बाळाचे भविष्य लिहिणारी ही सटवाई कोण आहे

नमस्कार मंडळी,

मित्रांनो सटवाई बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी साठवायची पूजा केली जाते सटवाई बाळाचे भविष्य लिहिते बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हटले जाते सटवाईची पूजा बाथरूम मध्ये केली जाते हे तुम्हाला माहीतच असेल

या पूजेनंतर एक रिकामा कागद आणि पेन त्या ठिकाणी ठेवले जाते याबद्दलची ही माहिती आहे सटवाईची पूजा हि जरी वैदिक संस्कार नसला तरी हिंदू लोक शिशु जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बालकांच्या जीवनातील पहिलाच लौकिक क्षण असतो असे बोलले जाते

सटवाई कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन बाळाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिते त्यासाठी तिथे एक कोरा कागद आणि पेन ठेवतात त्याच वेळेस बाळाच्या रेखा आखली जाते ज्यावेळी बाळ झोपे मध्येच हसते तेव्हा आजी लोक म्हणतात सटवाई आली आहे आणि ती बाळाला हसवत आहे

मराठी सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते हा प्रश्न सटवाई ला पडला त्यामुळे तिने आईला विचारले आईने उत्तर देण्याचे टाळले परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलाचे भविष्य लिहायला जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाई म्हणते

तू दुसऱ्याचे भविष्य लिहिते माझे काय भविष्य आहे ते मला सांग सटवाई यावर म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटाशी जन्मलेल्या मुलाशी होईल से भविष्य ऐकल्यानंतर लग्न न करण्याचे निर्णय ही मुलगी घेते काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीवर पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले आणि ते पाणी तिच्या ओटीत येते त्यामुळे तिला दिवस जातात

कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन पालनपोषण करतो मुलगा मोठा झाल्यानंतर एके दिवशी जंगलात शिकारीला जातो तेथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे बोलणे खोटे समजून ती युवकाला प्रेमाचा प्रतिसाद देत होती

दोघांचे लग्न ठरते परंतु मुल टाकून देताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकांनी जपून ठेवले असते हे कापड पाहिल्यानंतर आपल्याच मुलाशी आपले लग्न ठरले हे लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगितलेले भविष्य खोटे ठरत नाही अशी ही कथा आहे

त्यामुळे मुले जन्माला आले कि पेन आणि कोरा कागद त्या पूजेच्या ठिकांणी ठेवतात आणि सटवाई येऊन मुलाचे भविष्य लिहिते

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *