नमस्कार मंडळी
ज्योतिष शास्त्र मध्ये कन्या रास ही राशिचक्रातील सहाव्या स्थानावर येणारी रास आहे. ती स्त्री रास आहे. तिचा स्वामी बुध आहे. या राशीचे चिन्ह आत मध्ये फूल घेतलेली एक स्त्री आहे.सर्व बारा राशीच्या तुलनेत कन्या राशि चौकस आणि चिकिस्तक राशी आहे. यांच्या भाग्योदय ३२ व्या वर्षी होतो.
कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्वकांक्षी असतात प्रत्येक गोष्टीच्या मागे का कशासाठी कुठे कशाला हे प्रश्न नेहमी त्यांना सतावत असतात.तसं पाहायला गेलं तर बोलकी अशी ही रास आहे. मनाला पटेल ते काम कन्या राशीचे लोक करतात. दुनियादारी कशी करायची हे या राशीला उत्तम प्रकारे माहिती असते.
आपले योग्य त्याच्या बळावर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. आपली बाजू किंवा आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला पटवून देणे हे या राशीच्या व्यक्तींना चांगल्या प्रकारे जमते.यांचे राहणीमान अगदी साधं असत. जास्त फॅशनच्या मागे या राशीचे लोक लागत नाही. फॅशनच्या बाबतीत वेगळेपणा करण्याचा या राशीचा कल असतो.
बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो.निरीक्षण क्षमता आकलन क्षमता या राशीच्या लोकांनी मध्ये फार उत्तम प्रकारे दिसते. या राशीच्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीबद्दल माहिती करून घेणे आवडते.मात्र स्वतः बद्दल फार तर समोरच्या व्यक्तीला ते सांगत नाहीत. थोडीशी घाबरट आहे. पटकन समोरच्या सोबत ओपन होत नाही.
शिक्षण आणि व्यवसाय मध्ये हवं ते ध्येय गाठल्या नंतरही त्यांच्या स्वभावातील चांगुलपणा कमी होत नाही. पैशाची किंमत या राशींना उत्तम प्रकारे समजते. पैसे कुठे कधी किती खर्च करायचे या संदर्भात चांगली माहिती असते.याची जी निर्णय क्षमता असते ती थोडी कमजोर असते. कारण नम्रता हा यांचा स्वभाव एकूण आहे.
सर्व गोष्टींची माहिती असून सुद्धा निर्णय घ्यायची वेळ आली की थोडे मागे-पुढे होतात. जर का निर्णय घेऊ शकत नाही. तर दुसऱ्या व्यक्तीवर कधीच लगेच विश्वास ठेवत नाहीत. कन्या राशीच्या लोकांना लवकर क्रोध येत नाही आणि आला तर तू लवकर शांत होत नाही.या राशीचे लोक समोरच्या व्यक्तीबद्दल सर्व काही जाणून घेतल्यानंतर सुद्धा विश्वास ठेवायचा का नाही
याबद्दल त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते. एखाद्या ठिकाणी प्रवासाला जायचं असेल तर त्या ठिकाणबद्दल सर्व माहिती काढूनच प्रवास करतात.या राशीच्या व्यक्तीने कोणतीही गोष्ट हाती घेतात कि ती गोष्ट अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कन्या राशीचे लोक हे भाषण देण्यामध्ये आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यामध्ये माहीर असतात.
व्यवसाय या राशीच्या लोकांना सहसा जमत नाही. कारण व्यवसाय म्हणजे रिस्क आणि रिस्क या राशींच्या तत्वात बसत नाही.कमिशनचे व्यवसाय किंवा मार्केटिंग बद्दलचा व्यवसाय या राशींना अतिशय उत्तम प्रकारे जमतात. बारा राशीपैकी ही एक अशी आहे जी कमिशनचा बिझनेस उत्तम प्रकारे सांभाळू शकते.
मित्रांनो या राशीच्या व्यक्तींना तुम्हाला प्रपोज करायचं असेल तर एका वेळेत काम होणार नाही.त्यासाठी तुम्हाला स्वतःची एक चांगली इमेज तयार करणे जरुरी आहे. तुमचं वागणं बोलणं या राशीला पटलं तरच ती राशी ठरवेल की तुमच्या सोबत नातं सुरु करायचं की नाही. एक तर ही राशी लवकर विश्वास ठेवत नाही. आणि निर्णय पण पटकन घेत नाही.
त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला याबाबतीत वाट पाहावी लागते. आणि उशिरा का होईना जर होकार आला. तर जशी तुमची आता इमेज आहे तशीच इमेज तुम्हाला त्यांच्या समोर ठेवावी लागेल. जसे जर तुम्ही आधी होता तसेच राहणे जरुरी आहे.जर कारण त्याने तुमच्या वागण्या बोलण्यात बदल झाला तर हे राशी तुमच्यापासून विलग होण्याची सुद्धा शक्यता असते.
या राशींचा पैशांचा गणित आहे ते उत्तम प्रकारे दिसून येते. आपल्या जोडीदाराची खूपच जास्त काळजी या राशीचे लोक करतात. तुम्ही जर का या राशीच्या प्रेमात असाल.तर तुम्ही कुठे जाता काय करता काय करणार असे बरेच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणे सुरू करावे लागेल. या राशीचे लोक एवढे प्रश्न विचारतात. याचा अर्थ तुमच्यावर संशय घेणे असे नाही.
त्याचा तुमच्यावर प्रेम आहे. ती तुमची काळजी घेते.त्याला तुम्ही संशयाचे नाव घेऊन चालणार नाही. या राशीच्या प्रेमात असाल तर प्रेमाची पुढची पायरी म्हणजे लग्न. लग्नासाठी या राशीच्या व्यक्ती थोडी घाई करु शकतात. मित्रांनो तुमच्या नात्यात जर भांडण झालं तर या राशीच्या व्यक्तीचे माफी मागून काही फरक पडत नसतो.तुम्ही जे चूक केली आहे.
त्याबद्दल त्यांना चर्चा हवी असते. आणि ती गोष्ट पुन्हा होणार नाही असे त्यांना दिसले पाहिजे. तुम्ही शब्दांचा खेळ करून माफी मागाल तर त्यांच्यावर काहीच फरक पडणार नाही. ज्या गोष्टीमुळे चूक झाली त्यात त्यांना सुधारणा दिसणे जरुरी आहे.सुधारणा दिसली तरच त्या व्यक्तीचा राग जातो. कन्या राशीचे प्रेम संबंध यशस्वी होत नाही.
जवळच्या लोकांसोबत यांचे वाद चालूच राहतात. ही कन्या राशीच्या प्रेमाबद्दल होती. कन्या राशीचा पार्टनर सुद्धा कन्या राशीचा असेल तर या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.हे लोक धार्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात. या राशीचे लोक भरपुर प्रवास करत असतात. या राशीचे कोणत्याही राशीच्या व्यक्ती बरोबर अगदी सहजरीत्या मैत्री होऊ शकते.