रविवार ची सुट्टी कशी सुरु झाली ? नसेल माहित तर वाचा एकदा…

नमस्कार मंडळी,

आज पासून रविवार ची सुट्टी बंद , रविवार ची सुट्टी बंद आणि दिवसाचे १२- १३ तास काम करायचे ते हि सलग , जेवणासाठी सुद्धा सुट्टी मिळणार नाही , ह्या गोष्टी खूप भयानक आहे ना !! मनाला अगदी भारावून आणि भयभीत करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. पण १३० वर्षा पूर्वी हीच परिस्तिथी भारतामध्ये होती

भारतातील कामगारांना १३ ते १४ तास काम करायला लागायचे , आठवड्यातून ७ हि दिवस त्यांना राबवून घेतले जायचे. एखाद्या गुराढोरा सारखे त्यांचे जीवन होत.जर तुम्ही भारताच्या बाहेरील परिस्थती पहिली तर जे ख्रिस्ती लोक होते , ज्या देशामध्ये ख्रिस्ती लोक खूप होते तिथे ते लोक रविवारच्या दिवशी चर्च मध्ये जायचे म्हणून त्या दिवशी सुट्टी असायची.

मुस्लिम देशांमध्ये पाहायचे ठरवले तर त्या देशांमध्ये सुद्धा शुक्रवार चा दिवस प्रार्थना करण्यासाठी राखून ठेवला जायचा. शुक्रवार हा सुट्टीचा दिवस असायचा भरायचं मुस्लिम देशांमध्ये. भारताची परिस्तिथी फार बिकट होती. आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते आणि एका हि दिवशी सुट्टी नव्हती.

अशा वेळी या कामगारांच्या हाल अपेष्ठा लक्षात घेऊन एक समाज सुधारक नारायण मेघाजी लोखंडे या व्यक्तीने १८८४ साली बॉम्बे मिल असोसिएशन या संस्थेची स्थापना केली . आणि फॅक्टरी कमिशन कडे मागणी केली कि या पुढे कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळायचा हवी. रोज हे जे १३ – १४ तास कामाचे आहेत , यामध्ये किमान अर्धा तासाची सुट्टी हि जेवणाची सुट्टी असावी.

ह्या अशा मागण्या लगेच मान्य नाही झाल्या इंग्रजांनी सुद्धा हि मागणी मान्य नाही केली मात्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल ७ वर्ष संघर्ष केला , या मागणीचा पाठ पुरावा केला हि लढाई ते लढले आणि त्यांनतर २४ एप्रिल १८९० रोजी हजारो कामगारांनी मोठा मोर्चा काढला. मोर्च्याचे यश म्हणून काहीच दिवसात म्हणेज १० जून १८९० पासून ब्रिटिश सरकारने कामगारांना रविवार ची सुट्टी जाहीर केली

आणि हि सुट्टी आज आपण उपभोगत आहोत ह्याचा कुठे हि नियम नाहीये , याची कुठेही सरकार दरबारी नोंद नाही. मात्र तरी सुद्धा रविवार चा दिवस हा सुट्टीचा दिवस आहे अशी प्रथा निर्माण झाली. ग्रामीण भागामध्ये रविवार ला ऐतवर असे म्हंटले जाते. खूप लोकांना माहित नाहीत कि ऐतवर असे का म्हणतात.

रविवार हा रवी म्हणजे सूर्याशी संबंधित वार आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार रवीचे एक नाव आहे आदित्य आणि म्हणून या रविवार ला आदित्यवर असेही म्हणतात. आदित्यवर चा उच्चार हा बोलीभाषेमध्ये बदल होऊन झाला ऐतवर. आणि म्हणूनच ग्रामीण भागात रविवार ला ऐतवर असे म्हणतात.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *