सकाळी उशिरा अंघोळ करणाऱ्या महिलांनी एकदा नक्की बघाच….

नमस्कार मंडळी,

आपल्या दैंनंदिन जीवनात तुम्ही नित्य नियमाने काही गोष्टी करत असता . हे जसे काही आपल्या जीवनाचा भागच बनलेला असतो आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी दैनंदिन जीवनात काय करावे कसे वागावे काय करु नये कसे वागू नये हे विविध धर्मग्रंथातून त्यांच्या वागणुकीतून रोजच्या वर्तणुकीतून सांगून ठेवले आहे.

त्याप्रमाणेच आपण आपले नित्य कार्य करत असतो ह्या गोष्टी अगदी सध्या सरळ वाटतात परंतू ह्या गोष्टीं मध्ये खूप काही अर्थ दडलेला आहे पण आपण त्याकडे लक्ष देत नाही त्यामागील अर्थ शास्त्र समजून घेत नाही सगळे करत आहेत ना मग आपण पण तेच करायचे असे आपले जीवन चालू असते. ह्या बाबींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला

तर असे लक्षात येईल कि आपल्या पूर्वजांनी साधू संतांनी ऋषीमुनींनी जे काही नित्य नियम पाळायला सांगितले ते खूप अभ्यास करून आखून दिलेले नियम आहेत. हे सगळे संस्कार आपल्या साठी खूपच लाभदायक आहेत त्यातीलच एक सवय म्हणजे स्नान करणे. स्नान करणे हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे

स्नान केल्याने आपले शरीर तर स्वछ होतेच पण आपले मन हि प्रसन्न होते स्नान करण्याने आपल्याला खूप फायदे होतात हे तर माहित आहेच . शास्त्रा नुसार स्नान करणे हे एक उत्तम आणि महत्वाचे कार्य आहे परंतु आपल्याला हे माहित नाही कि स्नान करण्याची एक वैशिष्ट वेळ आणि एक विशिष्ट पद्धत असते आपल्याला हे माहित नसल्यामुळे आपल्याला मनात येईल

आपल्याला वेळ मिळेल तेव्हा स्नान करतो परंतु हे खूप चुकीचे आहे असे केल्याने आपल्याला फायदा तर होत नाहीच पण त्यामुळे आपले नुकसानच होते. आपला धर्मग्रंथ गरुडपुराण ह्यामध्ये आपल्या नित्य कर्माच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक गाठीचे त्यामध्ये वर्णन आलेले आहे त्यानुसार आपण आता जाणून घेणार आहोत कि कितीप्रकारचे स्नान आहे

तसेच कोणती वेळ स्नाना साठी उत्तम आहे तर चला आधी जाणून घेऊ स्नानाचे कोण कोणते प्रकार आहेत ते. शास्त्रानुसार स्नानाचे पाच प्रकार आहेत ब्रह्मस्नान, देव स्नान, ऋषी स्नान, मानव स्नान, दानव स्नान असे पाच प्रकार आहेत हे सर्व प्रकार त्यांची वर्गवारी ही वेगवेगळ्या वेळेनुसार केलेली आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्म मुहूर्तावर केले गेलेले स्थान हे सर्व श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे.

ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्री चा शेवटचा प्रहर म्हणजेच पहाटे तीन ते चार ची वेळ ही स्नानासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. यावेळी वातावरणात खूप शुभ आणि सकारात्मक अशी ऊर्जा पसरलेली असते कारण ही वेळ भगवंताची वेळ असते म्हणून यावेळी भगवंताचे नामस्मरण करता करता केल्या जाणाऱ्या स्नानाला ब्रह्म स्नान म्हटले जाते

यावेळी स्नान करून लगेच सूर्यदेवाला जल दिल्यास जीवनात सुख समृद्धी शांती आयु आणि आरोग्याची प्राप्ती होते दिवसभर आपले मन उत्साही आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. स्नानाचा दुसरा प्रकार म्हणजे देव स्नान सकाळी चार ते पाच च्या मध्ये जे स्नान केले जाते त्यास स्नानाला देवस्थान म्हटले जाते सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करता करता केल्या जाणाऱ्या स्नानाला ही खूप महत्त्व आहे

आणि हे स्नान हि खूप पवित्र मानले गेले आहे या वेळी स्नान केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि अस्वच्छता निघून जाते. अशा प्रकारे देव स्नान केल्यास आपल्या शरीराबरोबर मनही प्रसन्न होते तिसरे स्नान म्हणजे ऋषी स्नान ज्यावेळी सकाळी सकाळी सूर्योदयापूर्वी आकाशात चांदण्या दिसत असतात

त्या वेळी केल्या जाणाऱ्या स्नानाला ऋषी स्नान म्हटले जाते हे स्नान ही खूप श्रेष्ठ स्नान मानले जाते त्या वेळी स्नान केल्यास आपल्याला मानसिक शांतता लाभते . चौथे स्नान आहे मानव स्नान सकाळी सहा ते आठ या दरम्यान केला जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान म्हटले जाते. हे स्नान मुख्यत्वे सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते ह्या स्नानालाही श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे

या स्नानामुळे ही आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आपला दिवस हा खूप आनंदी जातो पाचवे स्नान म्हणजे दानव स्नान सकाळी आठच्या नंतर जे स्नान केले जाते त्याला दानव स्नान म्हटले जाते. आपल्या शास्त्रात ह्या स्नानाला खूप चुकीचे मानले गेले आहे आठच्या नंतर वातावरणात पसरलेली दैवी ऊर्जा ही खूप कमी झालेली असते

यामुळे आपल्याला दिवसभर आळसवाणे तसेच कंटाळवाणे वाटत राहते म्हणून दानव स्नानाला खूप वाईट किंवा चुकीचे स्नान मानले गेले आहे म्हणून सकाळी आठ नंतर कधीही स्नान करू नये ज्या स्त्रिया सकाळी आठ नंतर स्नान करतात अशा स्त्रियांच्या नशिबात कायम दुर्भाग्य राहते त्यांच्या घरातून सुख-समृद्धी ही निघून जाते.

काही लोक तर दुपारी बारा नंतर स्नान कतात. खूपच अशुभ मानले जाते बारानंतर स्नान करणारी व्यक्ती कायम चिडचिड करत राहते मानसिक दृष्ट्या खचलेली खंगलेली वाटते त्यांच्या आयुष्यात खूप नकारात्मकता भरून राहते अशा व्यक्तींच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात गरुड पुराणात आपण किमान ब्रम्ह स्नान देव स्नान ऋषी स्नान किंवा किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे.

दररोज लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नानकेल्याने तसेच सूर्यदेवाला जल दिल्यास सुख समृद्धी लाभते चला तर जाणून घेऊया स्नान करताना कोणता मंत्र म्हटला पाहिजे स्नान मंत्र आहे. गंगेचं यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनिधीम कुरुम ह्या श्लोकाचा अर्थ आहे कि सर्व सप्त नद्यांनी माझ्या स्नानाच्या पाण्यात यावे आणि माझे सर्व पाप नष्ट करावे.

अश्या प्रकारे स्नान केल्यास खूप पुण्य लाभते आणि आयष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि सकारात्मकता येते जर आपल्याला हा मंत्र येत नसेल तर फक्त नद्यांची नावे घेतली तरी चालतील तर हे होते स्नानाचे प्रकार ह्या शिवाय भस्म स्नान मृत्तिका स्नान पर्जन्य स्नान असे आणखी काही प्रकार स्नानाचे असतात.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *