Marathi Manus

Stay Up to Date With Us

वृश्चिक राशीचे संपूर्ण वर्षाचे भविष्य – चैत्र २०२२ पासून फाल्गुन २०२३ पर्यंत नक्की वाचा

नमस्कार मंडळी

राशीचक्रातील सर्वात गूढ आणि गुंतागुंतीची राशी म्हणजे वृश्चिक राशी. हे नवीन वर्ष या वृश्चिक राशीला कसे जाईल आणि त्यांनी या वर्षाचे नियोजन कसे करावे हे पाहुयात. चैत्र महिन्यात सुरुवातीला वृश्चिक राशीच्या लोकांना सामाजिक जीवनात त्रास होणार आहे. सरकारी कार्यालयात एखादे काम असेल तर त्या कामाबाबत सुद्धा तुम्हाला त्रास होणार आहे.

या महिन्यात खर्चाचे प्रमाण मर्यादित ठेवावे नाही तर तुमचे खर्चाचे प्रमाण कोलमडू शकते. वृश्चिक राशी मुळातच महत्वकांक्षी राशी आहे. विशेषतः या राशीचे तरुण जास्त महत्वकांक्षी असतात. वैशाखात पौर्णिमेपर्यंत भावनांवर नियंत्रण ठेवावे. मनाविरुद्ध एखादी घटना घडली तरी संयम ठेवा आणि शक्य तेव्हा वाद टाळावा.

खास करून तुमच्या प्रिय व्यक्तीशी अजिबात वाद घालू नका. पौर्णिमेनंतर मात्र गुरु शुक्र या ग्रहांची तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे. कोर्टातल्या एखाद्या प्रकरणाचा निकाल या महिन्यात लागणार असेल तर तो निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. या महिन्यात तरुणांची शिक्षणामध्ये प्रगती होईल. महिन्याच्या शेवटी वृश्चिक राशीच्या महिलांना थोडा विरोध होऊ शकतो.

ज्येष्ठामध्ये वृश्चिक राशीला वेगळे फळ मिळणार आहे. व्यवसायामध्ये नेहमीच मोठी झेप घेणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यापाराचे हे स्वप्न साकार होईल.पौर्णिमेच्या आसपास मोठी उलाढाल होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. एखादी आनंदाची बातमी कानावर येईल. संतती ची इच्छ बाळगून असणाऱ्या दाम्पत्यांना गुरूच्या भ्रमणामुळे संतती चा योग निर्माण होईल.

कामाच्या ठिकाणी तुमचे महत्व आणि वर्चस्व वाढेल.मात्र या महिन्यात बेकायदेशीर व्यवहार आणि व्यसनापासून चार हाथ लांबच राहा. आषाढ मध्ये गुरु शुक्राचे भ्रमण तुमचे भाग्य चमकवणार आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेले विवाह या महिन्यात मार्गी लागणार आहे. पौर्णिमेच्या आसपास घरामध्ये मंगल कार्य घडतील.

स्वतंत्र व्यवसाय करणार्यांना व्यवसायात मोठा लाभ होईल. श्रावण महिन्यात सुद्धा तुमच्या राशीला छान साथ मिळणार आहे. मात्र या महिन्यात २ गोष्टी नक्की करा , एक म्हणजे शासनाचे सर्व नियम आवर्जून पाळा आणि दुसरे म्हणजे कोणत्याही कामासाठी मध्यस्थी घेऊ नका.

जे काम करायचे आहे ते तुम्ही स्वतः करा. राजकारणामध्ये असणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांनी थोडे जपून राहा कारण ह्या महिन्यात शेवटी राजकीय शत्रूपासून त्रास होऊ शकतो. भाद्रपदामध्ये तुम्हाला शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. वास्तुविषयक व्यवहार पूर्ण होतील.घरामध्ये चैनीच्या वस्तूची खरेदी होईल.

राहणीमान उंचावेल. उत्तरार्धात मोठा मान सन्मान मिळेल. व्यवसायिकांना व्यवसायात मोठा लाभ होईल.अश्विन महिन्यात सुद्धा तुम्ही मेहनत चालूच राहणार आहे. सरकारी कामांमध्ये मोठे यश मिळेल. व्यापारी वर्गाने या महिन्यात जोखमीचे काम करू नयेत कार्तिक महिन्यात स्वतःच्या आरोग्य विषयी काळजी घेणे आवश्यक आहे.

या महिन्यात सतत काही ना काही दुखत राहील काही लोकांना उष्णतेपासून त्रास होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत हा महिना तुम्हाला चांगलं फळ देणार आहे. शुभ ग्रहाच्या साथीमुळे पैशाची चांगली आवक राहील.नवीन व्यवसाय करणार्यांना व्यवसायातून लाभ होईल.या महिन्यात वाहनांचा वापर काळजीपूर्वन करावा. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होईल.

पौर्णिमेच्या आसपास फक्त एखादी दुखापत होऊ शकते. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर या महिन्यात काळजीपूर्वक व्यवहार करा. पौष महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत वक्री मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर राहील.या महिन्यात वाद विवाद भांडण तंटा होण्याची शक्यता असल्याने शक्य होईल तेवढे शांत राहा.

या महिन्याच्या पौर्णिमेनंतर विवाह इच्छुक लोकांना स्थळ चालून येतील.माघ महिन्यात देखील तुम्हाला शुभ ग्रहांचे मोठे पाठबळ आहे मात्र या महिन्यात शारीरिक व्याधी दुखणे या कडे अजिबात दुलुक्ष करू नका. वैवाहिक जीवन सुखाचे असेल . स्वतःच्या आई वडिलांशी मतभेद होऊ शकतात आणि यातूनच महिन्याच्या शेवटी घरामध्ये अशांतता वाद होऊ शकतात.

या वर्षाचा शेवटचा महिना अर्थात फाल्गुन यामध्ये वैयक्तिक उत्सव समारंभ पार पडतील.चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.नोकरदार वर्गाने वरिष्ठांची वाद घालणे टाळावे. या महिन्याच्या अमावस्येला गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एकंदरीत या राशीला हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.