नमस्कार मंडळी,
तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू तुमच्या जीवनावर प्रभाव टाकत असते. काही वस्तूंचा प्रभाव सकारात्मक असतो , चांगला असतो. तर काही वस्तू मात्र तुमच्या जीवनात , तुमच्या भाग्यावर विपरीत परिणाम करत असतात.
जर वेळीच या वस्तू घराबाहेर काढल्या नाही तर कालांतराने ह्या वस्तूंच्या अनिष्ठ प्रभावाने तुमच्या घरामध्ये वाद विवाद , अशांती पसरणे किंवा सतत दुःख , आजारपण येणे अशा नकारात्मक गोष्टी घडून येताना दिसतात.
पती पत्नी मध्ये प्रेम जर कमी होत आहे , सातत्याने भांडणे होत असतील , किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत असेल तर तुमच्या बेडरूम मध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.
आज असेच काही नियम पाहणार आहोत , अशा काही वस्तू तुमच्या बेडरूम मध्ये असतील ज्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम घडवत आहे तर अशा वस्तुंना वेळीच बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेक लोक शोभेच्या वस्तू म्हणून काटेरी झूडपे ठेवतात . हि झूडपे दिसायला अत्यंत सुंदर असतात. मात्र त्यांच्या प्रभाव हा पती पत्नीच्या सुखी जीवनावर पडतो आणि म्हणून काटेरी झूडपे तुमच्या परिसरामध्ये किंवा घरात अगदी बेडरूम मध्ये सुद्धा ठेवू नये.
तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये चित्र विचित्र आकाराच्या वस्तू ठेवलेल्या असतील काही धारदार वस्तू ठेवलेल्या असतील , या गोष्टींचा सुद्धा थेट प्रभाव पती पत्नीच्या आयुष्यावर व्यक्तिगत प्रभाव पडत असतो.
जर तुमच्या बेडरूम मध्ये एखादी भिंत ओली होत असेल किंवा ओलेपणा होत असेल तर त्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते. घरात रोगराई निर्माण होते.
बेडरूम चा रंग हा कोणत्या हि स्वरूपात भडक नसावा. भडक रान शक्यतो टाळावा. बेडरूमचा दरवाजा किंवा मुख्य दरवाजा , घरात लावलेले पंखे ते जर उघडताना आवाज करत असतील तर त्वरित तेल घालून हा आवाज बंद करावा.
घरामध्ये भांड्यांचा आवाज शक्यतो कमी करावा. या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवतात.पती पत्नी मध्ये असणारा प्रेम भाव कमी करतात.
गृहिणींनी एक गोष्ठ लक्षात ठेवायची आहे स्वयंपाक घरामध्ये जी शेगडी असते आणि जो पाण्याचा साठा असेल या दोन गोष्टींमध्ये अंतर ठेवा. या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध कार्य करत असतात.
घरामध्ये किंवा बेडरूम मध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्य प्रकाश आला पाहिजे याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. हवा जर ईशान्य दिशेकडून येत असेल तर ती उत्तम मानली जाते.
बेडरूम मध्ये कोणताही पाण्याचा साठा असू नये एखादी पाण्याची बाटली चालेल पण मोठा साठा असू नये.वस्तू शास्त्रानुसार बेडरूम मध्ये माश्यांचा टॅंक ठेवणे सुद्धा हानिकारक मानले जाते.
ह्यामुळे पती पत्नी मध्ये भांडणे होऊन ते एव्हढी मोठी होतात कि घटस्फोटापर्यन्त गोष्टी जातात. घरात कुठेही अडगळ ठेवू नका. तुमचे घर म्हणेज एक मंदिर आहे याची काळजी घ्या.
घरामध्ये देवी देवतांचा वास असतो म्हणून घरामध्ये मोठ्याने बोलणे वाद करणे किंवा कोणाविषयी वाईट बोलणे चुकीचे आहे.अनेक बेडरूम मध्ये कपात किंवा आरसे असे लावलेले असतात
कि बेड वर पडलेल्या व्यक्ती त्या मध्ये दिसतात बेडवर बसून तुम्ही जर त्या आरशामध्ये दिसत असाल तर हे एक कारण वादाचे असू शकते. आरसा तिथून काढून टाकावा आणि ते नसेल जमत तर तिथे एखादा पडदा लावावा.
बेडरूम मध्ये सौम्य गुलाबी रंग असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव पती पत्नीच्या प्रभावावर पडू शकतो. झोपताना दक्षिणेकडे तोंड असेल असे झोपावे.