श्रावण सोमवार व्रत कसे करावे ? तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण होती

नमस्कार मंडळी

श्रावण महिन्यात अनेक व्रत केले जाते या पवित्र महिन्यात व्रत उपाय आणि पूजन केले जाते ज्यामुळे तुम्हाला कितीतरी त्याचे अधिक पटीने त्याची फळे प्राप्त होतात तसे तर महादेव हे भोळे आहेत ते भगताच्या थोड्या पूजनाणे भगतावर प्रसन्न होतील आणि आपल्या कृपेचा वर्षाव करतात

पण काही जास्त मिळवायचे असेल तशी भक्तीही असावी लागते त्यासाठी भक्त महादेवाना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे व्रत व पूजन करतात आणि महादेवांचा आशीर्वाद मिळवतात काही व्यक्ती नक्तव्रत करतात नक्तव्रत म्हणजे दिवस भर उपवास करावा आणि जेवण करून उपवास सोडावा

हा उपाय संपूर्ण श्रावण भर केला जातो जर दिवस भर निरकर उपवास करणे शक्य नसेल तर एकदा फळहार करून पाणी घेतले जाते व उपवास केला जातो हे व्रत करताना महादेवा बरोबरच प्रत्येक वराबरोबरच त्यात्या देवतेचे पूजन केले जाते

जसे रविवार सूर्य देव सोमवार महादेव मंगळावर देवी बुधवार गणपती बाप्पा गुरुवारी श्रीहरी विष्णू शुक्रवारी देवी शनिवारी हनुमान किंवा शनिदेवा याचे पण पूजन महादेवाच्या पूजने बरोबरच पूजन केले जाते काही व्यक्तीना महिनाभर उपवास करणे शक्य नसते

मग ते सोमवारी महादेवाच्या प्रिय वारी दिवस भर उपवास करतात आणि सायंकाळी भोजन करून उपवास सोडतात तसेच शनिवार हा हनुमंताचा वर आहे व हनुमान हा रुद्राचे म्हणजेच शिवाचे अवतार असल्याने शनिवारी उपवास करून सायंकाळी जेवण करून उपवास सोडला जातो

काही व्यक्ती श्रावण महिन्यात दुर्वा गणपती व्रत करतात कारण या चातुर मासात शिवपरिवारातील सर्वांचे पूजन करून प्रसन्न करण्याचे विधान आहे हे व्रत तीन किंवा पाच वर्षांचे असते जे प्रत्येक श्रावण महिन्यात केले जाते

यासाठी चौरंगावर सर्वत्र भद्र मंडळ कडून त्यावर गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली जाते दुर्वा बेलाची पाने आघाडा शमी इत्यादी पाने फुले अर्पण केली जातात गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष व गणेश मंत्राचा जप केला जातो

सवासनी स्त्रिया सुयोदम वर्णसृष्टी करतात यासाठी विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ वर वाण ठेऊन स्त्रियांना ते वाण दिले जाते व जलाशयात ही सोडले जाते संकष्टी चतुर्थी हे गणपतीचे व्रत आहे

या व्रताचा प्रारंब ही श्रावण महिन्यातील चतुर्थी तिथी पासून करतात तर काही व्यक्ती मघ महिन्यातील चतुर्थी पासून पण करतात श्रावण महिन्यातील घरोघरी विविध धर्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते

या महिन्यात श्री नवनाथ भक्ती सार या ग्रंथाचे पारायण करतात किंवा दररोज नित्य नेमाने एक ते दोन अध्याय वाचून श्रावण महिन्यात पारायण पूर्ण करावे तसेच सुलबभागवत या ग्रंथाचे ही पारायण करावे

तसेतर भगवंत गीता या संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तरी खुप उत्तम पण आजकाल संस्कृत अवघड जाते सुलबभागवत भक्ती सार हे मराठीत समजावून सांगितले असल्याने वाचलेले लक्षात येते

व वाचायलाही गोडी येते महादेवाच्या पिंडीवर स्त्री पुरुष वृद्ध सर्वजण संस्कृत मराठी वृद्ध शिवकवच शिवमहिना स्तोत्र मंत्र म्हणून रुद्र अभिषेक करतात

दरोरोज निश्चित वेळ ठरवून त्या वेळेला अभिषेक करावा आपण जर भगवनता वेळ दिलेली असेल तर त्या वेळी देव तिथे उपस्थित राहतात या रुद्राभिषेकासाठी साखळी पद्धत वापरली जाते व संध्याकाळी सगळ्यांच्या वतीने एक व्यक्ती बेलाची पाने महादेवाना अर्पण करतो

श्रावण महिन्यात शेवटच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर दही भाताचे लेपण करून जितके व्यक्ती रुद्राभिषेकेत सहभागी असतील ते सर्व जण 108 बेलाची पाने महादेवांना अर्पण करतात सामुदायिक 108 नामावली अर्पण करतात

या दिवशी नैवैद्य म्हणून कुरम्याचे लाडू केले जाते त्यानंतर आरती केली जाते प्रसाद म्हणूंन लाडू दहीभात लेपणाचा प्रसाद वाटलं जातो अशी संपूर्ण महिनाभर अवर्णनीय अमृततुल्य स्वर्गतुल्य आनंद देणारी सेवा केली जाते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *