नमस्कार मंडळी
सध्याच्या काळात नोकरी मिळणे हे खूप कठीण झाले आहे आणि म्हणून अनेक लोक अनेक तरुण मंडळी व्यवसायाकडे वळलेली आहे, अनेक प्रकारची दुकाने उभी करतात. दुकान तर आहे पण त्यात गर्दी होत नाही , ग्राहकांची संख्या खूप कमी आहे , वस्तूंची विक्री सुद्धा होत नाही,
धंदा बुडतोय का काय अशी परिस्तिथी निर्माण झालेली आहे. जर तुमच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर एक छोटीशी मूर्ती तुमच्या दुकानांमध्ये किंवा वस्तूस्थळी तुम्ही नक्की घेऊन या. तुमच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागेल.
तुम्ही विक्री हि आपोआप वाढू लागेल. ग्राहक येऊ लागतील.कदाचित तुम्ही तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली असेल
किंवा त्यांचा फोटो बसवलेला असेल जर नसेल बसवलेला तर बसवून घ्या. आणि ज्यांनी फोटो किंवा प्रतिमा बसवलेली असेल त्यांच्यासाठी महत्वाची माहिती गणपती बाप्पाचे जे मुख आहे ते अमृतासमान आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या शुभ गोष्टी आहेत.
मात्र गणपती बाप्पांची हि पाठ असते ती मात्र नकारात्मक असते तिथे दारिद्र्य वास करते. गरिबी असते आणि म्हणून तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या मधोमध तुम्ही श्री गणेशांची प्रतिमा , फोटो जर लावलेली असेल
तर ताबडतोब एक छोटीशी गोष्ट करायची आहे अगदी तशाच प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊन या आणि तो तुमच्या चौकटीच्या आतल्या बाजूने , बाहेरून जो फोटो लावलेला आहे बरोबर त्याच्या पाठीमागे तुम्ही तो फुटलं लावायचा आहे.
आता हा फोटो लावल्यानंतर गणपती बाप्पांचे तोंड हे तुमच्या दुकानाकडे होईल आणि पाठ जाईल बाहेरून लावलेल्या गणपती बाप्पाच्या पाठीकडे , गणपती बाप्पाच्या पाठीचा दोष घालावयाचा हा सर्वोत्तम उपाय आहे.
तुमची अशा प्रकारे या दोन मूर्ती या ठिकाणी लावून पहा. जेव्हा ग्रहण तुमच्या दुकानात येतात तेव्हा बाहेर जो गणपती लावलेला असतो त्याचा लाभ या येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांसाठी होतो.
त्याचा लाभ तुम्हाला होत नाही. ती जी लक्ष्मी आहे तिचा लाभ तुम्हाला न होता त्या ग्राहकांना होत असतो. मात्र जेव्हा तुम्ही आतल्या बाजूने श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती लावता तेव्हा तुमच्या दुकानात सुद्धा लक्ष्मीची वृद्धी होऊ लागते.
तुमच्या दुकानात सुद्धा लक्ष्मी येऊ लागते. ग्राहकांची रांग लागते. ग्राहकांची संख्या वाढू लागते , गर्दी वाढू लागते. मात्र या मूर्ती लावल्यानंतर या दोन्ही मूर्तींची नित्यनियमाने दुकान उघडल्याबरोबर पूजा करणे गरजेचे आहे.
फार महत्वाचे आहे.हो गोष्ट तुम्ही नक्की पाळा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या व्यवसायाची , दुकानाची भरभराट नक्की होईल , तुमचा फायदा होईल. गणपती बाप्पाचा कृपेने तुमच्या दुकानात सुख समाधान , भरभराट येईल .