मेष राशीत बुधादित्य योग, ‘या’ राशींसाठी शुभ काळ असणार

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी युती होत असते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो . मेष राशीमध्ये एक अतिशय शुभ बुद्धादित्य योग तयार झाला आहे.

ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे , पण तीन राशींसाठी हा शुभ काळ आहे.  वैदिक दिनदर्शिकेनुसार, सूर्य ग्रहाने १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला असून . या आधी ८ एप्रिलला बुध मेष राशीत आला होता. दुसरीकडे, बुध ग्रह २५ एप्रिलपर्यंत मेष राशीत असणार आहे .

अशा स्थितीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे मेष राशीत बुधादित्य योग तयार झाला आहे.  ज्योतिषशास्त्रात सूर्याला प्रतिष्ठेचा कारक मानले जाते. तर बुधाला बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा दाता म्हटले जाते. त्यामुळे या योगाचा परिणाम जनजीवनावर दिसून येईल.

जाणून घेऊया कोणकोणत्या लोकांना याचा लाभ मिळू शकतो.

मिथुन राशी : बुधादित्य योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे . कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत अकराव्या भावात बुधादित्य योग आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न v यासोबत वाढणार आहे उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होणार आहे .

नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नवीन करार निश्चित केले जाणार आहे . तसेच व्यवसायात नफाही चांगला राहणार आहे . तसेच मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ मिळणार आहे

कर्क राशी : तुमच्या संक्रमण कुंडलीत दशम भावात बुधादित्य योग असून . त्यामुळे या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तसेच, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळणार आहे किंवा तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नती मिळणार आहे .

या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. यासोबतच या काळात तुमची कार्यशैलीही सुधारणार आहे . त्यामुळे बॉस तुमच्यावर खूश राहू शकतो. तसेच तुम्हाला राजकारणात यशही मिळणार आहे . म्हणजे तुम्ही कोणतेही पद मिळवू शकणार आहे

मीन राशी : बुधादित्य योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण बुधादित्य योग तुमच्या दुसर्‍या स्थानात असणार आहे . या स्थानाला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे .

तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्यांचे करिअर भाषणाशी निगडीत आहे, त्यांच्यासाठीही हा काळ चांगला जाणार आहे. वाहने आणि जमीन-मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी वेळ उत्तम असणार आहे .

तुम्हाला राजकारणात यश मिळणार आहे . दुसरीकडे, मीन राशीचा गुरु ग्रह स्वामी आहे आणि सूर्य-बुध गुरू ग्रहाशी मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *