडपड चालू राहील.
धनप्राप्ती मध्ये स्तिथी अनुकूल असेल , वर्षाची सुरुवात हि साधारण असेल पण शेवटचे काही महिने भरभराटीचे असतील , धनप्राप्तीचा योग असल्यामुळे तुम्हाला धन मिळण्याची शक्यता आहे .
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष प्रेमाच्या बाबतीत चांगले असेल , आपले प्रेम व्यक्त करा. सुरुवाती पासूनच हे वर्ष विवाहित लोकांसाठी उत्तम राहणार आहे , आपल्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होत राहील ,
एकदा मौल्यवान सल्ला मिळेल जो अतिशय उपयोगी असेल . आर्थिक दृष्ट्या हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्याचे ठरणार आहे , नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष अतिशय उत्तम आणि प्रगती कडे नेणारे असेल ,
नोकरी करणाऱ्या लोकांना सुरुवातीचे काही महिने अति परिश्रम करण्याची गरज भासेल , आळशी पणा करून चालणार नाही , शनी हा तिसऱ्या स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे आपल्या कामाकडे थोडे जास्त लक्ष देणे जरुरी आहे पण ऑगस्ट नंतर तुमचे चांगले दिवस येतील आणि केलेल्या कष्टाचे फळ सुद्धा मिळेल.
वृश्चिक राशीच्या विद्यार्थींसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी अधिक मेहनत करावी लागेल . परदेशी शिकायचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थींसाठी एप्रिल आणि सप्टेंबर अनुकूल आहे , त्यानुसार योग्य अशी तैयारी करून ठेवावी .
आरोग्यासाठी २०२२ वर्षाची सुरुवात थोडी चिंताजनक असणार आहे , एप्रिल , मे पर्यन्त विशेष काळजी घेतली पाहिजे , आरोग्य सामान्य राहील पण केतू च्या आगमनामुळे मधे मधे तुमची परीक्षा घेतली जाईल ,
योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्यास वर्षाचे शेवटचे महिने हे अतीशय उत्तम जातील. एकंदरीत हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक संधी घेऊन येणार आहे , विशेष अशी काळजी घेऊन संधीचे सोने करा. सर्वच बाबतीत उत्तम असे हे वर्ष असेल
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.