नमस्कार मंडळी
तुम्ही आयुष्यात कितीही प्रयत्न केला तरी वाट्याला दुःख येत असेल निराशा येत असेल टेन्शन येतं असेल. तर कुठे ना कुठे तुम्ही या सहा चुकां पैकी कोणती ना कोणती चूक करत असाल. करणं या सहा चुका करणारा माणूस या वर्षी नाही तर आयुष्यभरासाठी दुःखात आणि टेन्शनमध्ये राहील करणं जो कोणी हे सहा मार्ग निवडतो तो दुःखाचा दिशेने वाटचाल करत असतो.
असं म्हणता येणार नाही की आपण या सहा चुका मुद्दाम करतो पण कधी कधी आपल्या कडुन चुकून आपल्या हातातून या चुका होतात. आणि शेवटच्या दोन चुका तर आजच्या काळात दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या चुका ज्या केल्याने आपल्याला दुःख होते.
पहिले चुक आहे आपल्या घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगणे प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे-मोठे वादविद होतच असतात. पण तुम्ही घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांना जाऊन सांगत असाल तर तुम्हाला पश्चाताप केल्या शिवाय काहीही शिल्लक राहणार नाही. करणं बाहेरची लोक तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा मजाक बनवतील त्याचा फायदा घेतिल खास करून नवरा बायको मधल्या गोष्टी बाहेर चुकून सुद्धा सांगू नये.
सहानभूती मिळण्याच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी बाहेर सांगता. पण समोरचा त्या लायकी चा नसेल तर त्या गोष्टीला मीठ मिरची लावून चारचौघांमध्ये सांगून त्या गोष्टी चा बोभाटा करेल. आणि तुमच्या आयुष्यातून सुख शांती निघून जाईल. म्हणून आतापासूनच तुमच्या पर्सनल गोष्टी घरातल्या गोष्टी घरापर्यंत सिमित ठेवा. हा तुम्हाला मार्गदर्शन हवा असेल तर एखाद्या योग्य व्यक्तीकडून नक्की सल्ला द्या. बाकी तुम्ही समजदार आहात.
दुसरी चूक आहे दुसऱ्याची निंदा एन्जॉय करणे आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतातच त्यामुळे आपल्यामध्ये दोष असताना दुसऱ्याची निंदा करणे अत्यंत चुकीचे आहे. तुमच्या समोर जर कोणी दुसर्याची निंदा करत असेल दुसऱ्यांचे वाईट बोलत असेल. आणि तुम्ही त्याचा आनंद घेत असाल. तर कुठे ना कुठे तुम्ही मनामध्ये निगेटिव्हिटी पेरत असतात. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांबरोबर राहतात जे नेहमी दुसऱ्यांची निंदालस्ती करतात.
सतत दुसर्याची चेष्टा करतात तर तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांबरोबर राहणे सोडून द्या जरा अश्या लोकांबरोबर राहणे मजबुरी असेल तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. थोडक्यात ज्या लोकांनाच्या बोलण्यामुळे तुमच्या मनावर निगेटिव्हिटी निर्माण होते अशा लोकांपासून लांब रहा.
तिसरी गोष्ट आहे. घडून गेलेल्या गोष्टींची आठवण करून दुखी होत राहणे. गेली दोन वर्षे अशी होती की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईट वेळ घडून गेली. कुणाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले कोणी आपल्या जवळील व्यक्तींना गमावले. कुणाची नोकरी गेली कुणाचा व्यवसाय बुडाला अशा अनेक दुखद घटना घडून गेल्या
परंतु आता तो काळ भूतकाळात जमा झाले आहे. कारण जे काही घडले त्यामध्ये आता बदल करणे शक्य नाही. त्यामुळे सतत त्या गोष्टी आठवून दुःख करत बसणे. आपल्याला तर दुःखी करतेच तर आपल्या आजूबाजूचे लोकं सुद्धा अशाने सुखी राहू शकत नाही. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टीतून शक्य असल्यास शिकवण घ्या आणि पुढे चालत रहा.
चौथी चूक आहे वेळेचा आदर न राखणे वेळ ही वाळूसारखी आहे जी आपल्या हातातून निसटत जाते. जेव्हा आपल्याला याची जाणीव होती तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा आपल्याकडे पुरेसा वेळ शिल्लक नसतो. आज तुम्ही वेळेचा आदर केला नाही तर उद्या वेळ तुमचा आदर करणार नाही. त्यामुळे फालतूमध्ये खर्च करू नका.
आज अनेक साधने आहे जी तुमचा वेळ खाण्यासाठी तयार आहे एक लक्षात ठेवा गेलेला पैसा आपण परत कमवू शकतो पण गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही. त्यामुळे नंतरच्या आयुष्य हे पश्चाताप आणि दुःखद घालवायचे नसेल तर वेळेचा आदर करायला शिका आता सुद्धा या क्षणाला वेळ निघून चालली आहे.
पाचवी चूक आहे आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करणे आजकालच्या काळात माणसाचे सर्वात मोठे दुःख हे स्वतःचे दुःख नाही तर दुसऱ्याच सुख बघून दुःखी होणे हे आहे. जेव्हा लोकं आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करतात. तेव्हा त्यांना वाटते समोरचा आपल्या पेक्षा जास्त खुश आहे. आज फेसबूक ,इन्स्टा च्या काळात हे सर्रास चालू आहे. या जगात असं कोणीच नाही की त्याला आयुष्यात काही समस्या नाही दुःख नाही
कारण सुख दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. दुसरी गोष्ट सोशल मीडिया वरती लोकं वेगवेगळे फोटो टाकत असतात ते सर्वच खूष असतील असे नाही . वास्तवता वेगळी असू शकते. अशी अनेक लोक आहेत की ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी फोटो टाकत असतात. त्यामागचं खरं कारण हे वेगळेच असतं आपला आयुष्य सुंदरतेने टिकवायचं असेल तर आपली तुलना दुसऱ्या बरोबर करणे हे बंद करा.
सहावी चूक आहे दुसऱ्या कडून जास्त अपेक्षा ठेवणे जेवढ्या पण दुसऱ्या कडून जास्त अपेक्षा ठेवतो तेवढे आपण जास्त दुखी होतो. कारण असे म्हणतात अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. आता आपल्या मनात अशी शंका येईल की आपल्या जवळची माणसं कडून अपेक्षा ठेवायच नाही का तर ती जरूर ठेवा पण आग्रह धरू नका कि ती अपेक्षा पूर्णच होईल कारण त्रास तुम्हालाच होणार आहे.
आता तुम्हीच विचार करा आता बायकोने अपेक्षा ठेवली की नवऱ्याने माझा प्रत्येक फोन उचलला पाहिजे माझ्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय दिला पाहिजे. माझ्या प्रत्येक फोटोला लाईक केले पाहिजे. मला रोज गजरा आणला पाहिजे मला रोज फोन करून माझे विचारपूस केली पाहिजे वैगरे वैगरे यापैकी एक जरी अपेक्षा पूर्ण झाले नाही.
तर दुखी कोण होणार आहे. हा नियम नवऱ्याला सुद्धा लागू होतो. त्यामुळे समोरचा कडून कमी अपेक्षा ठेवा. अपेक्षा ठेवायची असेल तर स्वतः कडून ठेवा. कारण ते पूर्ण करण्याचे नियंत्रण तुमच्या हातात आहे. या होत्या सहा चुका जर तुम्हाला दुःखात आणि टेन्शन मध्ये ठेवतात.