नमस्कार मंडळी
वृश्चिक राशीसाठी १८ एप्रिल पासून पुढे येणारा काळ अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. कारण दिनांक १८ एप्रिल रोजी नेपच्युन ग्रह मीन राशीमध्ये गोचर करणार असून बुध आणि हर्षल अशी युती होत आहे. हा काळ वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
तुम्ही फार बुद्धिमान आहात आणि तुम्ही खूप महत्वकांक्षी देखील मानले जातात. वृश्चिक राशीचे लोक हे अतिशय हुशार मानले जातात. हे महत्वकांक्षी असतात, या काळात तुमच्या सर्व महत्वकांक्षा फळाला येण्याचे संकेत आहेत. आता तुमच्या जीवनात तुम्हाला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
तुम्ही खरे बोलणारे आणि खरे वागणारी लोक आहात , तुम्ही नेहमी खरे बोलत असता. तुम्ही इमानदार आहात पण या काळात तुमची सांगत सुद्धा चांगली असणे आवश्यक आहे. किंवा वाईट सांगत तुम्हाला बरबाद करू शकते. त्यामुळे या काळात चांगली सांगत निवडणे आवश्यक आहे , आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
त्यामुळे प्रयन्तांची गती तुम्हाला वाढवावी लागणार आहे. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. वृश्चिक राशीचे लोक कलागुण संपन्न असतात , प्रत्येक कला यांच्या कडे असते, जे ठरवतील ते पूर्ण करून दाखवू शकतात. पण कधी कधी हे आळशी बनतात किंवा कधी कधी हे फार उदास बनतात.
हे भावनिक मनाचे सुद्धा असतात. पण या काळात तुम्हाला फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्या दिशेने मार्गक्रमण करायचे आहे. जर तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर खूप मोठे यश हाती लागू शकते. आता इथून पुढे ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी तुमच्या साठी बनत आहे. काळ विशेष अनुकूल असणार आहे.
हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे. तुम्ही अनेक दिवसापासून ची अपूर्ण राहिलेली स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात त्यामुळे प्रयन्त तुम्हाला चांगले करावे लागणार आहेत. व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही व्यसन तुम्हाला घटक ठरू शकते किंवा कोणते हि व्यसन तुम्हाला मागे खेचू शकते.
आता इथून पुढे प्रचंड प्रगती तुमच्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. तुमच्या पडत्या काळात तुमच्यावर हसणारे किंवा तुमची मस्करी करणारे लोक आता तुम्ही स्तुती करू लागतील. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र यामध्ये चांगली प्रगती घडून येणार आहे. राजकीय क्षेत्रात देखील नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत.
समाजात मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. तुमच्या मध्ये असणारे कलागुण जसे जे लोक साहित्यिक आहेत किंवा पत्रकार आहेत , जे लोक लेखक आहेत किंवा कवी आहेत अशा लोकांना सुद्धा प्रगतीच्या संधी या काळात मिळणार आहेत. हा काळ विशेष अनुकूल असल्यामुळे जीवनात चांगली मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.
महादेवाचं आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात तुमचा विजय होणार आहे