पूजेचा दिव्यात काजळीला फुलाचा आकार आला तर काय घडते?

नमस्कार मंडळी

आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो. कधीकधी आपण पाहतो दिव्याच्या वातीला वर काजळी आलेली असते त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार गुलाबाच्या फुला सारखा असतो तर कधी हा आकार कमळाच्या फुला सारखा असतो दिव्यांमध्ये आहे काळा रंगाचे फूल का बनते त्याचे काय महत्त्व आहे.

कधीकधी दिवा शांत झाला त्यानंतर हे फुल बनते तर कधीकधी दिवा चालु असताना त्यामध्ये हे फुल तयार झालेले आपल्याला दिसते.याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का ज्या बद्दल ची पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया दिव्यात फुल का बनते. दिव्यात फुल बने हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्ट देवतांची कृपा आपल्यावर झाली आहे.

आपण इष्ट देवांची जी काही पूजा करत आहोत. जी काय उपासना करत आहोत भगवंतापर्यंत पोहोचता आहे आणि भगवंत आपल्यावरती प्रसन्न झालेले आहेत दिव्या चे फुल रोज बनत नाही. दिवा आपण दररोज लावतो मग फुल का दररोज बनत नाही. असा प्रश्न अनेकांना पडतो. मग देवाची कृपा आपल्यावर नाही का भगवंतांनी आपली पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते

परंतु भगवंता आपल्याला कोणत्याही गोष्टींचे संकेत दररोज देत नाही दोनचार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्न याचे संकेत देत असतात म्हणून दिव्यात फुल तयार झाले नाही तर नाराज होण्याचे काहीही कारण नाही आता आपण जाणून घेऊया या तयार झालेले फुल ते काय करावे . दिव्या चे फुल बनते ते अलगद काढून घ्यावेत

त्या दिव्यांमध्ये असणारे तेल किंवा तूप काढून त्या तेलात किंवा तुपात मध्य मिस करावे . त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळावर लावा. यामुळे भागवतांचा आशिर्वाद आपल्या सोबत राहील. आपल्याला आसपास एक सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवेल. आपल्याकडे सर्व जण आकर्षित होतील आपले प्रत्येक काम बिना अडथळ्याचे व यशस्वी पूर्ण होईल.

आपण जर हा टिळा आपल्या कपाळी लावला तर आपल्यावर कुणाची वाईट नजर आपलं कोणी काहीही वाईट करणार नाही. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आपण सर्व वाईट व नकारात्मक ऊर्जा पासून लांबच राहु. जर भगवंत चा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *