Marathi Manus

Stay Up to Date With Us

२९ एप्रिल नंतर या ३ राशी वर शनिकृपा होणार आहे.

नमस्कार मंडळी

शनि महाराजांना राशी परिवर्तन करायला अडीच वर्ष लागतात. २९ एप्रिल रोजी शनी मकर राशीचं कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.शनि ग्रह २९ एप्रिल रोजी कुंभ राशीतून भ्रमण करेल. कुंभ ही शनिमहाराजांची स्वतःची रास आहे. ३० वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनि राशि परिवर्तनाचा सर्वच राशीवर मोठा प्रभाव पडेल.

काही राशी सनीच्या साडेसातीच्या प्रभावा खाली असतील तर काहींना शनिच्या साडेसाती पासून मुक्ती मिळेल. कर्मफळ देणारा शनि ग्रह २९ एप्रिल रोजी कुंभ राशीतून भ्रमण करेल. ३० वर्षांनंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी बदलामुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो.

२९ एप्रिल रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि ५ जून रोजी परत मागे जाईल. यानंतर १२ जुलै रोजी मकर राशीत जाईल आणि १७ जानेवारी २०२३ पर्यंत येथे राहील. शनीच्या राशी बदलाने मीन राशीच्या लोकांवर साडेसाती सुरू होईल. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

तर दुसरीकडे धनु राशीच्या ज्या लोकांना गेल्या सात वर्षांपासून समस्यांचा सामना करावा लागत होता त्यांना आता आनंद मिळणार आहे.कुंभ राशीतील शनीचे संक्रमण धनु राशीच्या लोकांवर चालत असलेल्या शनीच्या अर्धशतकातून सुटका होईल. यासोबतच त्यांना धनलाभ होण्याचे चांगले संकेत आहेत.

या राशीच्या आजारी लोकांना आजारापासून मुक्ती मिळेल आणि जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्तीचा लाभ होईल. धनु राशीच्या लोकांना त्यांचे नशीब त्यांना पूर्ण साथ देईल. याबरोबरच ज्यांच्या लग्नात अडथळे येत होते ते अडथळे आता दूर होतील. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी ज्यांच्यावर शनि महाराजांच्या राशी बदलाचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

शनिमहाराज कर्मफळ दाता आहे.व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ शनिमहाराज देत असतात. शनि महाराजांच्या वक्रदृष्टी ला तर सर्वच घाबरतात. पण ज्यांची कर्म चांगले असतात त्यांच्यावर शनिमहाराजांची कृपादृष्टी सुद्धा होत असते.या तीन राशींमध्ये सर्वात पहिली रास आहे मेष रास

मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप अशुभ राहील. कुंडली मध्ये लाभ आणि उत्पन्नाचा स्थान असलेल्या अकराव्या घरात शनीचे भ्रमण होईल. शनी शनिच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचे उत्पन्नामध्ये वाढ होईल. नोकरदारांच्या पगारात ही वाढ होईल. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. करिअरमध्ये प्रगती दिसेल. विशेषता राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांना खूपच फायदा होईल. यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास

वृषभ राशी: शनीचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मजबूत फायदा देईल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात नोकरी बदलायचे नसेल तर प्रमोशन आणि इन्क्रिमेंट सुद्धा होऊ शकतात. करिअरमध्ये नवनवीन संधी मिळतील. तुमचं काम अधिक चांगलं होईल त्यामुळे तुमचं कौतुकही होईल. व्यापारी नवीन क्षेत्रामध्ये व्यापाराचे नवीन संधी शोधून काम सुरू करतील. ज्यामुळे त्यांना चांगलाच फायदा होईल. तिसरी रास आहे धनु रास

धनु राशी: धनू राशीच्या लोकांची शनिच्या साडेसाती पासून सुटका होणार आहे. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होतास धनु राशीच्या लोकांना साडेसाती पासून मुक्ती मिळेल. आणि हा त्यांच्यासाठी फार मोठा दिलासा असेल. इतके दिवस त्यांचे अडकलेले कार्य पूर्ण होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल.शत्रुंवर विजय मिळेल घर आणि गाडी चे सुख मिळेल.

व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल आणि अनपेक्षित धनलाभ सुद्धा होईल. शनि महाराजांची कृपा मिळवायचे असेल तर गोरगरिबांना दानधर्म करावा. त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात आणि व्यक्ती वर भरभरून कृपा करतात.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.