नमस्कार मंडळी,
मकरसंक्रांतीच्या आधी येणाऱ्या दिवसाला भोगी असे म्हणतात. खरतर मकरसंक्रांतीचा सण ३ दिवस चालतो.पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत , चला तर जाणून घेऊयात भोगी काय प्रकार आहे, २०२२ या साली १३ जानेवारी गुरुवारच्या दिवशी भोगी आलेली आहे.
याच दिवशी पुत्रदा एकादशी सुद्धा आहे. न कायी रोगी तो सदा भागी अशी म्हण आहे , थोडक्यात भोगी हा खाण्या पिण्याचा , उपभोगाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून घर आंगण परिसर साफ स्वच्छ करावा. दारासमोर सुंदर रांगोळी काढावी.
घरातील सर्व लोकांनी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करावे , अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून अंघोळ करण्याची पद्धत अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भोगीच्या दिवशी विशेष करून महाराष्ट्रामध्ये भोगी ची मिक्स भाजी केली जाते. तिला भोगीची भाजी , लेकुरवाली भाजी केंगट अशी विविध नवे आहेत.
सोबत भाजरीची भाकरी सुद्धा तीळ लावू केली जाते. या भोगीच्या भाजी सोबत आणि भाकरी सोबत लोणी पापड , वांग्याचे भरीत चटणी , खमंग खिचडी इत्यादी पदार्थ आपल्या कडे करण्याची प्रथा आहे. अनेक ठिकाणी मुली आपल्या माहेरी जातात. आणि या भोगी सणाचा आनंद साजरा करतात.
भोगी साजरी का करतात? या दिवशी इंद्र देवाने धर्तीवरती उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. आणि म्हणून हि पिके वर्षानुवर्षे अशीच चांगली पिकात राहावी , शेतामध्ये चांगली पीकपाणी यावे अशा प्रकारची भोगी साजरी होते. यादिवशी अनेक राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून होळीमध्ये काही वस्तूंची आहुती सुद्धा दिली जाते.
या दिवशी करण्यात येणारी जी भोगीची भाजी असते ती खूप पौष्टिक असते , स्वादीष्ट असते. खरतर हे हिवाळ्याचे दिवस , या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या येतात, शेतीला नवीन बहार आलेला असतो आणि म्हणून या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या भाजरीचं भाकरी यांचा आस्वाद घेतल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.
हीच जी आपल्याला संपूर्ण वर्षभर कार्य करण्यास सज्ज करते. हा भोगी चा सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत भर साजरा केला जातो. तामिळनाडू मध्ये याला पोंगल असे म्हणतात , आसाम मध्ये भोगली भिऊ , पंजाब मध्ये लोहिरी आणि राजस्थान मध्ये उत्तरावण नावाने हा सण साजरा केला जातो.
मकर संक्रांतीच्या आधी येणारी हि भोगी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा हा दिवस आहे. आणि मकर संक्रांतीला वर्षभर जे काही चुकले असेल ते तिळगुळ देऊन क्षमा मागण्याचा दिवस वर्षभर तुमच्या नात्यातला गोडवा असाच टिकून राहावा अशा शुभेच या दिवशी दिल्या जातात.