नमस्कार मंडळी,
श्री स्वामी समर्थ तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल किंवा स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल कि स्वामींच्या सेवेमध्ये त्यांना रोज नैवेद्य दाखवायचा असतो. जेवण करायच्या वेळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवतच असाल.
स्वामी ज्यांनी पूर्ण सृष्टी निर्माण केली , ज्यांच्या हातून एक हि चूक नाही झाली ह्या सृष्टीला घडवताना. जे आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात , सर्वाना आपलेसे करून ठेवतात , अशा स्वामींना तुम्ही रोज नैवेद्य दाखवताच असाल पण जर नसेल दाखवत तर किमान गुरुवारच्या दिवशी हा नैवेद्य स्वामींना दाखवावा.
गुरुवारच्या दिवशी कधी पण तुम्ही हा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे . जर रोज तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर रोज सुद्धा करायला काही त्रास नाहीये. स्वामींचा वार हा गुरुवार आहे, ह्या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते. चला तर जाणून घेऊयात कोणता आहे
तो नैवेद्य जो स्वामींना खूप आवडतो आणि त्यांची कृपा होते. हा नैवेद्य आहे गोडाचा म्हणजे काहीही , पुरणपोळी , शिरा पुरी किंवा खीर आणि पुरी यापैकी जे जमेल ते गुरुवारी करायचे आहे आणि स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर हा नैवेद्य जमत नसेल करायला
तर फक्त एक चपाती , एका वाटीमध्ये दूध आणि साखर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणजेच तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गोड नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामी हे जगाचे कर्ते आहेत , आपल्या भक्ताने प्रेमाने आणि पूर्ण भक्तीने विश्वासाने केलेले सर्व काही ग्रहण करतात.
पण त्यामध्ये काही चुकीची भावना नको आहे, आपुलकीने तुम्ही स्वामीसाठी काही करत आहेत हे जास्त महत्वाचे आहे. स्वामी नक्कीच तुमचा हा प्रेमाने दिलेला नैवेद्य ग्रहण करून खुश होतील आणि स्वामींची कृपा दृष्टी सदैव तुमच्यावर राहील.