नमस्कार मंडळी.
कर्ज काढण्याची इच्छा कुणाचीच नसते.मात्र कधीकधी आपली मजबुरी असते आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं. नंतर परिस्थिती अशी बनत जाते की आपल्याला या कर्जाचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येत नाही. हळूहळू या कर्जाचा डोंगर आपल्यावर निर्माण होतो. या कर्जाच्या ओझ्याखाली अनेक जण दबून जातात.
काय करावे ते सुचत नाही. श्री स्वामी समर्थांनी कर्जा विषयी सांगितलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत.माणसाला जीवनात मध्ये घरा साठी गाडी साठी किंवा एखाद्या कामा साठी कर्ज कधी ना कधी घ्यावे लागते. बऱ्याचदा असं होतं की आपण घेतलेले कर्ज हे फिटत नाही कर्जाचे हप्ते नियमित जात नाही.
कर्जाचा डोंगर नियमित वाढत जातो. पण बाही खूप वाईट वेळ समजली जाते एकदा माणसाने कर्ज घेतलं तर त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य वाईट परिस्थितीत जाते समस्येत संकटात जाते.त्यासोबतच त्याच्या परिवाराला सगळं सहन करावं लागतं कर्ज घेणार माणूस कमावतो कमी आणि फेडतो जास्त अशी परिस्थिती होते म्हणून कर्ज असेल तर हा तोडगा करा याने कर्ज लवकर मुक्त होईल
तुम्ही या संकटातून बाहेर पडाल कर्ज नसेल तर तरी हा तोडगा करा पुढे कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाहीं खूप चमत्कारी शक्तिशाली हा उपाय आहे.जो श्री स्वामी समर्थांनी कर्जा विषयी सांगितलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितले आहेत. श्री स्वामी समर्थ म्हणतात की कर्ज काढण्यासाठी मंगळवारचा दिवस कधी निवडू नये.
मंगळवारी घेतलेले पैसे किंवा मंगळवारी घेतलेले कर्ज हे लवकर फिटत नाही. कर्ज घेण्यासाठी मंगळवारचा दिवस अशुभ आहे. जर आपण कर्ज घेतलेले आहे. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी फेडण्यासाठी मंगळवारचा दिवस निवडा मंगळवारी आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड केली किंवा हप्ता भरले तर ते कर्ज लवकरात लवकर संपून जाते.
मंगळवार प्रमाणे शुक्रवार सुद्धा कर्जफेड करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. याचबरोबर काही काही छोटी-मोठी असे ज्योतिषी उपाय आहे त्यामुळे आपण लवकर कर्ज फेडू शकतो. श्री स्वामी समर्थ असे म्हणतात की तुम्ही जर कुणाकडून कर्ज घेतले तर पाच हजार रुपये त्वरित देऊन टाका.
समजा तुम्ही कोणाकडे एक ते दीड लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्यातूनच पाच ते दहा हजार रुपये ते कर्ज परतफेड करण्यासाठी वापरा असे केल्याने कर्ज लवकर कमी होते. ज्योतिष शास्त्रामध्ये भगवान श्रीगणेशांना कर्ज मुक्ती साठी अत्यंत महत्त्व असे मानले गेले आहे. असं म्हणतात की जी व्यक्ती गणेशांची पूजा करते त्यांना दुर्वा अक्षद वाहते त्या व्यक्तीचे कर्ज लवकरात लवकर कमी होते.
तुम्हाला दर बुधवारी गणेशाचा दिवस बुधवार मानला जातो म्हणून दर बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेस देवघरासमोर बसून श्री गणेश स्तोत्र वाचायचे आहे स्वामी समर्थांच्या नित्य पोथीत दिले आहे किंवा याचे वेगळे पुस्तकमिळते हे वाचायचे आहे आणि हात जोडून कर्ज मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे .
सुख समृध्दीसाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय झाला यानंतर एक तोडगा करा यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या घरात एक किंवा अर्धा किलो मसूरडाळ घेऊन याआणि रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर एक चिमुटभर मसूर डाळ उचलून छतावर ठेवा सांगितले जाते की मसूर डाळ जो दान करतो त्याच्यावर कर्ज घेण्याची वेळ येत नाही. ही दोन कामे रोज करायची आहेत याने कर्जमुक्ती मिळेल.
श्री गणेश यांप्रमाणेच आपण हनुमानाची सुद्धा विधिवत दर मंगळवारी पूजा करा. श्री हनुमान यांना दर मंगळवारी प्रसादा बरोबरच दोन लवंग ही अर्पण करा. यामुळेसुद्धा कर्जमुक्ती लवकर कमी होते.कर्ज लवकर फेडल जातं.श्री स्वामी समर्थ म्हणतात की बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे उसने देऊ नये. कारण बुधवारी दिलेले पैसे हे परत येत नाही.
हे पैसे शक्यतो बुडतात. तसेच या पैशांची वसुली करण्यास प्रचंड त्रास होतो. मग पैसे कोणत्या दिवशी द्यावे.तर गुरुवार हा दिवस कोणास उसने पैसे देण्यासाठी अत्यंत चांगला आहे. जर तुम्ही गुरुवारी एखाद्याला पैसे उसने दिले तर ते पैसे परत मिळण्याची हमी असते.तसचे ज्योतिष शास्त्रामध्ये गुलाबाचा एक उपाय सांगितलेला आहे
हा गुलाबाचा उपाय केल्याने कर्जफेडीसाठी अत्यंत शुभ असा परिणाम दिसून कर्ज लवकर फिटते. आपण पाच गुलाबाची फुलं घ्यावेत ही फुलं कोणत्याही प्रकारे सुकलेली नसावी. त्याची प्रत्येक पाकळी ही त्या त्या ठिकाणी असायला हवी.ही पाच गुलाबाची फुले हातामध्ये घेऊन आपण आपल्या देवघरासमोर बसावे. आणि गायत्री मंत्राचा केवळ एक वेळा जप करावा.
आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही १०८ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. त्यानंतर आपल्या हातामध्ये असणारे ही ५ गुलाब आपल्या जवळपासच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडून द्यावेत प्रवाहित करावे.मग तो स्त्रोत एखादी नदी असेल सरोवर असेल ओढा असेल तरीही चालेल. शक्यतो पाणी वाहतं असवा.
जर तुमच्या जवळपास पाणी वाहतं नसेल तर तुम्ही एखादं मोठं भांडं घेऊन त्यात पाणी भरलेले असेल असं घ्या त्यामध्ये ही गुलाबाची फुले सोडून द्या.त्यानंतर हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता.हा उपाय सुद्धा कर्ज मुक्ती साठी मोठ्या प्रमाणात केला जातो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील लवकरात लवकर
कर्ज फिटण्यासाठी लागणारे परिश्रम कष्ट आपणास करण्याची ताकद स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम असू दे श्री स्वामी समर्थ अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.